अल्पसंख्यांक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2025 च्या हज यात्रेसाठी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर

Posted On: 11 JAN 2025 1:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 जानेवारी 2025

 

भारत सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या  अंतर्गत कार्यरत असलेल्या हज समितीने 2025 च्या हज यात्रेसाठी दुसरी प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. विविध राज्यांमधून (परिशिष्ट-I नुसार) 3,676 अर्जदारांना तात्पुरत्या जागा वाटप करण्यात आल्या आहेत. 

10 जानेवारी 2025 च्या परिपत्रक क्रमांक 25 नुसार, या अर्जदारांनी 23 जानेवारी 2025 रोजी किंवा त्यापूर्वी हज यात्रेच्या शुल्कापोटी एकूण ₹2,72,300/- (पहिला हप्ता ₹1,30,300 आणि दुसरा हप्ता ₹1,42,000/-) जमा करणे आवश्यक आहे.

याव्यतिरिक्त, अर्जदारांनी परिपत्रक क्रमांक 25 मध्ये नमूद केल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे 25 जानेवारी 2025 पर्यंत त्यांच्या संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशातील हज समित्यांना सादर करणे आवश्यक आहे. सौदी अरेबियातील विमान भाडे आणि खर्चाच्या अंतिम निर्णयावर आधारित, उर्वरित हज रकमेची (तिसरी हप्त्याची) माहिती नंतर कळवली जाईल.

अधिक माहितीसाठी, अर्जदारांना भारतीय हज समितीच्या अधिकृत वेबसाईट https://www.hajcommittee.gov.in  वर उपलब्ध असलेले परिपत्रक क्रमांक 25 पहावे किंवा त्यांच्या संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशातील हज समित्यांशी सपर्क साधावा असा सल्ला देण्यात येत आहे.

अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी, कृपया संपर्क साधा:

मोहम्मद नियाज अहमद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ऑपरेशन्स), हज कमिटी ऑफ इंडिया

ईमेल: dyceop.hci[at]gov[dot]in | फोन: +91-9650426727 

Annexure - I

Sr. No

Name of States/ Union Territory

Waiting List Nos given Provisional Selection

From

To

1

Chhattisgarh

136

160

2

Delhi (NCT)

626

790

3

Gujarat

1724

2207

4

Karnataka

2075

2310

5

Kerala

1712

2208

6

Madhya Pradesh

906

1136

7

Maharashtra

3697

4789

8

Tamil Nadu

1016

1319

9

Telangana

1632

2288

 

 

* * *

NM/H.Kulkarni/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2092023) Visitor Counter : 43