संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण राज्यमंत्र्यांनी एरो इंडिया 2025 च्या पार्श्वभूमीवर विविध द्विपक्षीय बैठका घेतल्या

प्रविष्टि तिथि: 11 FEB 2025 2:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025


संरक्षण राज्य मंत्री संजय सेठ यांनी 15 व्या एरो इंडियाच्या पार्श्वभूमीवर 10 फेब्रुवारी 2025 रोजी बेंगळुरू येथे विविध द्विपक्षीय बैठका घेतल्या. इटलीचे संरक्षण अवर सचिव मॅटेओ पेरेगो डी क्रेमनागो यांच्यासोबतच्या झालेल्या त्यांच्या बैठकीत, दोन्ही मंत्र्यांनी भारताच्या स्वदेशी प्रणालींच्या संरक्षण क्षमता विकास आणि मनुष्यबळ विकास क्षमतांच्या विकासासह द्विपक्षीय चर्चेच्या विविध पैलूंचा आढावा घेतला.त्यांनी सर्व क्षेत्रातील संबंध दृढ करण्याच्या त्यांच्या असलेल्या वचनबद्धतेला दुजोरा दिला.

यूकेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे मंत्री,लॉर्ड व्हर्नन कोकर यांच्याशी झालेल्या बैठकीदरम्यान, दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्याचा आढावा घेतला आणि आपले संबंध मजबूत करण्यासाठी आपली वचनबद्धता दर्शविली.त्यांनी एकमेकांसोबत तसेच इतर भागीदारांसोबत शांतता, समृद्धी आणि नियमांवर आधारित जागतिक व्यवस्थेसाठी विशेषत: हिंद-prashant byआणि हिंद महासागर क्षेत्रात काम करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला; ज्यायोगे सहकार्यामुळे सागरी आणि इतर क्षेत्रांमध्ये नेव्हिगेशनचे स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य सुनिश्चित होईल.

 

S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(रिलीज़ आईडी: 2101684) आगंतुक पटल : 63
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Tamil