माहिती आणि प्रसारण मंत्रालय
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उद्या प्रयागराज इथे आकाशवाणीच्या विशेष कुंभवाणी वाहिनीचे उद्घाटन आणि 'कुंभ मंगल' धूनचे लोकार्पण
Posted On:
09 JAN 2025 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2025
महाकुंभ 2025 ला समर्पित आकाशवाणीच्या विशेष कुंभवाणी वाहिनीचे (FM 103.5 MHz) उद्घाटन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उद्या प्रयागराज मधील सर्किट हाऊस इथे होणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन देखील दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुंभ मंगल धूनचे लोकार्पणही केले जाणार आहे.
प्रयागराज इथे होणाऱ्या कुंभमेळ्याला उपस्थित राहता येणार नाही अशा नागरिकांना कुंभवाणी वाहिनीवरील थेट प्रसारणाचा लाभ घेता येईल. यामुळे देशभरातल्या तसेच जगातल्या लोकांना या ऐतिहासिक महाकुंभमेळ्याचे वातावरण अनुभवता येईल. प्रसार भारती या देशातल्या सार्वजनिक प्रसारण सेवेद्वारे हा उपक्रम भारताच्या ऐतिहासिक धार्मिक परंपरांना प्रोत्साहन देण्याबरोबरच भाविकांना महत्त्वाची माहिती पुरविणे आणि लोकांना घरातूनच सुविधाजनक वातावरणात सांस्कृतिक अनुभव घेता यावा यासाठी सुरू करण्यात येत आहे.
कुंभवाणी एक दृष्टीक्षेप
- कुंभवाणी वाहिनी – परिचय व प्रसारण कालावधी
- प्रसारण कालावधी – 10 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025
- प्रसारणाची वेळ – सकाळी 5.55 ते रात्री 10.05
- फ्रीक्वेन्सी - एफएम 103.5 मेगाहर्टझ्
* * *
S.Kane/S.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2091623)
Visitor Counter : 27