रेल्वे मंत्रालय
रेल्वे मंत्रालय: वर्ष अखेर पुनरावलोकन 2024
2024 मध्ये भारतीय रेल्वेच्या 6,450 किमी लांबीच्या रेल्वे रुळांचे संपूर्ण नूतनीकरण, 8,550 टर्नआउटचे नूतनीकरण, रेल्वेचा वेग 130 किमी प्रति तासावरून 2,000 किमी प्रति तासावर
2024 मध्ये भारतीय रेल्वेच्या 3,210 आरकेएम मार्गांचे विद्युतीकरण, अक्षय ऊर्जा क्षमता 2,014 मेगावॅटवर नेऊन, विद्युतीकृत बीजी नेटवर्कचा 97% पर्यंत विस्तार
विक्रमी संख्येने 136 वंदे भारत रेल्वे गाड्या आणि पहिली नमो भारत रॅपिड रेल्वेची सुरुवात, गर्दीच्या हंगामात रेल्वेच्या 21,513 विशेष फेऱ्या
2024 मध्ये भारतीय रेल्वेने केली 1,473 मेट्रिक टन मालवाहतूक, ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (EDFC) आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (WDFC) च्या माध्यमातून रेल्वेच्या 72,000 हून अधिक फेऱ्यांमुळे महसुलात 3.86% वाढ
अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत 1,337 स्थानकांपैकी 1,198 स्थानकांच्या कामाची सुरुवात
कवच सुरक्षा तंत्रज्ञानाने 10,000 लोको सुसज्ज, 9000 तंत्रज्ञ प्रशिक्षित, आणि 15,000 आरकेएम साठी मागवली बोली
80 स्थानके आणि 78 संरचनांसह भारतीय रेल्वेच्या वारसा स्थळांचे डीजीटायझेशन ‘घूम’सारख्या सणांनी दिली पर्यटनाला चालना
Posted On:
29 DEC 2024 10:18AM by PIB Mumbai
भारतीय रेल्वेने 2024 मध्ये विकसित भारत 2047 च्या दिशेने परिवर्तन घडवणारा आपला प्रवास पुढे नेत, आधुनिकीकरण आणि प्रगतीच्या नव्या युगाचा मार्ग मोकळा केला. जागतिक दर्जाच्या प्रवासाच्या अनुभवावर भर देत, मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढवत आणि प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून, रेल्वेने राष्ट्रीय विकासाला प्रेरणा देणारा, म्हणून आपली भूमिका अधिक मजबूत केली. आधुनिक स्थानके, अत्याधुनिक गाड्या आणि नवोन्मेशी सुरक्षा यंत्रणा, रेल्वे प्रवासाचा परिप्रेक्ष्य नव्याने घडवत आहे. शाश्वततेशी वचनबद्धता ठेवत, पायाभूत सुविधांमधील व्यापक सुधारणा, आणि क्षमता विकासाद्वारे आर्थिक वृद्धीला चालना देताना, भारतीय रेल्वे हरित परिचालनाच्या दिशेने अविचल वाटचाल करत आहे. गतिशील आणि विकासाभिमुख देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परंपरेचा मेळ नवोन्मेषाबरोबर घालून, जागतिक दर्जाचे परिवहन नेटवर्क बनण्याचा भारतीय रेल्वेचा दृष्टीकोन यंदा अधिक बळकट झाला आहे.
रेल्वे ट्रॅकच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि वाढलेला वेग
ट्रॅकच्या नूतनीकरणाची कामे:
o 6200 ट्रॅक किमी रेल्वेचे नवीन रेल्वेसह नूतनीकरण करण्यात आले.
o 6450 ट्रॅक किमीसाठी संपूर्ण ट्रॅकचे नूतनीकरण करण्यात आले.
o टर्नआउट नुतनीकरणा द्वारे 8550 संचांचे नूतनीकरण करण्यात आले.
विभागीय गती वाढवण्यात आली:
- गोल्डन चतुष्कोन आणि कर्ण मार्ग आणि इतर B मार्गांच्या भागाचा समावेश करून, 2000 ट्रॅक किमी पेक्षा जास्त क्षेत्रात विभागीय वेग 130 किमी प्रति तासापर्यंत वाढवण्यात आला.
