कोळसा मंत्रालय
कोळसा खाण कामगार
Posted On:
03 FEB 2025 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2025
कोळसा मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या कोल इंडिया लिमिटेड (सी आय एल), एन एल सी इंडिया लिमिटेड (एन एल सी आय एल) आणि सिंगरेनी कोलीयरीज कंपनी लिमिटेड (एस सी सी एल) या कोळसा/लिग्नाइट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या खालीलप्रमाणे आहे :
कंपनी
|
कंपन्यांमधील एकूण मनुष्यबळ
|
सी आय एल |
3,30,318
|
एस सी सी एल
|
40,893
|
एन एल सी आय एल
|
20,811
|
सर्व कोळसा खाणींवर, खाण कायदा, 1952, अन्वये तयार केलेल्या नियमांनुसार नियंत्रण ठेवले जाते. खाण कायदा, 1952 ची अंमलबजावणी हा खाण सुरक्षा महासंचालनालयाच्या वतीने योग्य कायद्यांच्या आधारे, नियम, नियमन, मानक आणि मार्गदर्शक तत्त्वे, तपासणी, अपघातांची तपासणी, जागरूकता उपक्रम, जोखीम व्यवस्थापन योजना तयार करणे इत्यादी उपक्रमांच्या माध्यमातून केली जाते.
खाण कायदा 1952, खाण नियम 1955 आणि कोळसा खाण नियमन 2017 हे कायदे तसेच उपनियम आणि स्थायी आदेशांतर्गत असलेल्या वैधानिक तरतुदींचे पालन करण्याव्यतिरिक्त खाणींमध्ये होणारे अपघात टाळण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा प्रदान करण्यासाठी खालील उपाययोजना केल्या जात आहेत. याव्यतिरिक्त, कोळसा कंपन्या खालील सुरक्षा उपायांद्वारे खाणींचे व्यवस्थापन करतात:
- प्रत्यक्ष खाणकामाच्या ठिकाणी विशिष्ट जोखीम मूल्यांकनावर आधारित सुरक्षा व्यवस्थापन योजनांची सज्जता आणि अंमलबजावणी, मुख्य धोक्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी योजना प्रत्यक्ष खाणकामाच्या ठिकाणी-विशिष्ट जोखीम मूल्यांकनावर आधारित मानक कार्यप्रणाली तयार करणे आणि त्यांचे पालन करणे.
- खाण सुरक्षा विषयक प्रशिक्षण देणे. कोळसा मंत्रालयाने डिसेंबर 2023 मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बहु-अनुशासनात्मक सुरक्षा ऑडिट करणाऱ्या तज्ञांच्या पथकाकडून खाणींचे सुरक्षा ऑडिट करणे, स्ट्रॅटा मॅनेजमेंट आणि खाणीतील वातावरणाचे निरीक्षण करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा अवलंब करणे.
- ओपन म्हणजेच खुल्या खाणी आणि भूमिगत कोळसा खाणींसाठी पुढील प्रकारच्या विशिष्ट सुरक्षा उपाय करणे:
- स्फोटमुक्त सुरक्षित खाणकामासाठी पर्यावरणाला अनुकूल पृष्ठभाग खनन पद्धतींचा वापर
- खाणकामाशी संबंधित विशिष्ट वाहतूक नियम तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे .
- अवजड वस्तू वाहन ऑपरेटरना सिम्युलेटर्सचे प्रशिक्षण देणे.
- औद्योगिक वाहनांना इशारा देणारे उपकरण असलेले डंपर्स, मागील दृश्य दिसू शकेल असे आरसे आणि कॅमेरा, दृक श्राव्य अलार्म (एव्हीए), स्वयंचलित फायर डिटेक्शन आणि सप्रेशन प्रणाली इ.
