माहिती आणि प्रसारण मंत्रालय
रेझोनेट : द ईडीएम चॅलेंज
इलेक्ट्रॉनिक संगीताच्या नव्या लाटेचा अग्रदूत
Posted On:
19 FEB 2025 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2025
इलेक्ट्रॉनिक संगीताच्या नव्या लाटेचा अग्रदूत
प्रस्तावना
रेझोनेट: द ईडीएम चॅलेंज आता जागतिक दृक्श्राव्य मनोरंजन परिषदेच्या (वेव्हज) कार्यक्रमात मध्यवर्ती स्थान मिळवण्यासाठी सज्ज असून ही स्पर्धा संगीत निर्मिती तसेच प्रत्यक्ष सादरीकरणातील नवोन्मेष, सर्जनशीलता तसेच सहयोगी संबंध साजरे करत इलेक्ट्रॉनिक नृत्य संगीत (ईडीएम) क्षेत्रातील जागतिक प्रतिभांना एकत्र आणणारे आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या (आय अँड बी) सहयोगासह इंडियन म्युझिक इंडस्ट्री (आयएमआय) या संस्थेने आयोजित केलेला हा कार्यक्रम “क्रिएट इन इंडिया आव्हाना”चा एक भाग असून संगीत मिश्रण, इलेक्ट्रॉनिक संगीत आणि डीजे’ईंग कला यासाठीचे जागतिक केंद्र म्हणून भारताच्या स्थानाला आणखी बळकट करण्यासाठी याचे आयोजन केले आहे.

प्रसारण आणि माहितीपर मनोरंजन, एव्हीजीसी-एक्सआर (अॅनिमेशन, दृश्य परिणाम, गेमिंग,कॉमिक्स आणि विस्तारित वास्तव), डिजिटल माध्यमे आणि नवोन्मेष, आणि चित्रपट या चार महत्त्वाच्या स्तंभांवर वेव्हज ची उभारणी करण्यात आली आहे. ईडीएम चॅलेंज हे प्रसारण आणि माहितीपर मनोरंजन विभागाचा भाग असून तो माहिती आणि मनोरंजन वितरणाच्या पारंपरिक आणि उत्क्रांत अशा दोन्ही स्वरुपांवर लक्ष केंद्रित करतो. हा स्तंभ सामग्री निर्मितीला प्राधान्य देतो, नागरिकांना माहितीच्या माध्यमातून सक्षम करतो आणि 21 व्या शतकातील आव्हानांशी जुळवून घेतानाच जागतिक पातळीवरील प्रेक्षकांपर्यंत संगीत आणि मनोरंजन पोहोचवण्याच्या नव्या मार्गांचा शोध घेतो.
भारताच्या माध्यमे आणि मनोरंजन (एम अड ई) उद्योगाला अधिक उंचीवर घेऊन जाण्याच्या उद्देशाने मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि जिओ वर्ल्ड गार्डन्स या ठिकाणी दिनांक 1 ते 4 मे या कालावधीत होणार असलेल्या वेव्हज या महत्त्वाच्या मंचाची रचना करण्यात आली आहे. हा कार्यक्रम उद्योगातील प्रमुख व्यक्ती, भागधारक आणि सर्जकांना नव्या संधीचा शोध घेऊन नवोन्मेषाला चालना देण्यासाठी तसेच मनोरंजन विश्वाचे भविष्य घडवण्यासाठी महत्वाचा मंच म्हणून काम करेल. सर्जनशील उत्कृष्टतेसाठीचे चैतन्यमय वातावरण जोपासत, या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असलेल्या क्रिएट इन इंडिया स्पर्धेसाठी आतापर्यंत 73,000 पेक्षा जास्त नोंदण्या झाल्या आहेत. रेझोनेट : द ईडीएम चॅलेंज या उपक्रमाच्या माध्यमातून वेव्हज हा मंच जागतिक मनोरंजन परिदृश्यातील भारताचे स्थान अधिक बळकट करत आहे.
पात्रता आणि सहभागासाठीची मार्गदर्शक तत्वे
सदर स्पर्धा जगातील कोणत्याही देशातील इलेक्ट्रॉनिक नृत्य संगीत (ईडीएम) रचण्याचा आणि निर्मितीचा अनुभव असलेले कलाकार, संयोजक, संगीतकार आणि सादरकर्त्यांसाठी खुली आहे. “रेझोनेट : द ईडीएम चॅलेंज” ही या स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना असून एकसंध आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध सांगितिक कलाकृतीच्या निर्मितीसाठी जागतिक संगीत शैलीचा वापर करण्यावर या संकल्पनेचा भर आहे.
- सहभागासाठी नोंदणीची अंतिम तारीख 10 मार्च 2025 आहे.
- स्पर्धकांचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे.
- केवळ व्यक्ती अथवा सर्जनशील संघ (जास्तीत जास्त दोन सदस्य) या स्पर्धेसाठी अर्ज करू शकतात; कॉर्पोरेट संस्था यासाठी पात्र नाहीत.
- प्रत्येक स्पर्धक अथवा संघ केवळ एकच अर्ज सादर करू शकतो.
- केवळ मानवनिर्मित सामग्री ग्राह्य धरली जाईल; कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून निर्माण झालेले संगीत विचारात घेतले जाणार नाही.
- स्पर्धेतील सहभागाचे नियम तपशीलवारपणे समजून घेण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा: नियम आणि अटी.
स्पर्धेचे स्वरूप

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया
- अर्जदारांनी स्पर्धेतील सहभागाचे स्वारस्य पुढील ईमेल आयडीवर मेल करून कळवणे अनिवार्य आहे. wavesatinfo@indianmi.org.
- पुढील लिंकवर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्याचा वापर करुनच अर्जातील तपशील सादर करावे: Submission Template.
परिक्षणाचे निकष

पारितोषिके आणि सन्मान

संदर्भ:
पीडीएफ पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
M.Pange/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2104823)