पंतप्रधान कार्यालय
बाळासाहेब ठाकरे जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
Posted On:
23 JAN 2025 1:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2025
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. लोककल्याण आणि महाराष्ट्राच्या विकासाप्रती असलेल्या ठाकरे यांच्या बांधिलकीबद्दल त्यांचा सर्वत्र आदर आणि स्मरण केले जाते, असे मोदींनी नमूद केले आहे.
आपल्या एक्स पोस्टवर त्यांनी लिहिले आहे:
“बाळासाहेब ठाकरे जी यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरांजली अर्पण करतो. लोककल्याण आणि महाराष्ट्राच्या विकासाप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीबद्दल त्यांचा सर्वत्र आदर आणि स्मरण केले जाते. त्यांनी कधीही त्यांच्या मूळ तत्वांशी तडजोड केली नाही आणि भारतीय संस्कृतीचा गौरव वाढवण्यासाठी त्यांनी नेहमी योगदान दिले..”
* * *
JPS/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2095387)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam