कायदा आणि न्याय मंत्रालय
प्रसिद्धी पत्रक
Posted On:
22 FEB 2025 6:23PM by PIB Mumbai
संशोधित अधिवक्ता (सुधारणा) विधेयक, 2025 सार्वजनिक सल्लामसलतीसाठी नव्याने तयार केले जाईल.
अधिवक्ता (सुधारणा) विधेयक, 2025 हे 13 फेब्रुवारी 2025 रोजी विधी व्यवहार विभागाच्या संकेतस्थळावर सार्वजनिक सल्लामसलत करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते, जे सरकारची पारदर्शकता आणि विविध भागधारक आणि जनतेशी व्यापक सहभागाची वचनबद्धता दर्शवते.
प्राप्त झालेल्या सूचना आणि समस्या लक्षात घेऊन सध्याची सल्लामसलत प्रक्रिया संपविण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.
प्राप्त अभिप्रायांच्या आधारे, संशोधित विधेयकाचा मसुदा भागधारकांशी सल्लामसलत करून नव्याने विचारात घेतला जाईल.
***
M.Pange/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2105559)
Visitor Counter : 32