संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सौराष्ट्रात पोरबंदर येथे भारतीय तटरक्षक दल (ICG) चे ALH MK-III हेलिकॉप्टर अपघातग्रस्त

Posted On: 05 JAN 2025 5:54PM by PIB Mumbai

 

भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) ALH MK-III या हेलिकॉप्टरला 5 जानेवारी 2025 रोजी गुजरातमधील पोरबंदर विमानतळाच्या धावपट्टीवर दुपारी  12.15 च्या सुमारास अपघात झाला. तटरक्षक दलाचे हे हेलिकॉप्टर, दोन चालक आणि एक बचावपटू (एअरक्रू डायव्हर) यांच्यासह नियमित प्रशिक्षणाच्या उड्डाणावर होते.

दुर्घटनेनंतर ताबडतोब, तिघांना बाहेर काढण्यात आले आणि पोरबंदरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.  या दुर्घघटनेमागची कारणे चौकशी समितिकडून तपासली जात आहेत.

कमांडंट (जेजी) सौरभ, डेप्युटी कमांडंट एसके यादव आणि मनोज प्रधान नाविक यांच्यावर सेवा परंपरा आणि इतमामानुसार अंत्यसंस्कार केले जातील.

***

S.Kane/A.Save/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2090389) Visitor Counter : 39