जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पाणी, स्वच्छता आणि आरोग्य यासंदर्भातील भारताचे उपक्रम आणि नवोन्मेषांवर जागतिक आर्थिक मंच 2025 मध्ये चर्चा

Posted On: 24 JAN 2025 3:29PM by PIB Mumbai

 

Picture 1

दावोस येथे आयोजित जागतिक आर्थिक मंच  2025 मध्ये भारताच्या दालनाने  "इंडियाज 'वॉश' इनोव्हेशन: ड्रायव्हिंग ग्लोबल इम्पॅक्ट इन क्लायमेट अँड वॉटर सस्टेनेबिलिटी" या विषयावर एक जागतिक चर्चा आयोजित केली होती. भारताने 'वॉश' (WASH-water, sanitation, and hygiene )अर्थात पाणी, स्वच्छता आणि आरोग्य यासंदर्भात परिवर्तनकारी कामगिरी साध्य केली आहे.   अभियानातील सर्वोत्तम पद्धतींचे दर्शन घडवण्यासाठी आयोजित या उच्चस्तरीय  सत्रात मध्ये भारताच्या परिवर्तनकारी कामगिरीवर प्रकाश टाकण्यात आला. तसेच जागतिक हवामान लवचिकता आणि शाश्वत विकासात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यात आली.

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांचे बीजभाषण यावेळी झाले.  स्वच्छ भारत अभियान  आणि जल जीवन अभियान यांच्या अंमलबजावणीसंदर्भातला देशाचा प्रवास त्यांनी मांडला.  हे उपक्रम स्वच्छतेची व्याप्ती सुधारण्यात आणि लाखो ग्रामीण घरांना सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यात महत्त्वपूर्ण ठरले आहेत.

''ही  एक महत्त्वपूर्ण कामगिरी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत जलसंवर्धनासाठी वचनबद्ध असण्यासोबतच, या महत्त्वपूर्ण क्षेत्रात परिवर्तनकारी क्रांती घडवून आणत असल्याचे, जगाच्या निदर्शनाला आणून दिले जात आहेअसे सी.आर. पाटील यांनी यावेळी सांगितले. व्यापक  प्रयत्न करत  देशाने आपल्या जलसंपत्तींना लक्षणीयरीत्या बळकटी देत , शाश्वत जल व्यवस्थापनासाठी जागतिक आदर्श स्थापित केला आहे. पाणी टंचाई हे वैश्विक आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.  हवामान बदल, प्रचंड वाढती लोकसंख्या आणि अतिवापरामुळे हे आव्हान अधिकच तीव्र झाले आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सामूहिक कृती बळकट करण्याची आवश्यकता आहे.”

केंद्रीय मंत्री पाटील यांनी पुढे सांगितले, "गेल्या काही वर्षांत, ग्रामीण भारतासाठी सुरक्षित पेयजलाची  उपलब्धता सुनिश्चित करण्यात आम्ही उल्लेखनीय प्रगती केली आहे. यासंदर्भात झालेले परिवर्तन  केवळ पाणी पुरवण्याबद्दल नाही तर जीवन बदलण्याबद्दलदेखील आहे - ग्रामीण भारत पाणी आणण्यावर दररोज खर्ची पडणारे  55 दशलक्ष तास आता वाचवत आहे. त्यामुळे  कामगार सहभागविशेषतः महिला कामगारांचा सहभाग  आणि उत्पादकता वाढू शकते."

पाणी, स्वच्छता आणि आरोग्य सेवांसाठी समान आणि समावेशक पोहोच यासाठी चालना देणाऱ्या प्रयत्नांवर भर देणारे वॉश नवोन्मेष आणि हवामान लवचिकतेसंदर्भातले उपक्रम यात भारताने सध्या केलेले अभूतपूर्व यश दर्शवण्यासाठी जागतिक आर्थिक मंचाने मंत्रालयाला व्यासपीठ प्रदान केले.

स्वच्छ भारत अभियान  आणि जल जीवन अभियान, सरकारच्या नेतृत्वाखालील उपक्रमांचास्वच्छता आणि पाण्याची उपलब्धता सुधारण्यात  मोठ्या प्रमाणातला  प्रभाव दर्शवितात.

भारत दालनात झालेल्या तज्ज्ञमंडळ चर्चेत भारताचे 'वॉश' नवोन्मेष आणि जागतिक शाश्वतता आव्हानांना सामोरे जाताना त्यांचे महत्त्व यावर प्रकाश टाकण्यात आला.  सार्वजनिक-खाजगी भागीदारी, तंत्रज्ञान-चालित उपाय आणि जागतिक स्तरावर यशस्वी प्रारूपांची व्याप्ती वाढवण्यासाठीच्या धोरणांवर संवाद वाढवणे हा यामागचा उद्देश होता.

शाश्वत जल व्यवस्थापन, हवामान-लवचिक पद्धती आणि सार्वजनिक-खाजगी सहयोगासाठी भारताची  प्रारूपे चर्चेच्या केंद्रस्थानी होती.   स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 95 दशलक्षाहून अधिक शौचालयांची  उभारणी, हागणदारीमुक्ती  आणि जलजीवन अभियानाअंतर्गत व्यापक घरगुती नळपाणी जोडणी यासारख्या प्रमुख कामगिरीमुळे भारताला वॉश उपक्रमांमध्ये जागतिक नेता म्हणून प्रस्थापित केले आहे.

या प्रयत्नांनी आरोग्य, शिक्षण याबाबतची पोहोच  आणि आर्थिक संधी यात  सुधारणा करून जीवन बदलले आहे.  यामुळे स्वच्छता, आरोग्य यात सुधारणा झाली  आणि पाणी आणण्यासाठी खर्ची होणाऱ्या वेळेची बचत झाली आहे.

सत्राचा समारोप कृतीशील अंतर्दृष्टी आणि सहभागींच्या वचनबद्धतेसह झाला.  शाश्वत विकास उद्दिष्टे  विशेषतः स्वच्छ पाणी आणि स्वच्छता (एसडीजी  6) आणि हवामान कृती (एसडीजी 13) पुढे नेण्यात भारताच्या महत्त्वपूर्ण  भूमिकेला  पुष्टी  लाभली.

***

N.Chitale/S.Kakade/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2095919) Visitor Counter : 15