- 7200 ट्रॅक किमी पेक्षा जास्त क्षेत्रात विभागीय वेग 110 किमी प्रतितास पर्यंत वाढवला.
प्रकल्प अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन:
- भारतीय रेल्वे ई-प्रोक्योरमेंट सिस्टम (IREPS) वरील विविध विभागीय रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागातील सर्व प्रलंबित प्रकरणे “विवाद से विश्वास II (कंत्राटी विवाद)” नावाच्या “वनटाइम सेटलमेंट योजनेअंतर्गत” निकाली काढण्यात आली.
- अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम (EPC) निविदा मोडमधील अनिश्चितता दूर करण्यासाठी, आयटमाइज्ड कामांच्या स्वतंत्र बिल ऑफ क्वांटिटीज (BoQ) साठी नवीन "शेड्यूल G-1" समाविष्ट करण्यात आले.
- कॉन्सिलिएटर/डीएबी सदस्य/एसएटी सदस्य/लवाद नियुक्त करणे आणि त्यांना देय शुल्क याबाबतच्या विवादांचे निराकरण करणाऱ्या यंत्रणेसाठी मास्टर पॉलिसी जारी करण्यात आली.
- प्रकल्प व्यवस्थापन सेवा (PMS)/ प्रकल्प देखरेख सेवा एजन्सी (PSSA) करारासाठी, मोजमाप, चाचणी तपासणी मर्यादा, सामग्री उत्तीर्ण करणे आणि देयके इत्यादीसाठी प्रक्रिया आदेश जारी करण्यात आला.
- प्रकल्प पूर्णत्वाला गती देण्यासाठी, अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम (EPC) निविदांसह सर्व कामांच्या करारासाठी मुख्य प्रशासकीय अधिकारी/बांधकाम यांना पूर्ण अधिकारांसह विविध स्वीकृत प्राधिकरणांच्या कामाच्या निविदा स्वीकारण्याचे अधिकार वाढवण्यात आले. प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीसाठी मोडल SOP-2018 चे इतर अधिकार फील्ड युनिट्सना सुपूर्द करण्यात आले.
- कामांच्या निविदांसाठी इलेक्ट्रॉनिक रिव्हर्स ऑक्शन (ई-आरए) केवळ ऐच्छिक करण्यात आले.
- वेब आधारित सीआरएस मंजुरी मॉनिटरिंग सिस्टमसाठी पुढील चार नवीन मॉड्यूल बनवण्यात आले:
- रेल्वे आणि डेव्हीएशन मार्गांच्या अतिरिक्त लाईन्स उघडणे (नवीन लाईन्स/GC/दुहेरीकरण इ.)
- प्रमुख आणि महत्त्वाच्या पुलांची पुनर्बांधणी (नवीन, नूतनीकरण)
- किरकोळ कामांना मंजुरी:- लेव्हल क्रॉसिंग (मॅनिंग, अपग्रेडेशन, इंटरलॉकिंग, नवीन एलसी, शिफ्टिंग, एलएचएस)
- यार्ड्सचे रीमॉडेलिंग
- रेल्वेसाठी राजपत्र अधिसूचनेच्या संदर्भात प्रधान मुख्य अभियंत्याद्वारे किरकोळ कामे उघडण्यासाठीचा प्रक्रिया आदेश (प्रवाशांच्या सार्वजनिक वाहनांसाठी उघडणे) दुरुस्ती नियम, 2024 जारी करण्यात आला.
- ‘ट्रॅक मेंटेनर्ससाठी मानदंड/यार्डस्टिक्स’ बाबत सुधारित एमसीएनटीएम (ट्रॅक मेंटेनर्ससाठी मनुष्यबळ आणि खर्च नियम) सूत्र- २०२४ जारी करण्यात आले.
- ट्रॅकच्या देखभालीसाठी मनुष्यबळ / उपक्रमांच्या आउटसोर्सिंगच्या खर्चासाठी (महसूल), "PU-49" अशा नावाचे एक नवीन प्राथमिक युनिट (प्रमाण) तयार करण्यात आले.
