अर्थ मंत्रालय
कृषीसंबंधित क्रियाकलापांवर विशेष भर दिल्याने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये तळागाळातील कृषी कर्ज वाटप 19.28 लाख कोटींवर
गेल्या दशकात कृषी कर्ज वाटपात वार्षिक सरासरी 13%हून अधिक वाढ झाल्याचे निष्पन्न
प्रविष्टि तिथि:
31 JAN 2025 6:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जानेवारी 2025
प्रभावी आणि विनासायास कृषी कर्जांच्या मदतीने ग्रामीण क्षेत्राला पतपुरवठा करण्यास चालना देण्यासाठी, सरकार तळागाळासाठी कृषी पतपुरवठ्याची (GLC) वार्षिक उद्दीष्टे निर्धारित करत आहे. गेल्या दशकात (2014-15 ते 2023-24), कृषी कर्ज वितरणातील वाढीचा सरासरी वार्षिक दर 13% हून अधिक राहिल्याचे दिसून आल्याने यातून या क्षेत्राला वाढीव आर्थिक सहाय्य पुरविले गेल्याचे स्पष्ट होते. 2023-2024 या आर्थिक वर्षात वितरित करण्यात आलेल्या कृषी कर्जांची एकूण रक्कम 25.48 लाख कोटी रु.वर पोहोचली. आर्थिक वर्ष 2024-25 साठी, भारत सरकारने कृषीसंबंधित क्रियाकलापांसाठी म्हणजे उदा. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मेंढी शेळी डुक्कर पालन, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन-इत्यादींसाठी 4.20 लाख कोटीच्या उप-लक्ष्यांसह 27.5 लाख कोटी रु.चे GLC लक्ष्य ठरविले आहे. तळागाळासाठीच्या कृषी पतपुरवठ्याचे (GLC) उद्दीष्ट आर्थिक वर्ष 2014-15 मधील 8 लाख कोटींवरून 2024-25 मध्ये 27.5 लाख कोटींवर पोहोचल्याने ते तीन पटींहून अधिक वाढल्याचे यातून स्पष्ट होते, ही बाब कृषी आणि संलग्न क्षेत्रातील कर्ज वितरणात झालेल्या लक्षणीय प्रगतीवर प्रकाश टाकते तसेच या क्षेत्राच्या मागण्या पूर्ण करण्यात लक्ष्यित पत धोरणे परिणामकारक ठरल्याचे अधोरेखित होते.
31.12.2024 पर्यंत 27.50 लाख कोटी रु. कृषी कर्ज वाटपाच्या उद्दीष्टापैकी 19.28 लाख कोटी रुपये कर्ज वितरित करून 70% लक्ष्य पूर्ण करण्यात आले आहे.
* * *
JPS/M.Ganoo/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2098151)
आगंतुक पटल : 50