पंतप्रधान कार्यालय
तिरुवल्लुवर दिनानिमित्त आपल्या मायभूमीतील महान तत्त्वज्ञ, कवी आणि विचारवंत,थोर विभूती तिरुवल्लुवर यांचे आपण स्मरण करतो: पंतप्रधान
त्यांच्या काव्यरचना तमिळ संस्कृतीचे सार आणि आपल्या तात्विक वारशाचे दर्शन घडवतात : पंतप्रधान
त्यांच्या शिकवणीत योग्य आचरण, करुणा आणि न्याय यावर भर : पंतप्रधान
Posted On:
15 JAN 2025 8:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिरुवल्लुवर दिनानिमित्त महान तामिळ तत्त्वज्ञ, कवी आणि विचारवंत महात्मा तिरुवल्लुवर यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. यानिमित्त पंतप्रधान मोदी आपल्या संदेशात म्हणतातः
महान थिरुवल्लुवर यांच्या काव्यरचनांमध्ये तमिळ संस्कृतीचे सार आणि आपल्या तात्विक वारशाचे प्रतिबिंब दिसून येते. "तिरुक्कुरल ही त्यांची कालातीत साहित्यकृती विविध विषयांवर गहन अंतर्दृष्टी देत दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणा देत उभी आहे," असे मोदींनी म्हटले आहे.
पंतप्रधान X वरील पोस्टमध्ये लिहितात:
"तिरुवल्लुवर दिनानिमित्त,आपण आपल्या मायभूमीतील महान तत्त्वज्ञ, कवी आणि विचारवंत, महात्मा तिरुवल्लुवर यांचे स्मरण करतो. त्यांच्या काव्यरचनांमध्ये तमिळ संस्कृतीचे सार आणि आपल्या तात्विक वारशाचे प्रतिबिंब दिसते. त्यांच्या शिकवणीत योग्य आचरण, करुणा आणि न्याय यावर भर आहे.तिरुक्कुरल ही त्यांची कालातीत कलाकृती प्रेरणेचा दीपस्तंभ म्हणून उभी असून ती विविध मुद्द्यांवर सखोल विचार मांडते. आपल्या समाजाविषयीचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कठोर परिश्रम करत राहू.”
S.Patil/M.Ganoo/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2093237)
Visitor Counter : 10
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam