संरक्षण मंत्रालय
महाकुंभ 2025: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रयागराज येथे संगमात केले पवित्र स्नान
भारतीयत्वाचे सार जाणून घेण्यासाठी महाकुंभला भेट द्या - राजनाथ सिंह
प्रविष्टि तिथि:
18 JAN 2025 7:48PM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज महाकुंभ 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रयागराजला भेट दिली. त्यांच्यासोबत राज्यसभा सदस्य सुधांशु त्रिवेदी देखील होते. प्रयागराजमध्ये पोहोचल्यानंतर, संरक्षण मंत्र्यांनी प्रथम गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. त्यानंतर त्यांनी अक्षय वट, पातालपुरी आणि बडे हनुमान मंदिराला भेट दिली. तसेच महाकुंभासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थांची पाहणी केली.

यावेळी, उपस्थित मान्यवरांनी पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले. संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, आज प्रयागराजच्या संगमात स्नान करण्याचा अनुभव खूप खास आहे. हा भारतीयत्वाचा एक भव्य, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महोत्सव आहे. प्रत्येकाने भारतीयत्वाचे सार जाणून घेण्यासाठी महाकुंभला भेट द्यावी असेही त्यांनी सांगितले.

***
S.Kane/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2094155)
आगंतुक पटल : 71