गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत गुजरात मधील कलोलमध्ये 194 कोटी रुपयांच्या 19 विकासकामांचे उद्घाटन आणि 8 प्रकल्पांचे भूमिपूजन

Posted On: 15 JAN 2025 8:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आज गुजरात मधील कलोलमध्ये 194 कोटी रुपयांच्या 19 विकासकामांचे उद्घाटन व 8 प्रकल्पांचे भूमिपूजन झाले.

अमित शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मागील सरकारच्या काळात अगदी छोट्या विकासकामांसाठीही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागत होते. मात्र, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, 194 कोटी रुपयांची विकासकामे एका दिवसात आणि एकाच भागात सहजपणे होत आहेत. गांधीनगर लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी अंडरपास बांधून प्रवासाचे अंतर कमी करण्याचे काम झाले आहे. शाह यांनी सांगितले की, प्रत्येक गावातील जीर्ण शाळा इमारती पाडून नव्या वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच, आज कलोल ते साणंदला जोडणाऱ्या सहा पदरी प्रमुख रस्त्याच्या बांधकामाची पायाभरणी करण्यात आली आहे.

अमित शाह यांनी असेही सांगितले की, आज गांधीनगर तालुक्यात विविध उपक्रम राबवले गेले, जसे की प्रत्येक गावातील गरोदर महिलांना पौष्टिक लाडूंचे वाटप, अंगणवाडीतील मुलींना नवीन कपडे देणे आणि भजन मंडळांना वाद्य साहित्य देणे. त्यांनी पुढे नमूद केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाचे सरकार इथे दीर्घकाळापासून काम करत असल्यामुळेच ही विकासकामे शक्य झाली आहेत. शाह असेही म्हणाले की, विकासाची ही नवी संस्कृती गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सुरू झाली होती.

S.Patil/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2093252) Visitor Counter : 14