2024 (जाने ते नोव्हेंबर 2024) दरम्यान रेल्वे पुलांवरील रस्ते (ROBs)/पुलां खालील रस्त्यांचे (RUBs) बांधकाम पुढील प्रमाणे:
- मानवी लेव्हल क्रॉसिंग बंद करण्यात आली – 718
- ROBs/RUBs चे बांधकाम -1024
गतीशक्ती प्रकल्प
1. गती शक्ती मल्टी-मोडल कार्गो टर्मिनल
कार्गो टर्मिनल्सच्या उभारणीत उद्योगांकडून गुंतवणुकीला चालना देण्यासाठी देशभरात ‘गती शक्ती मल्टी-मोडल कार्गो टर्मिनल्स (जीसीटी) विकसित करण्यात येत आहेत.
- आतापर्यंत, देशभरात 354 (रेल्वेच्या मालकीची जमीन नसलेली 327 आणि रेल्वेच्या जमिनीवर 27) जागा निश्चित करण्यात आल्या.
- 31.10.2024 पर्यंत, 91 GCT कार्यान्वित करण्यात आले.
2. 2024 मध्ये तीन आर्थिक कॉरिडॉरना मंजुरी
पुढील तीन कॉरिडॉर अंतर्गत:
(i) ऊर्जा, खनिज आणि सिमेंट कॉरिडॉर;
(ii) उच्च घनतेच्या रहदारीचे मार्ग आणि
(iii) रेल सागर कॉरिडॉर,
या तीन कॉरिडॉर अंतर्गत एकूण 434 प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वर्ष 2024 मध्ये, तीन आर्थिक कॉरिडॉरमध्ये या 434 प्रकल्पांपैकी एकूण 58 प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली असून, ते पूर्ण करण्यासाठीचा एकूण खर्च सुमारे 88,875 कोटी रुपये इतका आहे, आणि ट्रॅकच एकूण लांबी सुमारे 4,107 किलोमीटर इतकी आहे.
- ऊर्जा, खनिज आणि सिमेंट कॉरिडॉरमध्ये 2,911 किलोमीटरचे 51 प्रकल्प असून, त्याच्या पूर्णतेचा एकूण खर्च रु. 57,313 कोटी इतका आहे.
- उच्च घनतेच्या रहदारीच्या मार्गांमध्ये 5 प्रकल्प समाविष्ट असून ते सुमारे 830 किलोमीटर लांबीचे आहेत आणि त्याचा खर्च सुमारे 11,280 कोटी इतका आहे.
- रेल सागर कॉरिडॉरमध्ये 2 प्रकल्प असून ट्रॅकची एकूण लांबी सुमारे 366 किलोमीटर असेल आणि पूर्ण करण्यासाठी सुमारे रु. 20,282 कोटी खर्च येईल.
3. 2024 मध्ये आतापर्यंत सुरु करण्यात आलेले प्रकल्प
Plan Head
|
Commissioning (Km)
|
New Line
|
1158
|
Gauge Conversion
|
259
|
Doubling
|
2016
|
Total
|
3433
|
भारतीय रेल्वेने 01.04.2024 पासून आतापर्यंत एकूण 3433 किमी लांबीचे मार्ग सुरु केले असून, यामध्ये 1158 किमी नवीन लाईन, 259 किमी गेज रूपांतरण आणि 2016 किमी दुहेरीकरण यांचा समावेश आहे.
4. वर्ष 2024 मधील विद्युतीकरण
वर्ष 2024 मध्ये 3,210 Rkms चे विद्युतीकरण करण्यात आले आणि IR चे विद्युतीकरण आणि BG नेटवर्कचा 97% पर्यंत विस्तार करण्यात आला.
स्थानकांचा पुनर्विकास
- ‘अमृत भारत स्थानक योजने’ अंतर्गत पुनर्विकासासाठी 1337 रेल्वे स्थानके निश्चित करण्यात आली.
