प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष सल्लागार परिषदेच्या 27 व्या बैठकीत भारतातील सेल आणि जीन थेरपीवर झाली चर्चा

Posted On: 21 JAN 2025 10:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025


 

पंतप्रधानांच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष परिषदेची (PM-STIAC) 27 वी बैठक आज, 21 जानेवारी 2025 रोजी  विज्ञान भवन येथे भारत सरकारचे प्रधान  वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत पीएम-एसटीआयएसी  सदस्यांसह, प्रमुख सरकारी अधिकारी,  उद्योग क्षेत्रातील धुरीण , आरोग्य व्यावसायिक आणि शिक्षणतज्ञ भारतातील सेल आणि जीन थेरपीवर चर्चा करण्यासाठी एकत्र आले.

आपल्या सुरुवातीच्या भाषणात प्रा. सूद यांनी भर देत सांगितले की भारतातील अंदाजे 7 कोटी लोक दुर्मिळ आजारांनी ग्रस्त आहेत, त्यापैकी 80% त आजार अनुवांशिक स्वरूपाचे आहेत. त्यांनी देशातील महत्वपूर्ण रोगांकडे लक्ष वेधले , ज्यामध्ये कर्करोगाच्या प्रकरणांमधील वाढीचा समावेश आहे. प्रा.  सूद यांनी या महत्वपूर्ण वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी सेल आणि जीन थेरपी (सीजीटी) ची प्रचंड क्षमता अधोरेखित केली.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी भारताने सीजीटी मधील  प्रगतीचा वेग वाढवण्याच्या तातडीच्या गरजेवर भर दिला. त्यांनी सरकारच्या भक्कम पाठिंब्याबरोबरच  शिक्षण आणि उद्योग यांच्यात समन्वय साधण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

आयआयटी बॉम्बे मधील डॉ.राहुल पुरवार आणि बेंगळुरू येथील सेंट जॉन्स हॉस्पिटलमधील डॉ.आलोक श्रीवास्तव यांनी  हिमोफिलियासाठी अनुक्रमे भारतातील पहिल्या स्वदेशी सीएआर-टी थेरपी आणि जीन थेरपीच्या विकासाविषयी आपले विचार सामायिक केले.

सादरीकरणानंतर,अध्यक्षांनी विशेष निमंत्रितांकडून अभिप्राय मागवले,ज्यांनी वक्त्यांच्या सूचना आणि निष्कर्षांना अनुमोदन दिले.

पीएम-एसटीआयएसी सदस्यांनी कर्करोगासह विविध विकारांवर उपचार करण्यासाठी सेल आणि जीन थेरपीच्या व्यापक क्षमतेवर भर दिला. त्यांनी या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी सीजीटी वर राष्ट्रीय मिशनची गरज अधोरेखित केली. भारताशी  संबंधित आजारांना प्राधान्य देण्यास मदत करणारे प्रयत्न, संसाधने आणि रोगविषयक  डेटा यावरील माहिती संकलित करण्यासाठी केंद्रीकृत डेटाबेस तयार करण्यावर यावेळी चर्चा झाली.

डॉ.पॉल यांनी सीजीटी उत्पादनांमध्ये देशाची  क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख कृती ओळखून चर्चेचे सार संक्षिप्तपणे मांडले.त्यांनी तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि शैक्षणिक क्षेत्र ते उद्योगात हस्तांतरण आणि उत्पादन विकासात हितधारकांच्या क्षमता पूरक असाव्यात यावर भर दिला. याव्यतिरिक्त, त्यांनी किफायतशीर विश्लेषणाद्वारे पोहोच  आणि सामर्थ्य  सुनिश्चित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.डॉ.पॉल यांनी या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी निधी मिळवणे गरजेचे असल्याचे  अधोरेखित केले.


N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2094970) Visitor Counter : 15


Read this release in: English , Kannada , Urdu , Hindi