कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आरटीआय पोर्टलचे कामकाज सुरळीत सुरू, ओटीपी बाबतच्या तक्रारींवर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण

Posted On: 09 JAN 2025 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2025

 

कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) माहितीचा अधिकार पोर्टलच्या कामकाजाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांबाबत सर्व प्रकारची तपासणी करुन, नवी वन टाइम पासवर्ड (ओटीपी) सुविधा सुरू केल्यानंतरही पोर्टलचे काम सुरळीतपणे चालू असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. डीओपीटी ने सर्वंकष आढावा घेऊन पोर्टलच्या सुधारित सुरक्षा प्रणालीसह सर्व नव्याने सुरू केलेल्या सुविधा कार्यरत आणि उपभोक्त्यांसाठी वापरण्यास सुलभ आहेत असल्याचे निश्चित केले आहे.

काही वापरकर्त्यांनी दाखल केलेल्या समस्यांना उत्तर देताना डीओपीटी ने स्पष्ट केले आहे की, 2 जानेवारी 2025 पासून सुरू करण्यात आलेली ओटीपी सुविधा वापरकर्त्यांची अधिकृतता जाणून घेण्यासाठी आणि माहिती अधिकार कायद्याअंतर्गत भरलेल्या अर्जातील संवेदनशील वैयक्तिक माहितीच्या संरक्षणासाठी अमलात आणण्यात आली आहे. केवळ अधिकृत व्यक्तींनाच पोर्टल वापरण्याची परवानगी मिळेल अशा प्रकारच्या या उपाययोजनेमुळे पोर्टलची सायबरसुरक्षा मजबूत झाली आहे आणि पोर्टल सर्वोत्तम सुविधांशी सुसंगत बनले आहे.  

ओटीपी  विलंबाने मिळत असल्याच्या तक्रारी डीओपीटीकडे दाखल झाल्या आहेत. NIC च्या इमेल डोमेनमधून तत्काळ ओटीपी  पाठवले जात असून NIC सर्वर अथवा जीमेल, याहू यासारख्या इतर इमेल डोमेनमधील व्यवहारांच्या वाढत्या संख्येमुळे काही वेळा ओटीपी  मिळण्यास विलंब होऊ शकतो असे स्पष्टीकरण डीओपीटीने दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे ओटीपीचा वापर होईपर्यंत ते कालबाह्य होत नाहीत, याचाच अर्थ ज्यावेळी ओटीपी  मिळेल त्यावेळी लगेचच वापरकर्ते आपल्या अर्जाबाबतचे तपशील जाणून घेऊ शकतात. 9 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.55 वाजता 9,782 वापरकर्त्यांनी नव्या प्रणालीच्या माध्यमातून यशस्वीपणे आपल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेतली यातून या पोर्टलची विश्वासार्हता अधोरेखित होते.

काही वापरकर्त्यांनी या जास्तीच्या प्रक्रिया गुंतागुंत वाढवित असल्याची टीका केली. मात्र या उपाययोजनेमुळे वापरकर्त्यांच्या खाजगी माहितीचे संरक्षण होत आहे आणि सुरळीत कार्यपद्धतीच्या हमीच्या दृष्टीने या प्रणालीची संपूर्ण तपासणी करण्यात आल्याचा पुनरुच्चार डीओपीटीने केला आहे.  

मदतसेवा (हेल्पलाईन )उपलब्ध होत नसल्याच्या वापरकर्त्यांनी दाखल केलेल्या तक्रारींबाबत विभागाने नमूद केले आहे की, वापरकर्ते तत्काळ सहाय्यासाठी 011-24622461 या क्रमांकावर कामकाजाच्या नियमित वेळेत (सार्वजनिक सुटी वगळता, सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.00 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत) आरटीआय  हेल्प डेस्कशी संपर्क साधू शकतात.

 

* * *

S.Kane/S.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2091452) Visitor Counter : 35