कोळसा मंत्रालय
डिसेंबर 2024 मध्ये आठ प्रमुख उद्योगांमध्ये कोळसा क्षेत्राने नोंदवली सर्वाधिक वाढ
प्रविष्टि तिथि:
03 FEB 2025 7:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2025
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आयसीआय अर्थात आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकानुसार (आधार वर्ष 2011-2012) आठ प्रमुख उद्योगांमध्ये कोळसा क्षेत्र निर्देशांकाने डिसेंबर 2024 मध्ये, सर्वाधिक 5.3% (तात्पुरती) वाढ नोंदवली असून तो 215.1 अंकांवर पोहोचला आहे. कोळसा क्षेत्राचा निर्देशांक डिसेंबर 2023 मध्ये 204.3 अंकांवर पोहोचला होता. एप्रिल ते डिसेंबर 2024 या कालावधीत, कोळसा उद्योगाचा निर्देशांक 177.6 अंकांवर पोहोचला, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 167.2 अंकांवर 6.2 % ची मजबूत वाढ दर्शवत होता. ही सर्व आठ प्रमुख उद्योगांमध्ये सर्वाधिक वाढ आहे.
आयसीआय पुढील आठ प्रमुख उद्योगांमधील उत्पादनाच्या एकत्रित आणि वैयक्तिक कामगिरीचे मोजमाप करते : सिमेंट, कोळसा, कच्चे तेल, वीज, खते, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने आणि पोलाद.
आठ प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात डिसेंबर 2024 मध्ये मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 4.0% वाढ दिसून आली. एप्रिल ते डिसेंबर 2024 या कालावधीतील निर्देशांक आर्थिक वर्ष 2023-24 च्या याच कालावधीच्या तुलनेत 4.2 % ने वाढला, जो एकूण औद्योगिक विस्तारात कोळसा क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा प्रदर्शक आहे.
ही उल्लेखनीय वाढ मुख्यत्वे एप्रिल-डिसेंबर 2024 दरम्यान कोळसा उत्पादनात झालेल्या लक्षणीय वाढीमुळे झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 684.47 मेट्रिक टनाहून वाढून 726.31 दशलक्ष टन (मेट्रिक टन) वर पोहोचली आहे. यातून ऊर्जा आणि उत्पादन उद्योगांमधील वाढती मागणी पूर्ण करण्याची कोळसा क्षेत्राची क्षमता अधोरेखित होते.
* * *
S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2099299)
आगंतुक पटल : 73