माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाकुंभ 2025: आयुष्मान भारत सारख्या सरकारी कल्याणकारी योजना आणि महिला सक्षमीकरण उपक्रमांबद्दल, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या डिजिटल प्रदर्शनात मिळते मौल्यवान माहिती

Posted On: 18 JAN 2025 7:50PM by PIB Mumbai

 

महिला सक्षमीकरण हेच राष्ट्राचे उत्थान’ या तत्त्वाला अनुसरुन केंद्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका डिजिटल प्रदर्शनात  महिला सक्षमीकरणाच्या योजना, धोरणे आणि उपक्रमांची माहिती आकर्षक आणि लक्षवेधी पद्धतीने मांडली आहे. महाकुंभदरम्यान प्रयागराज येथे त्रिवेणी मार्ग प्रदर्शन परिसरात हे प्रदर्शन भरले आहे.

नारीशक्ती वंदन कायदा आणि नमो ड्रोन दिदी योजना यासारख्या विविध योजनांची माहिती या प्रदर्शनात मिळते. त्यामुळे केंद्र सरकारच्या महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनाला चालना मिळत आहे.

 

नारी शक्ती वंदन कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभेतील ३३% जागा आता महिलांसाठी राखीव झाल्या आहेत हे डिजिटल प्रदर्शनात दाखवले आहे. आतापर्यंत बचत गटांच्या माध्यमातून 10 कोटी महिला स्वावलंबी झाल्या आहेत, तर 1 कोटीहून अधिक महिला लखपती दीदी बनल्या आहेत. आणखी 2 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य आहे. नारी सन्मान उपक्रमांतर्गत पंतप्रधान आवास योजनेनुसार बांधण्यात आलेल्या घरांची नोंदणी महिलांच्या नावावर केली जाते.

नमो ड्रोन दीदी योजनेचा उद्देश महिलांच्या स्वयं-सहायता गटांना स्वयंपूर्ण बनवणे आहे. एक हजार नमो ड्रोन दीदींना यापूर्वीच ड्रोन देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त एकूण 2.6 लाख कोटी रुपयांच्या ठेवींसह 4 कोटींहून अधिक सुकन्या समृद्धी खाती उघडण्यात आली असून  मुलींना सुरक्षित भविष्याची हमी मिळाली आहे.

त्याचप्रमाणे आयुष्मान भारत योजने अंतर्गत सुमारे 68 कोटी लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार मिळाले आहेत. 36 कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड जारी केली आहेत. आयुष्मान वय वंदना कार्डचा लाभ ७० व त्याहून अधिक वयाच्या 6 कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. वैद्यकीय जागांची संख्या 2014 मधील 51,000 वरून दुपटीने वाढून आता 1,18,000 झाली आहे. 14,000 हून अधिक जनऔषधी केंद्रे स्वस्त दरात औषधे पुरवत आहेत. लहान मुले आणि महिलांसाठी नियमित लसीकरण नोंदी ठेवण्यासाठी यु-विन पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

हे भव्यदिव्य डिजिटल प्रदर्शन ऐक्यावर लक्ष केंद्रित करून महाकुंभ येथील जनतेला महत्वाची माहिती पुरवत आहे. हे  प्रदर्शन बघायला शेकडों लोक नियमितपणे येत आहेत. शासकीय कल्याणकारी योजनांबद्दल सामान्यजनांमध्ये जागरूकता निर्णाण करणाऱ्या या प्रदर्शनाची मोठ्या प्रमाणावर प्रशंसा  होत आहे.

***

S.Kane/P.Jambhekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2094148) Visitor Counter : 26