पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पर्यटन मंत्रालयातर्फे 26 ते 31 जानेवारी 2025 दरम्यान लाल किल्ल्याच्या हिरवळीवर सहा दिवसीय "भारत पर्व" या भव्य कार्यक्रमाचे आयोजन


'देखो अपना देश’ ही यंदाच्या भारत पर्व 2025ची मध्यवर्ती संकल्पना

Posted On: 26 JAN 2025 11:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जानेवारी 2025

 

प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचा भाग म्हणून 2016  पासून दरवर्षी 26 ते 31 जानेवारी दरम्यान नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ‘भारत पर्व’ आयोजित केले जाते. पर्यटन मंत्रालय हा कार्यक्रम आयोजित करते आणि लाल किल्ल्यासमोरील हिरवळीवर आणि ज्ञान पथावर हा कार्यक्रम संपन्न होतो.

या वर्षी भारत पर्व ची संकल्पना 'देखो अपना देश' आहे. हा कार्यक्रम नागरिकांना "देखो अपना देश: पीपल्स चॉइस वोटिंग’’ अश्या प्रकारचा असल्याने लोकांना यात सहभागी होण्यास प्रोत्साहित करेल आणि नागरिकांना सहभागी करून घेईल. यामुळे  लोकप्रिय आणि उदयोन्मुख स्थळांना अधोरेखित केले जाईल आणि भारताच्या सांस्कृतिक वारसा स्थळांप्रति सखोल आत्मीयता वाढण्यास मदत होईल. नागरिक खालील QR कोड स्कॅन करून किंवा https://bit.ly/DADPC ला भेट देऊन ‘देखो अपना देश पीपल्स चॉइस वोटिंग’’ मध्ये सहभागी होऊ शकतात.

भारत पर्व 2025 ची ठळक वैशिष्ट्ये:

सहा दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात खालील प्रमुख घटक आहेत:

  • 59 खाद्यपदार्थांचे स्टॉल: राज्य सरकार, आयएचएमचे स्टॉल, इतर हॉटेल मॅनेजमेंट संस्थांचे स्टॉल, एनएएसव्हीआय आणि स्टुडिओ किचनद्वारे अन्न तयार करण्याची प्रात्यक्षिके देखील बघता येतील
  • हस्तकला आणि हातमागाचे 70 स्टॉल: डीसीचे स्टॉल; हातमाग, डीसीचे स्टॉल; हस्तकला, केव्हीआयसीचे स्टॉल; ट्रायफेड, तिहार जेल, केंद्रीय मंत्रालयांचे स्टॉल, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे स्टॉल असणार आहे.
  • 34 राज्य पर्यटन मंडप आणि 24 केंद्रीय मंत्रालयांचे स्टॉल
  • संस्कृती आणि वारसा: उत्तर विभागीय सांस्कृतिक केंद्र (संस्कृती मंत्रालय) द्वारे नृत्यदिग्दर्शित केलेली सादरीकरणे.
  • प्रजासत्ताक दिनाचे चित्ररथ, लष्कर, नौदल, हवाई दल आणि निमलष्करी दलाच्या बँडचे सादरीकरण
  • क्रियाकलाप क्षेत्र/ अॅक्टिविटी झोन: नुक्कड नाटक, प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा, पर्यटन युवा क्लबचा सहभाग, शाळा/महाविद्यालयीन मुलांसाठी अनुभवात्मक क्षेत्र /एक्सपिरीएंशल झोन आणि DIY/डू इट युवरसेल्फ उपक्रम.

भारत पर्व 2025, हे 26 जानेवारी रोजी सायंकाळी 5 ते रात्री 9 आणि 27 ते 31 जानेवारी 2025 दरम्यान दुपारी 12 ते रात्री 9 पर्यंत खुले आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.

 

* * *

JPS/H.Kenekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2096670) Visitor Counter : 55