- 1337 पैकी, 1198 रेल्वे स्थानकांच्या निविदा मंजूर झाल्या, आणि त्याचे काम सुरू झाले. इतर रेल्वे स्थानके निविदा आणि नियोजनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. देशभरातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासामुळे, अधिक रोजगाराची निर्मिती आणि आर्थिक वृद्धीसह अर्थव्यवस्थेवर गुणात्मक प्रभाव पडेल.
- पश्चिम मध्य रेल्वेचे राणी कमलापती स्थानक, पश्चिम रेल्वेचे गांधीनगर कॅपिटल स्थानक, दक्षिण पश्चिम रेल्वेचे सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल स्थानक, उत्तर पूर्व रेल्वेच्या गोमती नगर रेल्वे स्थानकाचा पहिला टप्पा, उत्तर रेल्वेचे अयोध्या रेल्वे स्थानक आणि ईस्ट कोस्ट रेल्वेचे कटक रेल्वे स्थानक, ही सहा स्थानके विकसित करून कार्यान्वित करण्यात आली आहेत.
टेलिकॉमशी संबंधित माहिती :-
- नो एलिफंट इंट्रुजन डिटेक्शन सिस्टम (EIDS): हत्तींमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी NFR (ईशान्य फ्रंटियर रेल्वे) वरील सर्वाधिक असुरक्षित ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या उद्देशाने भारतीय रेल्वेच्या NFR, ECoR, SR, NR, SER, NER आणि WR झोनचा समावेश करून एकूण 208.02 कोटी खर्चाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्याशिवाय, 582.25 किमी (NFR-141 RKms + ECoR-349.4 RKms + SR- 55.85 RKms + NER-36 RKms) मार्गावरील काम मंजूर झाले असून, सध्या 141 RKms पेक्षा अधिक लांबीच्या मार्गावर यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.
- NTES सह एकत्रित प्रशिक्षक मार्गदर्शन प्रणाली (CGS) आणि ट्रेन इंडिकेटर बोर्ड (TIB) ची देखरेख करण्यासाठी ऍप्लिकेशन विकसित केले: रेल्वे बोर्डाने झोनल रेल्वे आणि CRIS यांना RDSO स्पेसिफिकेशन्स रिव्हिजन-4 चे पालन करणारे आणि API आधारित इंटरफेस वापरून CGS आणि TIB चे एकत्रीकरण करण्याची सूचना दिली आहे. CRIS ने NTES सह IPIS च्या एकत्रीकरणाच्या देखरेखीसाठी एक ऍप्लिकेशन विकसित केले आहे.
- केंद्रीकृत उद्घोषणा प्रणाली: WCR अंतर्गत भोपाळ विभागातील सर्व स्थानकांवर आणि ECR अंतर्गत दीनदयाल उपाध्याय (DDU) विभागातील सर्व स्थानकांवर केंद्रीकृत सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली पुरवण्यात आली.
- भारतीय रेल्वेमध्ये डिजिटल VHF संचांचा वापर: लोको पायलट आणि गार्ड यांच्यातील संवाद. डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित VHF संचांचे फायदे मिळवण्यासाठी, रेल्वे बोर्डाने भारतीय रेल्वेसाठी केवळ डिजिटल 5W वॉकी-टॉकी संच खरेदी करायला मान्यता दिली आहे.
- टनेल कम्युनिकेशन सिस्टीम (बोगद्यामधील संवाद प्रणाली): टनेल कम्युनिकेशनची सुविधा पुरवणारा प्रकल्प विविध रेल्वे मार्गांवर हाती घेण्यात आला आहे.
- ऑप्टिकल फायबर केबल (OFC): आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये, भारतीय रेल्वेने नोव्हेंबर 2024 पर्यंत 1411 Rkms ऑप्टिकल फायबरचे जाळे तयार केले. त्याद्वारे, IR नेटवर्कचे एकत्रितपणे अंदाजे 66588 RKms. जाळे निर्माण झाले आहे. तसेच 24 नोव्हेंबर पर्यंत 801 RKMs Quad पुरवले गेले, ज्यामुळे एकूण अंदाजे 66271 RKms IR नेटवर्क उपलब्ध झाले.
- रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सुविधा: आतापर्यंत 6112 स्थानकांवर वाय-फाय सुविधा पुरविण्यात आली.
- रेल्वे स्थानकांवर क्लोज्ड सर्किट टेलिव्हिजन (CCTV): भारतीय रेल्वेने हॉल्ट स्टेशन वगळता सर्व स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कामांना मंजुरी दिली आहे. आतापर्यंत एकूण 1051 स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले.
अक्षय उर्जेच्या दिशेने महत्वाचे टप्पे
- भारतीय रेल्वेने 2030 पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जक बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
- नोव्हेंबर 2024 पर्यंत, अंदाजे 487 मेगावॅटची सौर संयंत्र (छतावरील आणि जमिनीवरील) आणि सुमारे 103 मेगावॅटचे पवन ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले.
- याव्यतिरिक्त, 100 मेगावॅट अक्षय ऊर्जा – चोवीस तास (RE-RTC) उपलब्ध झाली.
- अंदाजे 2014 मेगावॅट शाश्वत क्षमता जोडली गेली.
समर्पित मालवाहतूक मार्गिका प्रकल्प (EDFC आणि WDFC) ( आतापर्यंत झालेली प्रगती)
धावणाऱ्या ट्रेन्सची संख्या (ऑक्टोबर 2024)
Corridor
|
No. of trains run
|
GTKM (Millions)
|
Average speed (kmph)
|
October 2024
|
Cumulative (FY 24-25)
|
October 2024
|
Cumulative (FY 24-25)
|
EDFC
|
5,915
|
41,054
|
11,088
|
73,022
|
44.6
|
WDFC
|
5,109
|
31,563
|
5,643
|
33,255
|
51.3
|
Total
|
11,024
|
72,617
|
16,731
|
1,06,277
|
|
रेल्वे सेवा: भारतीय रेल्वे – प्रवाशांच्या मागण्यांनुरुप
वंदे भारतः
- 26 डिसेंबर 2024 पर्यंत, भारतीय रेल्वे नेटवर्कवर एकूण 136 वंदे भारत ट्रेनच्या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.
- कॅलेंडर वर्ष 2024 मध्ये, भारतीय रेल्वेने 62 वंदे भारत गाड्या सुरू केल्या.
नमो भारत जलद रेल्वे:
- अहमदाबाद ते भुज दरम्यान पहिली नमो भारत जलद रेल्वे 17 सप्टेंबर 2024 रोजी सुरू करण्यात आली.
अमृत भारत सेवा:
- अमृत भारत सेवा, या पूर्णपणे अ-वातानुकूलित ट्रेन्स असून, त्यामध्ये सध्या 12 स्लीपर क्लास कोच आणि 8 सर्वसाधारण डबे आहेत, याद्वारे प्रवाशांना उच्च दर्जाची सेवा पुरविण्यात येत आहे.
- कॅलेंडर वर्ष-2024 मध्ये, दरभंगाते आनंद विहार(टी) एक्सप्रेस आणि मालदा टाउन ते SMVT बेंगळुरू एक्सप्रेस, या 4 अमृत भारत एक्सप्रेस सेवा सुरू करण्यात आल्या असून अशा आणखी सुरू करण्याचे नियोजन आहे.
विशेष रेल्वे सेवा:
- भारतीय रेल्वेमार्फत 2024 या वर्षात विक्रमी संख्येने विशेष रेल्वे सेवा चालवण्यात आल्या.
- होळी आणि उन्हाळी सुटीच्या काळात होणाऱ्या गर्दीच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, मागील वर्षीच्या 6,896 च्या तुलनेत विशेष गाड्यांच्या एकूण 13,523 फेऱ्या करण्यात आल्या.
- पूजा/दीपावली/छठ या सणांच्या कालावधीत म्हणजे 1 ऑक्टोबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 दरम्यान विशेष गाड्यांच्या 7990 फेऱ्या चालवण्यात आल्या.
भारत गौरव पर्यटक ट्रेन्स:
भारत गौरव' टुरिस्ट ट्रेन या विशिष्ट संकल्पनेवरआधारित पर्यटन सर्किट ट्रेन्स असून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भव्य ऐतिहासिक ठिकाणांचे दर्शन घडविणे हा या ट्रेन्स सुरू करण्यामागील उद्देश आहे.
जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत सुरू झालेल्या भारत गौरव ट्रेन्सचा तपशील
|
|
No of Trip
|
No of Passengers Travelled
|
158
|
104077
|
बुलेट ट्रेन प्रकल्प
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत 243 किमी हून अधिक मार्गाचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तसेच 352 किमीचे पिअर काम आणि 362 किमी पिअरच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे.
- 13 नद्यांवर पूल बांधण्यात आले असून अनेक रेल्वे मार्ग आणि महामार्ग ओलांडण्यासाठी पाच पोलादी पूल आणि दोन PSC पूल उभारण्यात आले आहेत.
- आणंद, बडोदा, सुरत आणि नवसारी जिल्ह्यांमध्ये आरसी (रिइन्फोर्स्ड काँक्रिट) ट्रॅक बेड बांधणीसह गुजरातमध्ये रुळ टाकण्याचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. आरसी ट्रॅक बेडचे 71 किलोमीटरचे बांधकाम पूर्ण झाले आहे, आणि व्हायाडक्टवर रेल्वे वेल्डिंग सुरू झाले आहे.
- महाराष्ट्रात, मुंबई बुलेट ट्रेन स्थानकाच्या जमिनीखाली 10 मजली इमारतीच्या उंची इतक्या म्हणजे 32 मीटर खोल काँक्रीटच्या पायाभरणीचे पहिले काम पूर्ण करण्यात आले. वांद्रे-कुर्ला संकुल(BKC) आणि शिळफाटा दरम्यानच्या 21 किमी टप्प्यातील बोगद्याचे काम सुरू आहे, मुख्य बोगद्याच्या बांधकामासाठी 394 मीटरच्या इंटरमीडिएट बोगद्याचे (ADIT) काम पूर्ण झाले आहे.
- पालघर जिल्ह्यात न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) वापरून डोंगरातील सात बोगद्यांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. गुजरातमधील एकमेव डोंगरातील बोगद्याचे काम यापूर्वीच यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे.
- बुलेट ट्रेनच्या मार्गावरील 12 स्थानकांची रचना संकल्पनाधारित घटक आणि ऊर्जा कार्यक्षम वैशिष्ट्यांसह केली गेली आहे, त्यांचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या वापरकर्ता-स्नेही आणि ऊर्जा-बचत करणाऱ्या स्थानकांमध्ये टिकाऊपणाला प्राधान्य असून जागतिक दर्जाचा प्रवासी अनुभव देण्याच्या अनुषंगाने त्यांची रचना करण्यात आली आहे.
रेल्वे गाड्यांच्या डब्यांच्या संख्येत वाढ:
- सामान्य आणि नॉन-एसी स्लीपर कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी, मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या रचनेबाबतच्या विद्यमान धोरणात 22 डब्यांच्या ट्रेनमध्ये 12 (बारा) सामान्य वर्ग आणि स्लीपर श्रेणीचे नॉन-एसी डबे आणि 08 (आठ) एसी कोचच्या सोयीचा समावेश आहे.
- अनारक्षित डब्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी, 2024 मध्ये LHB (लिंक हॉफमन बुश) डब्यांसह धावणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये 950 हून अधिक सामान्य श्रेणीचे डबे जोडले गेले आहेत.
- रेल्वे सेवेच्या विस्तारासाठी 875 हून अधिक गाड्यांना कायमस्वरूपी डबे जोडण्यात आले.
आधुनिक LHB डबे जोडलेल्या आणखी गाड्या धावणार :
- भारतीय रेल्वेच्या उत्पादनांच्या कारखान्यांमध्ये एप्रिल-2018 पासून फक्त LHB कोचचे उत्पादन करण्यात येत असून सध्या ICF डब्यांसह धावणाऱ्या गाड्यांना त्याजागी LHB डबे जोडून धावू शकतील अशा तऱ्हेने त्यांचे रूपांतर केले जात आहे.
