भारताचा लोकपाल
azadi ka amrit mahotsav

भारताचे लोकपाल येथे प्रजासत्ताक दिन साजरा.

Posted On: 26 JAN 2025 4:53PM by PIB Mumbai

 

भारताचे लोकपाल येथे 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी अभिषेक भगोटिया यांनी भारताच्या लोकपालचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि सदस्यांचे स्वागत केले.

लोकपालचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांनी तिरंगा फडकवला आणि त्यानंतर राष्ट्रगीत झाले.

स्वातंत्र्य, न्याय आणि अतूट दृढतेचे प्रतीक म्हणून भारताचा तिरंगा उंचावर अभिमानाने फडकत आहे, असे लोकपाल अध्यक्ष आपल्या भाषणात म्हणाले. आपला तिरंगा अब्जावधी आशांना एका सामायिक नियतीशी जोडतो. अशी नियती जी ज्ञान, दूरदृष्टी, न्याय्य आणि समावेशक राष्ट्राच्या निर्मितीची प्रेरणा घेऊन तयार केलेल्या आपल्या संविधानाद्वारे शासित आणि मार्गदर्शित आहे, असे ते म्हणाले.

हा उत्सव आपल्या सामूहिक आकांक्षांची ज्योत आहे तसेच लोकशाही, समानता आणि न्यायावरील आपल्या अढळ विश्वासाचा पुरावा आहे, हे न्यायमूर्ती खानविलकर यांनी अधोरेखित केले.  आजचा दिवस प्रत्येक भारतीयाला, आपण या महान प्रजासत्ताकाला - स्वर्णिम भारत - बनवण्यासाठी कसे योगदान देऊ शकतो आणि या प्रजासत्ताकाचा थोर वारसा आणि विकास कसा अधोरेखित करु शकतो, यांचा विचार करण्याची आठवण करुन देतो, असेही ते म्हणाले.

या महत्त्वपूर्ण दिवशी, सर्वांनी स्वतःला आठवण करून दिली पाहिजे की जेव्हा देशाचे नागरिक प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि धैर्याने काम करतात तेव्हा आपले प्रजासत्ताक सर्वात बलवान असते, असेही त्यांनी सांगितले. कोणत्याही स्वरूपात भ्रष्टाचार हा केवळ कायद्याचा विश्वासघात नाही तर आपल्याला एक राष्ट्र म्हणून एकत्र बांधून ठेवणाऱ्या विश्वासाचा देखील विश्वासघात आहे,यावर त्यांनी भर दिला. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की भारतीय लोकपाल ही केवळ एक संस्था नाही, तर ती निष्पक्षता आणि पारदर्शकता राखण्याचे वचन आहे. त्यामुळे या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी मनापासून केले.

नवीन आव्हाने आणि संधींकडे वळत असताना, लोकशाही आणि अखंडतेचा दीपस्तंभ म्हणून चमकणारा भारत निर्माण करण्याच्या आपल्या संकल्पाचा आपण पुन्हा एकदा उच्चार करू, असे सांगून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

"हा प्रजासत्ताक दिन आपल्यात उद्देश, एकता आणि आशेची नवी भावना जागृत करो." अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2096483) Visitor Counter : 35


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil