माहिती आणि प्रसारण मंत्रालय
महाकुंभ 2025 माघ पौर्णिमेच्या दिवशी भाविकांना महाकुंभाला पोहोचण्यासाठी वाहतुकीची अतिरिक्त व्यवस्था
ग्रामीण भागात परतीच्या प्रवासासाठी प्रत्येक दहा मिनिटांनी उपलब्ध असणाऱ्या बसेसखेरीज बाराशे अधिक बस राखीव
भाविकांना तात्पुरत्या बस स्थानकांपासून जवळपासच्या ठिकाणी जाण्यासाठी दर दोन मिनिटांनी सुटणाऱ्या 750 शटल बसेस सज्ज
Posted On:
11 FEB 2025 10:26PM by PIB Mumbai
प्रयागराज महाकुंभामध्ये माघ पौर्णिमेच्या स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी प्रयागराज मध्ये जमली आहे. उत्तरप्रदेश रोडवेजने लोकांचा हा प्रवास सुलभ व्हावा म्हणून तयारी केली आहे. राखीव बसेस शिवाय प्रवास सुलभ होण्यासाठी शटल बसेसची अतिरिक्त सोय केली आहे.
रोडवेजच्या बाराशे राखीव बसेस या दहा मिनिटांनी भाविकांना परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध असतील.
फेब्रुवारी 11 च्या संध्याकाळी माघ पौर्णिमेच्या मुहूर्तावर 25 कोटी लोकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. आता हे भाविक सुरक्षित आणि व्यवस्थितपणे त्यांच्या ईप्सित स्थळी वेळेत पोहोचतील याची काळजी घेण्यासाठी राज्य सरकार काटेकोरपणे काम करत आहे.
उत्तर प्रदेश राज्याचे वाहतूक मंत्री दया शंकर सिंग यांनी सांगितलं की मुख्य स्नान सोहळ्या चे नियोजन व्यवस्थित पार पडले. त्यासाठी महा कुंभासाठी या आधीच राखीव ठेवलेल्या 3050 बसेस शिवाय ग्रामीण भागात जाणाऱ्या राखीव बाराशे अतिरिक्त बस ठेवल्या होत्या. यामुळे वाहतूक सुरळीतपणे होईल. या अतिरिक्त बसेस खास करून माघ पौर्णिमेच्या स्नान आणि पुढील स्नानसोहळ्यांसाठी राखीव ठेवल्या आहेत. चार तात्पुरती बस स्टेशन आहेत, तेथे येणाऱ्या प्रवाशांना रोडवेजच्या बस दर दहा मिनिटांनी उपलब्ध होतील.
महाकुंभाला जाण्यासाठी दर दोन मिनिटांनी शटल सेवा
माघ पौर्णिमेच्या स्नानासाठी आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी शहराच्या भोवताली तात्पुरती बस स्थानके उभारण्यात आली आहेत. प्रत्येक ठिकाणहून रोडवेजच्या बसेस निघतील. याशिवाय 750 शटल बसेस या महाकुंभापासून जवळपासच्या प्रदेशात जाण्यासाठी भाविकांना उपलब्ध असतील. रोडवेजच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या शटल सेवा दर दोन मिनिटांनी चालू असतील. बसस्थानकांवर होणारी अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना अमृतस्नानाच्या आणि आगामी पर्वणींच्या वेळी बससंबंधित अडचणी येऊ नयेत याची काळजी घेण्याच्या सूचना उत्तर प्रदेश वाहतूक मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
***
JPS/VS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2102201)
Visitor Counter : 28