रेल्वे मंत्रालय
खऱ्या प्रवाशांना तिकीट सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वे वचनबद्ध, रेल्वे यंत्रणेच्या निष्ठेचे रक्षण करण्यासाठी अनियमिततेची तक्रार करण्याचे जनतेला केले आवाहन
Posted On:
12 JAN 2025 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जानेवारी 2025
"सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला निकाल हा खऱ्या रेल्वे प्रवाशांच्या हक्कांचे रक्षण करणारा ऐतिहासिक निर्णय आहे असे रेल्वे संरक्षण दलाचे महासंचालक मनोज यादव यांनी म्हटले आहे. बेईमान घटकांकडून तिकीट प्रणालीच्या गैरवापराच्या समस्येचे निराकरण करून, हा निर्णय भारतीय रेल्वेच्या तिकीट प्रक्रियेत पारदर्शकता आणि वास्तविकता राखण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो. भारतीय रेल्वेची तिकीट प्रक्रिया सर्वांसाठी उपलब्ध आहे हे सुनिश्चित करत कायदेशीर प्रवाशांसाठी तिकीट मिळणे सुकर होऊन वैयक्तिक फायद्यासाठी या प्रणालीचा गैरवापर करणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई सुरू ठेवणे या आपल्या ध्येयावर RPF अर्थात रेल्वे सुरक्षा दल अचल आहे. प्रवाशांनी कोणतीही अनियमितता आमच्या निदर्शनास आणत रेल्वे प्रणालीची निष्ठा सुनिश्चित करण्यासाठी आम्हाला साथ देण्याचे आवाहन आम्ही करीत आहोत. सर्व तक्रारींसाठी 139 हा सामायिक हेल्पलाईन क्रमांक आहे. याशिवाय, RailMadad पोर्टलद्वारे देखील अनियमितता नोंदविली जाऊ शकते. सर्वांसाठी योग्य आणि कार्यक्षम प्रवासाचा अनुभव सुनिश्चित करून, रेल्वे व्यवस्थेची अखंडता टिकवून ठेवण्याची हमी RPF प्रवाशांना देत आहे.”
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे परिणाम दूरगामी आहेत, कारण ते तिकीट खरेदीतील बेकायदेशीर कामगिरीला आळा घालण्यासाठी आणि रेल्वे तिकीट प्रणालीवर विश्वास पुनर्प्रस्थापित करण्यासाठी एक उदाहरण निर्माण करत आहे. अधिकृत एजंट आणि व्यक्ती स्थापित नियमांच्या चौकटीत कार्य करत सर्वांसाठी निष्पक्षता आणि प्राप्तता यांचा प्रचार करतील हेसुद्धा सुनिश्चित केले जात आहे. याशिवाय, अशा प्रकारचे संभाव्य उल्लंघन करणाऱ्यांना एक ठोस संदेश पोहोचत आहे की प्रणालीचा गैरवापर सहन केला जाणार नाही, ज्यामुळे देशभरातील लाखो रेल्वे प्रवाशांना अधिक न्याय्य प्रवास अनुभवता येईल.
* * *
N.Chitale/S.Naik/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2092278)
Visitor Counter : 29