ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ईशान्य भारतातील स्टार्टअप्स

Posted On: 13 FEB 2025 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2025

नवोन्मेष, स्टार्टअप्स यांना पाठबळ देऊन त्यांच्यासाठी एक भक्कम परिसंस्था उभारणे आणि देशातील स्टार्टअप्समध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे या उद्देशाने सरकारने 16 जानेवारी 2016 रोजी स्टार्टअप इंडिया हा उपक्रम सुरू केला.उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (DPIIT) देशाच्या ईशान्येकडील राज्यांमधील ज्या उद्योगांना स्टार्टअप म्हणून मान्यता दिली आहे; अशा स्टार्टअप उद्योगांची 31 डिसेंबर 2024 या तारखेनुसार राज्यनिहाय संख्या खालीलप्रमाणे :

राज्य/केंद्रशासित प्रदेश

DPIIT ने स्टार्टअप म्हणून मान्यता दिलेल्या उद्योगांची संख्या

अरुणाचल प्रदेश

47

आसाम

1487

मणिपूर

179

मेघालय

62

मिझोरम

41

नागालँड

85

सिक्कीम

12

त्रिपुरा

141

एकूण

2054

याशिवाय, ईशान्य भारत विकास मंत्रालयाच्या प्रशासकीय अमलाखालील ईशान्य भारत विकास आर्थिक महामंडळ लि. ही बिगर बँकिंग वित्तीय संस्था; ईशान्य भारत व्यवसाय विकास योजनेअंतर्गत ईशान्य भारतातील स्टार्टअप परिसंस्था विकसित करण्यासाठी, कुटुंबात प्रथमच उद्योग सुरू करणाऱ्या व्यक्तींना मदत करत आहे.  

ईशान्य भारत विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ.सुकांता मजुमदार यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

S.Patil/S.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2102917)