राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
azadi ka amrit mahotsav

एनएचआरसी, इंडिया तर्फे “व्यक्तीचा सन्मान आणि स्वातंत्र्य- हाताने सफाई करणाऱ्या कामगारांचे हक्क’ या विषयावर खुल्या सभागृह चर्चेचे आयोजन


NHRC, भारताचे अध्यक्ष, न्यायमूर्ती श्री व्ही. रामसुब्रमण्यन यांनी सांडपाणी आणि घातक कचऱ्याची हाताने साफसफाई करण्याबाबत कायदेशीर तरतुदी असूनही स्वच्छता कामगारांच्या मृत्यूच्या घटनांबद्दल केली चिंता व्यक्त

Posted On: 06 JAN 2025 5:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025

राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC), भारताने नवी दिल्ली येथील आपल्या प्रांगणात ‘व्यक्तीची प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य- हाताने सफाई करणाऱ्या कामगारांचे हक्क’ या विषयावर हायब्रिड मोडमध्ये खुल्या सभागृहात चर्चा आयोजित केली. NHRC, भारताचे अध्यक्ष, न्यायमूर्ती श्री व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली ही चर्चा सदस्यांच्या उपस्थितीत झाली. विजया भारती सयानी आणि न्यायमूर्ती (डॉ) विद्युत रंजन सारंगी, सरचिटणीस भरत लाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांमध्ये विविध मंत्रालये आणि राज्य सरकारे, स्वयंसेवी संस्था, मानवाधिकार रक्षक, संयुक्त राष्ट्रच्या एजन्सी, खाजगी संस्था आणि संशोधन विद्वानांचे प्रतिनिधी समाविष्ट होते. या सर्वांनी हाताने सफाई करणाऱ्या कामगारांच्या हक्कांवरील समर्पक मुद्द्यांवर चर्चा केली आणि त्यांचा सन्मान सुनिश्चित करण्यासाठी वैचारिक योगदान दिले.

NHRC, भारताचे अध्यक्ष म्हणाले की मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग हे एक असे क्षेत्र आहे ज्याचा समूळ नायनाट करण्यासाठी कायदेशीररित्या हाताळले जात आहे, कार्यकारी पद्धतीने व्यवस्थापित केले जात आहे आणि त्याचे निर्मूलन करण्यासाठी न्यायिकरित्या पर्यवेक्षण केले जात आहे. तथापि, सांडपाणी आणि घातक कचऱ्याची हाताने साफसफाई करण्याच्या कायदेशीर तरतुदी असूनही स्वच्छता कामगारांच्या मृत्यूच्या घटना घडत आहेत.

न्यायमूर्ती रामसुब्रमण्यम म्हणाले की, उपाय सुचवण्यासाठी कारणे अभ्यासणे आणि समजून घेणे आवश्यक आहे.

याआधी, चर्चेचा विषय मांडताना, NHRC, भारताचे सरचिटणीस, भरत लाल म्हणाले की आयोगाने विविध राज्यांद्वारे यांत्रिक साफसफाईच्या प्रक्रियेची अंमलबजावणी आणि या संदर्भात निर्देशित केलेली पावले उचलली आहेत.

डॉ.बलराम सिंग विरुद्ध भारतीय संघ आणि Ors प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विविध राज्यांनी सर्व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तीन वर्षांपर्यंतचा कार्यक्रम तयार केल्याचे समोर आले आहे. या प्रथेमुळे काही जाती आणि समुदाय विषमतेने कसे प्रभावित होतात यावरही त्यांनी प्रकाश टाकला.

