सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

"भारतातील वेतन अहवाल: एक रोजगार दृष्टीकोन - नोव्हेंबर 2024 " चे प्रकाशन

प्रविष्टि तिथि: 24 JAN 2025 3:50PM by PIB Mumbai

 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय सप्टेंबर 2017 नंतरच्या कालावधीतील औपचारिक क्षेत्रातील रोजगाराशी संबंधित आकडेवारी प्रसिद्ध करत आहे. ज्यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना, कर्मचारी राज्य विमा योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना या तीन प्रमुख योजनांमध्ये सदस्यता घेतलेल्या ग्राहकांच्या संख्येची माहिती वापरली जात आहे.

संपूर्ण अहवाल येथे पाहता येईल: Payroll Reporting in India An Employment Perspective – November, 2024.pdf

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना:

नोव्हेंबर 2024 मध्ये एकूण नवीन ईपीएफ सदस्यांची संख्या 8,74,420आहे जी ऑक्टोबर 2024मध्ये 7,86,196 होती.

कर्मचारी राज्य विमा योजना:

नोव्हेंबर 2024 मध्ये ईएसआय योजने अंतर्गत नव्याने नोंदणी केलेल्या आणि या योजने अंतर्गत योगदान देणाऱ्या सदस्यांची संख्या 11,82,501 होती, ऑक्टोबर 2024मध्ये ही संख्या 13,07,888 होती.

राष्ट्रीय पेन्शन योजना:

नोव्हेंबर 2024 मध्ये, NPS मध्ये एकूण 40,920 नवीन सदस्य  नोंदवले गेले, जे ऑक्टोबर 2024 मध्ये 64,977 होते.

***

N.Chitale/H.Kulkarni/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2095921) आगंतुक पटल : 56
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Urdu , हिन्दी , Bengali , English