युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ब्रिक्सची युवा परिषद उद्योजकता कार्यगट बैठक मार्च 2025 मध्ये भारतात होणार

Posted On: 31 JAN 2025 2:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जानेवारी 2025

 

केंद्र सरकारच्या युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवक विभागातर्फे 3 ते 7 मार्च 2025 या कालावधीत ब्रिक्स (ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) युवा परिषद उद्योजकता कार्यगटाची बैठक होणार आहे. शाश्वत विकासासाठी युवक उद्यमशीलता ही या बैठकीची संकल्पना आहे. ब्रिक्स देशाचे 45 युवक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

उद्योजकतेच्या क्षेत्रातील धोरणे, कार्यक्रम आणि सहकार्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी ब्रिक्स युवा परिषदेच्या प्रतिनिधींना भारतात होणाऱ्या कार्यगटाच्या बैठकीमुळे  व्यासपीठ मिळेल. या बैठकीत युवक प्रतिनिधींना त्यांचे कामाबद्दलचे अनुभव एकमेकांना सांगता येतील आणि ब्रिक्स देशांमधील उद्योजकतेच्या क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा करता येणार आहे.

  • ब्रिक्स युवा परिषदेची स्थापना: उद्योजकता कार्य गट.
  • उद्योजकता क्षेत्रात ब्रिक्स देशांच्या कृतिआराखड्यांवर चर्चा करणे.
  • उद्योजकतेच्या क्षेत्रात ब्रिक्स देशांच्या युवा सहकार्यामध्ये ठोस कृतींची चाचपणी करणे.
  • ब्रिक्स आणि कार्यगटांच्या बैठकींच्या चौकटीत प्राधान्याने दिलेल्या निर्देशांनुसार नवीन युवा स्वरूपांच्या निर्मितीवर चर्चा करणे.
  • ब्रिक्स देशांमध्ये अस्तित्त्वात असलेल्या आंतरराष्ट्रीय उद्योजकता संधींशी सहभागींना जोडणे.

बैठकीशी संबंधित क्षेत्रांबद्दल तरुणांचे आकलन वाढवण्यासाठी, युवा व्यवहार विभाग भारतातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये 8 सराव उपक्रम आयोजित करेल. या पूर्वतयारीसाठी राबवलेल्या कार्यक्रमांमुळे तळागाळातील अधिकाधिक लोकांना भारताच्या उद्योजकतेच्या विषयपत्रिकेविषयी माहिती मिळेल आणि निकोप चर्चेसाठीचा एक मंच उपलब्ध होईल. पूर्वनिर्धारित क्षेत्राविषयी प्रतिभावान युवक वक्त्यांमध्ये त्यानिमित्ताने परिसंवाद झडतील.

 

* * *

G.Chipalkatti/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2097949) Visitor Counter : 15