तत्पूर्वी, NHRC, भारताचे सहसचिव, देवेंद्र कुमार निम यांनी तीन तांत्रिक सत्रांचे विहंगावलोकन दिले - 'भारतातील सेप्टिक आणि टँकमध्ये होणाऱ्या मृत्यूच्या समस्येवर लक्ष देणे,' ' हाताने साफसफाई करण्यावर संपूर्ण बंदी घालण्याची गरज,' आणि ' हाताने साफसफाई करणाऱ्या कामगारांसाठी पुनर्वसन उपाय: सन्मान आणि सशक्तीकरण आणि पुढे जाण्याचा मार्ग अशी ही तीन सत्रे होती. 'ते म्हणाले की हाताने केली जाणारी सफाई हे समाजासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे, ज्याला एकत्रित सामूहिक प्रयत्नांनी संबोधित करणे आवश्यक आहे.

वक्त्यांमध्ये प्रभात कुमार सिंग, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ, बेझवाडा विल्सन, राष्ट्रीय संयोजक, सफाई कर्मचारी आंदोलन, नवी दिल्ली, सुजॉय मजुमदार, वरिष्ठ वॉश विशेषज्ञ, युनिसेफ इंडिया, युसूफ कबीर, पाणी स्वच्छता आणि स्वच्छता विशेषज्ञ, युनिसेफ, भारत, रोहित कक्कर, सीपीएचईईओ, रशीद करिमबनक्कल, संचालक, जेनरोबोटिक्स इनोव्हेशन्स, केरळ, बैशाली लाहिरी, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, विनोद कुमार, कायदा आणि केंद्र फॉर ह्युमन राइट्स अँड सबाल्टर्न स्टडीज, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे संचालक, मंजुला प्रदीप, वायवे फाऊंडेशन, प्रा. शीवा दुबे, फ्लेम विद्यापीठ, पुणे, एम. कृष्णा, व्यवस्थापकीय संचालक, काम-अविदा एन्व्हायरो इंजिनियर्स प्रा. लि., स्मृती पांडे, सल्लागार, NITI आयोग, यांचा त्यात समावेश होता.

चर्चेतून आलेल्या काही सूचना पुढीलप्रमाणे आहेत;

i.) प्रभावी कल्याणकारी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी चांगले प्रतिनिधित्व आणि ग्राउंड-लेव्हल मॉनिटरिंगची आवश्यकता;

ii.) पुनर्वसन कार्यक्रम आणि किमान वेतनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वेक्षण करणे;

iii.) 2013 च्या कायद्यात स्वच्छता कर्मचारी आणि हाताने काम करणारे  सफाई कामगार यांच्यातील फरक करणे आवश्यक;

iv.) शाश्वत उपजीविकेसाठी समान सक्षमीकरण करणाऱ्या महिलांच्या नेतृत्वाखालील बचत गटांसाठी स्वच्छता आणि प्रशिक्षणासाठी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देणे;

v.) ‘एसबीएम’  आणि ‘नमस्ते’ योजनांतर्गत मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग डेटा आणि सीवर डेथ रिपोर्टिंग, बजेट विश्लेषण आणि जागरूकता मोहिमांमध्ये पारदर्शकता आवश्यक आहे.;

vi.) मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग अर्थात मानवी मैला वाहून नेणारे  आणि गटार साफसफाईमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी क्षमता-निर्माण प्रशिक्षण;

vii.) घातक कचरा साफ करण्यासाठी तांत्रिक नवकल्पना घेऊन येणाऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे;

viii.) डी-स्लेजिंग मार्केटचे पॅनेलिंग आणि त्याच्या ऑपरेशन्सचे नियमन करणे;

ix.) सुरक्षा उपकरणे पुरवणे आणि जनजागृती कार्यशाळा आयोजित करणे;

x.) आरोग्य विमा, शिक्षण इत्यादींसाठी डेटाबेस तयार करण्यासाठी हाताने साफसफाई करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी देखरेख यंत्रणेची आवश्यकता;

कायदेशीर आणि धोरणात्मक तरतुदींची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आणि धोकादायक आणि सांडपाणी कचऱ्याची हाताने साफसफाई तसेच अक्षय कामगारांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी या सूचनांवर आयोग विचार करेल.

Jaydevi PS/H.Kenekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2090610) Visitor Counter : 32