पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा

Posted On: 12 FEB 2025 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काल फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या विमानातून पॅरिसहून मार्सिलेला एकत्र प्रवास केला यातून दोन्ही नेत्यांमधील मित्रत्वाच्या बंधाची प्रचीती येते.त्यांनी द्विपक्षीय संबंधांतील सर्व पैलूंवर आणि प्रमुख जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर मार्सिले येथे आगमन झाल्यावर प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा झाली. गेल्या 25 वर्षांत बहुआयामी संबंधात हळूहळू विकसित झालेल्या भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीबद्दल दोन्ही नेत्यांनी त्यांच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरूच्चार केला.

या चर्चेत भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीच्या सर्व पैलूंचा समावेश होता. दोन्ही नेत्यांनी संरक्षण, नागरी अणुऊर्जा आणि अंतराळ या धोरणात्मक क्षेत्रातील सहकार्याचा आढावा घेतला. त्यांनी तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्याच्या मार्गांवर देखील चर्चा केली. नुकत्याच संपलेल्या एआय कृती शिखर परिषद आणि 2026 मध्ये येणाऱ्या भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्षाच्या पार्श्वभूमीवर भागीदारीचे हे क्षेत्र अधिक महत्त्वाचे ठरते.उभय नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक संबंध वाढविण्याचे आवाहन केले आणि या अनुषंगाने 14 व्या भारत-फ्रान्स सीईओ मंचाच्या अहवालाचे स्वागत केले.

⁠पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी आरोग्य, संस्कृती, पर्यटन, शिक्षण आणि लोकांमधील परस्पर संबंध या क्षेत्रात सुरू असलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.त्यांनी हिंद-प्रशांत आणि जागतिक मंच आणि उपक्रमांमध्ये सहभाग अधिक दृढ करण्यासाठी बांधिलकी व्यक्त केली.

चर्चेनंतर भारत-फ्रान्स संबंधांच्या पुढील वाटचालीची रूपरेषा देणारे संयुक्त निवेदन स्वीकारण्यात आले. तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, नागरी अणुऊर्जा, त्रिकोणीय सहकार्य, पर्यावरण, संस्कृती आणि लोकांमधील परस्पर संबंध या क्षेत्रातील दहा निर्णयांना  अंतिम स्वरूप देण्यात आले (यादी जोडलेली आहे).

राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी मार्सेलीजवळील कॅसिस या किनारी  शहरात पंतप्रधानांच्या सन्मानार्थ रात्रीचे भोजन आयोजित केले. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती मॅक्रॉन यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले.

पंतप्रधानांचा फ्रान्स दौरा: निर्णयांची  सूची (10 - 12 फेब्रुवारी 2025)

अनु क्र.

सामंजस्य करार/करार/सुधारणा

क्षेत्र

1.

कृत्रिम बुद्धीमत्तेवरील (एआय) भारत-फ्रान्स जाहीरनामा

तंत्रज्ञान आणि नवोन्मेश

एस अँड टी

2.

भारत-फ्रान्स नवोन्मेश वर्ष 2026 साठी लोगो चे उद्घाटन

तंत्रज्ञान आणि नवोन्मेश

एस अँड टी

3.

इंडो-फ्रेंच सेंटर फॉर द डिजिटल सायन्सेस ची स्थापना करण्यासाठी भारत सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटीआणि इन्स्टिट्यूट नॅशनल डी रेचेर्चे एन इन्फॉर्मेटिक एट एन ऑटोमॅटिक (आयएनआरआयएफ्रान्स यांच्यात इरादा पत्रावर स्वाक्षरी

तंत्रज्ञान आणि नवोन्मेश

एस अँड टी

4.

फ्रेंच स्टार्ट-अप इनक्युबेटर स्टेशन एफ मध्ये 10 भारतीय स्टार्टअप्सचे यजमानपद भूषविण्याचा करार

तंत्रज्ञान आणि नवोन्मेश

एस अँड टी

5.

प्रगत मॉड्युलर अणुभट्ट्या आणि लहान मॉड्युलर अणुभट्ट्यांसंदर्भात  भागीदारी स्थापित करण्याच्या इराद्याची घोषणा

नागरी अणुऊर्जा

6.

ग्लोबल सेंटर फॉर न्यूक्लिअर एनर्जी पार्टनरशिप (जीसीएनईपीबरोबर सहकार्य करण्याबाबत भारताचा अणुऊर्जा विभाग (डीएईआणि फ्रान्सचे  कमिसारिट ए ल एनर्जी अटोमिक एट ऑक्स एनर्जी अल्टरनेटिव्ह्स ऑफ फ्रान्स (सीएईयांच्यातील  सामंजस्य कराराचे नूतनीकरण

नागरी अणुऊर्जा

7.

जीसीएनईपी इंडिया आणि इन्स्टिट्यूट फॉर न्यूक्लिअर सायन्स अँड टेक्नॉलॉजी (आयएनएसटीएनफ्रान्स यांच्यातील सहकार्याबाबत भारताचे डीएई आणि फ्रान्सचे सीईए यांच्यातील  कराराची अंमलबजावणी

नागरी अणुऊर्जा

8.

त्रिकोणी विकास सहकार्य इरादा घोषणापत्रामध्ये सहभाग   

हिंद प्रशांत /शाश्वत विकास

9.

मार्सेली  येथील भारतीय वाणिज्य दूतावासाचे संयुक्त उद्घाटन

संस्कृती/दोन्ही देशांच्या  जनतेमधील संवाद  

10.

पर्यावरण विषयक संक्रमणजैवविविधतावनेसागरी व्यवहार आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालय आणि पर्यावरण क्षेत्रातील पर्यावरणवन आणि हवामान बदल मंत्रालय यांच्यात सहयोग इरादा  घोषणा.

पर्यावरण

 

 

 

 

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2102375) Visitor Counter : 38