पंतप्रधान कार्यालय
परीक्षेचा ताण आणि भीती यावर यशस्वीपणे मात करणाऱ्या आणि या संदर्भात सर्वोत्तम तज्ज्ञ असलेल्या परीक्षार्थी योद्ध्यांचे विचार ऐकूया : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
17 FEB 2025 9:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 17 फेब्रुवारी 2025
परीक्षेचा ताण आणि भीती यावर यशस्वीपणे मात करणाऱ्या तरुण परीक्षार्थी योद्ध्यांचा समावेश असलेला,‘परीक्षा पे चर्चा 2025’ या कार्यक्रमाचा विशेष भाग 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित होणार आहे. या विद्यार्थ्यांचे अनुभव, अभ्यासाची रणनीती आणि परीक्षेचा ताण, चिंता यांचा सामना करून दबावाखाली देखील शांत राहण्याबाबत त्यांनी व्यक्त केलेले विचार या भागात आपल्याला ऐकायला मिळतील.
या विशेष भागाची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्स मंचावर लिहितात;
"सर्वोत्तम तज्ज्ञांकडून ऐका ... परीक्षेचा ताण आणि भीती यावर यशस्वीपणे मात करणाऱ्या आणि या संदर्भातील सर्वोत्तम तज्ज्ञ असलेल्या #ExamWarriors चे विचार ऐकूया. उद्याच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात माझे काही तरुण मित्र सहभागी होतील आणि त्यांचे अनुभव आपल्याला सांगतील."
S.Kakade/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2104234)
आगंतुक पटल : 57
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam