संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नवी दिल्लीत मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांची भेट घेणार
Posted On:
07 JAN 2025 11:11AM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या अर्थात 08 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.चर्चेदरम्यान, दोन्ही मंत्री मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलांची क्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षण, नियमित सराव, संरक्षण प्रकल्प, कार्यशाळा आणि चर्चासत्रांसह द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेतील. तसेच संरक्षण उपकरणे आणि साठ्यांच्या पुरवठा यावर देखील चर्चा होणार आहे. भारत आणि मालदीवमध्ये आध्यात्मिक, ऐतिहासिक, भाषिक आणि वांशिक संबंध आहेत. भारताच्या ‘नेबरहुड फर्स्ट/शेजारी राष्ट्र प्रथम’ धोरणामध्ये मालदीवचे विशेष स्थान आहे. याचा उद्देश हिंद महासागर क्षेत्रात (IOR) स्थिरता आणि समृद्धी आणणे हा आहे. तसेच, दोन्ही राष्ट्रे IOR चे संरक्षण आणि सुरक्षितता राखण्यात प्रमुख भागीदार आहेत. या माध्यमाने भारताच्या दृष्टीकोणानुसार सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास (SAGAR) यात दोन्ही देश योगदान देत आहे. मालदीवचे संरक्षण मंत्री 08 ते 10 जानेवारी 2025 या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दरम्यान ते गोवा आणि मुंबईलाही भेट देणार आहेत.
***
JPS/HK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2090859)