- जीपीएस आधारित ऑपरेटर इंडिपेंडेंट ट्रक डिस्पॅच सिस्टीम (OITDS) अर्थात डंपर्सना प्रत्यक्ष माहिती पुरवणे आणि खुल्या खाणीतील अवजड वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांच्या हालचालीचा मागोवा घेण्यासाठी काही मोठ्या ओपन कास्ट प्रोजेक्ट अर्थात यंत्रसामग्रीमध्ये मध्ये जिओ-फेन्सिंग म्हणजे आभासी भौगोलिक सीमा तयार करणे
- उच्च मास्ट टॉवर्स वापरून खाणीतील दिव्यांच्या प्रकाशाची पातळी वाढवण्यासाठी योग्य प्रकाश व्यवस्था.
- भूमिगत खाणींमध्ये अर्ध यांत्रिक तंत्रज्ञानाचा परिचय करून बास्केट लोडिंगचे निर्मूलन.
- न्यूमॅटिक/हायड्रॉलिक रूफ बोल्टिंग सिस्टमद्वारे बोल्टिंगसह छतावरील प्रभावी नियंत्रण प्रणालीसाठी सिमेंट कॅप्सूलच्या जागी रेझिन कॅप्सूल लावले.
- जिथे भूगर्भशास्त्र अनुकूल असेल तिथे, सातत्याने खाण तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे.
- कोळसा खाण नियमन 2017 इत्यादींनुसार तयार केलेले आपत्कालीन प्रतिसाद आणि निर्वासन योजना (ER आणि EP).
- खाण सुरक्षा तपासणी: सर्व खाणकामांची चोवीस तास देखरेख करण्यासाठी पुरेशा संख्येने सक्षम आणि वैधानिक पर्यवेक्षक, खाण अधिकारी, कामगार निरीक्षकांकडून नियमित तपासणी, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बॅक शिफ्ट खाण तपासणी आणि अंतर्गत सुरक्षा संघटनेच्या अधिकाऱ्यांकडून नियमित खाण तपासणी केली जाते.
शिवाय, कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कोळसा कंपन्यांमध्ये देशातील कोळसा खाणीतील कामगारांना रुग्णालये, दवाखाने आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या नेटवर्कद्वारे व्यापक आरोग्य सेवा पुरवल्या जातात.
कोळसा खाणीतील कामगार हवेतील कोळशाच्या धुळीच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यामुळे कोळसा कामगारांना न्यूमोकोनिओसिस, सिलिकोसिस आणि श्वसनाच्या समस्या होऊ शकतात, परंतु अलिकडच्या काळात कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कोळसा कंपन्यांमध्ये विद्यमान नियंत्रण उपायांमुळे कोळसा कामगारांना न्यूमोकोनिओसिस आणि सिलिकोसिसचा एकही प्रकार आढळलेला नाही.
कोळशाच्या धुळीच्या आणि उष्णतेच्या दीर्घकाळ संपर्कामुळे होणाऱ्या विविध आरोग्य समस्या टाळण्यासाठी खालील उपाययोजना केल्या जातात:
- व्यावसायसंबंधी आजारांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी कर्मचाऱ्यांची, विशेषतः उच्च-जोखीम असलेल्या खाणकामामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते.
- सर्व नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची रोजगारपूर्व वैद्यकीय तपासणी केली जाते. सर्व कर्मचाऱ्यांची नियतकालिक वैद्यकीय तपासणी (PME) खाण नियम 1955 मध्ये नमूद केलेल्या कायद्यांनुसार केली जाते.
- अन्न हाताळणी आणि स्टेमिंग मटेरियल संबंधित कर्मचाऱ्यांसाठी छातीचा एक्स-रे आणि थुंकीचा एएफबी, मल तपासणी, डोळ्यांचे अपवर्तन चाचणी वेळोवेळी केली जाते.
- लक्षात येण्याजोग्या आजारांसाठी आणि महत्त्वाच्या आजारांसाठी वैधानिक आरोग्य सर्वेक्षण केले जाते.
- हवामान बदलाचे आरोग्यावर होणारे परिणाम आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर नियमित मोहिमा आणि प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जात आहेत.
ही माहिती केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.
* * *
S.Kakade/Bhakti/Hemangi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2099316)
Visitor Counter : 38