संसदीय कामकाज मंत्रालय
जवाहर नवोदय विद्यालयांसाठीच्या 2023-2024 या वर्षीच्या 25 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेच्या पारितोषिकांचे उद्या वितरण
Posted On:
15 JAN 2025 5:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025
जवाहर नवोदय विद्यालयांसाठी 2023-24 या वर्षी घेण्यात आलेल्या 25 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी, 16 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीत संसद भवन संकुलाच्या संसद ग्रंथालय भवनातील GMC बालयोगी सभागृहामध्ये होणार आहे.
विधी आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच आणि संसदीय कामकाज मंत्रालयाचे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या समारंभात त्यांच्या हस्ते स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या पुरस्कारप्राप्त विद्यार्थी आणि विद्यालयांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.2023-2024 मध्ये घेण्यात आलेल्या 25 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारे "जवाहर नवोदय विद्यालय, चंद्रपूर, महाराष्ट्र (पुणे क्षेत्र)" चे विद्यार्थी यावेळी पुन्हा "युवा संसद" सादर करतील.
संसदीय कामकाज मंत्रालयाच्या वतीने गेल्या 28 वर्षांपासून जवाहर नवोदय विद्यालयांकरिता युवा संसद स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. जवाहर नवोदय विद्यालयांसाठी राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा घेण्याच्या योजनेंतर्गत, संपूर्ण भारतातील नवोदय विद्यालय समितीच्या 8 क्षेत्रांमध्ये विभागलेल्या 80 विद्यालयांमध्ये 2023-24 या वर्षासाठी मालिकेतील 25 व्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
तरुण पिढीमध्ये स्वयं-शिस्त, विविध मतांचा आदर करणे, आपल्या मतांची योग्यरीत्या अभिव्यक्ती आणि लोकशाही जीवनपद्धतीचे इतर चांगले गुण विकसित करणे हा युवा संसद योजनेचा उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संसदेचे कामकाज आणि कार्यपद्धती, चर्चा आणि वादविवादाची तंत्रे यांची ओळख करून देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि प्रभावी वक्तृत्वाद्वारे युक्तिवाद करण्याची कला आणि कौशल्ये विकसित केली जातात.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठीची फिरती संसदीय ढाल आणि करंडक जवाहर नवोदय विद्यालय, चंद्रपूर, महाराष्ट्र (पुणे प्रदेश) यांना प्रदान करण्यात येईल. याशिवाय, आपापल्या क्षेत्रांमध्ये विजेत्या ठरलेल्या पुढील 7 विद्यालयांना मंत्री महोदयांच्या हस्ते त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी करंडक दिला जाईल:-
अनुक्रमांक
|
विद्यालयाचे नाव
|
क्षेत्र
|
1.
|
जवाहर नवोदय विद्यालय, पतियाळा
|
चंदीगड
|
2.
|
जवाहर नवोदय विद्यालय, कोझिकोड, केरळ
|
हैदराबाद
|
3.
|
जवाहर नवोदय विद्यालय, जगतसिंगपूर, ओडिशा
|
भोपाळ
|
4.
|
जवाहर नवोदय विद्यालय, सहारनपूर, उत्तर प्रदेश
|
लखनौ
|
5.
|
जवाहर नवोदय विद्यालय, राजगीर, बिहार
|
पाटणा
|
6.
|
जवाहर नवोदय विद्यालय, पूर्व खासी हिल्स-1, मेघालय
|
शिलाँग
|
7.
|
जवाहर नवोदय विद्यालय, बाडमेर, राजस्थान
|
जयपूर
|
S.Tupe/M.Ganoo/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2093131)
Visitor Counter : 15