शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा 2025 च्या पहिल्या भागात विद्यार्थ्यांशी साधला संवाद


शोनाली सभरवाल, ऋजुता दिवेकर आणि रेवंत हिमतसिंगका यांनी परीक्षा पे चर्चा 2025 च्या चौथ्या भागात नोंदवला सहभाग

Posted On: 14 FEB 2025 9:28PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2025

परीक्षा पे चर्चा 2025 ने विद्यार्थ्यांच्या सहभागाची पुनर्परिभाषा केली असून देशभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये खोलवर प्रतिध्वनीत होत असलेल्या गतिमान, परस्परसंवादी अनुभवात त्याचे रूपांतर झाले आहे. पारंपरिक सभागृहातील संवाद स्वरूपाच्या पलीकडे जाऊन, ही आवृत्ती अर्थपूर्ण, दुतर्फा संभाषणांना चालना देते आणि सोबतच युवा मनांना व्यावहारिक धोरणे, जीवन कौशल्ये आणि शिक्षणाबद्दल एक नवीन दृष्टिकोन प्रदान करते.

परीक्षा पे चर्चा उपक्रमांची आठवी आवृत्ती 10 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील निसर्गरम्य नर्सरीच्या शांत परिसरात सुरू झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील 36 विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

आजच्या चौथ्या भागात, आघाडीच्या पोषण तज्ञ शोनाली सभरवाल, ऋजुता दिवेकर आणि फूड फार्मर म्हणून ओळखले जाणारे रेवंत हिमत्सिंगका यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी परीक्षेदरम्यान निरोगी आणि तणावमुक्त राहण्यात पोषणाची महत्त्वाची भूमिका यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

त्यांनी तंतूमय पदार्थ, प्रथिने आणि आवश्यक पोषक तत्वे प्रचुर असणाऱ्या ज्वारी, बाजरी आणि रागी सारख्या भरड धान्य असलेल्या सुपरफूड्सच्या शक्तीवर भर दिला.हे धान्य ऊर्जा पातळी टिकवून ठेवण्यास आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करत असल्यामुळे ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या आहारात असणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

शोनाली सभरवाल यांनी संतुलित आहार, दर्जेदार झोप आणि एकाग्रता यांच्यातील दुवा अधोरेखित केला. विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि आळस टाळण्यासाठी हलके, पौष्टिक जेवण निवडण्याचे आवाहन सभरवाल यांनी केले.

ऋजुता दिवेकर यांनी भाताचे फायदे स्पष्ट केले आणि विद्यार्थ्यांना स्वादिष्ट, परीक्षा काळात अनुकूल अशा पाककृती सांगितल्या. व्हेजिटेबल बिर्याणी आणि दही भातापासून ते घरगुती चकली आणि ताक किंवा लस्सीपर्यंत विविध पौष्टिक पदार्थ ऊर्जा आणि मानसिक स्पष्टता राखण्यासाठी कसे आदर्श ठरतात, हे स्पष्ट केले.

रेवंत हिमत्सिंगका यांनी परीक्षेच्या तयारीच्या आणखी एका महत्त्वाच्या पैलूबद्दल विद्यार्थ्यांना सांगितले. तो म्हणजे - वास्तववादी ध्येये निश्चित करणे. विद्यार्थ्यांना त्यांनी अवास्तव अपेक्षांचा ताण आणि निराशेविरुद्ध धोक्याचा इशारा दिला आणि विद्यार्थ्यांनी त्याऐवजी व्यावहारिक दृष्टिकोनातून, टप्प्याटप्प्याने ध्येय निश्चित करण्याचे आवाहन केले.
 
S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2103416) Visitor Counter : 28


Read this release in: Odia , English , Urdu , Hindi , Punjabi