- 2014 मध्ये (नोव्हेंबर-2024 पर्यंत), 75 हून अधिक गाड्यांच्या जोड्यांमध्ये अशा प्रकारे बदल करण्यात आले.
विक्रमी मालवाहतूक
- भारतीय रेल्वेने 24 जानेवारी ते 24 नोव्हेंबर या कालावधीत केलेल्या 1473.05 दशलक्ष टन मालाच्या वाहतुकीतून मिळवलेल्या महसूलात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 3.86% ची वाढ नोंदवली गेली आहे.
कवच प्रणालीने संरक्षित रेल्वे नेटवर्क
· दक्षिण मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील 1465 RKm वर कवच प्रणालीची 3.2 आवृत्ती नियुक्त करण्यात आल्याचा, खूप चांगला परिणाम दिसून आला आहे. याचा वापर करून, आणखी सुधारणा केल्या. अखेर, कवच स्पेसिफिकेशन आवृत्ती 4.0 ला RDSO कडून 16.07.2024 रोजी मान्यता देण्यात आली.
IR च्या स्वयंचलित ट्रेन संरक्षक प्रणाली (कवच) अंमलबजावणीची सद्यस्थिती खालीलप्रमाणे:
कवच ही स्वदेशी विकसित स्वयंचलित ट्रेन संरक्षक (ATP) प्रणाली आहे. कवच ही एक सर्वंकषपणे तंत्रज्ञान-केंद्रित प्रणाली आहे त्यासाठी (SIL-4) हे सर्वोच्च सुरक्षा प्रमाणपत्र मिळणे आवश्यक असते.
कवच प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये पुढील प्रमुख क्रियाकलापांचा समावेश:
· प्रत्येक स्थानकात, गट विभागात स्टेशन कवच बसवणे.
· संपूर्ण ट्रॅकच्या अंतरात RFID टॅग बसवणे.
· संपूर्ण विभागात दूरसंचार टॉवर बसवणे.
· ट्रॅकच्या बाजूने फायबर ऑप्टिकल केबल टाकणे.
· भारतीय रेल्वेवर धावणाऱ्या प्रत्येक इंजिनमध्ये लोको कवचची सोय करणे.
कवच अंमलबजावणीच्या पुढील टप्प्याचे नियोजन पुढीलप्रमाणे:-
SN
|
Items
|
Progress
|
i
|
Laying of Optical Fibre Cable
|
5,133 Km
|
ii
|
Installation of Telecom Towers
|
540 Nos.
|
iii
|
Provision of Kavach at Stations
|
523 Nos.
|
iv
|
Provision of Kavach in Loco
|
707 Locos
|
v
|
Installation of Track Side Equipment
|
3,434 Rkm
|
- 10,000 लोकोमोटिव्ह सुसज्ज करण्याच्या प्रकल्पाला अंतिम रूप देण्यात आले आहे. कवचने सुसज्ज 69 लोको शेड तयार करण्यात आले आहेत.
- अंदाजे 15,000 RKm च्या रुळांच्या बाजूने कवच प्रणाली बसविण्याच्या कामांसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. यामध्ये भारतीय रेल्वेच्या सर्व GQ, GD, HDN आणि निवडण्यात आलेल्या विभागांचा समावेश आहे.
- कवच प्रणाली पुरवण्यासाठी 3 ओईएम मंजूर करण्यात आले आहेत. आणखी OEM कडून चाचण्या आणि मंजुरीचे काम विविध टप्प्यांमध्ये आहे.
- आतापर्यंत 9000 हून अधिक तंत्रज्ञ, ऑपरेटर आणि अभियंत्यांना कवच तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी IRISET च्या सहकार्याने अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत.
डिजिटल उपक्रम – सुविधा प्रवाशांच्या हातात
- आरक्षित क्षेत्रात ई-तिकीटिंगचे प्रमाण 86% वर पोहोचले आहे. चालू आर्थिक वर्षात अनारक्षित क्षेत्रातील ई-तिकीटिंगचे सुरुवातीला 28% असलेले प्रमाण ऑक्टोबर 2024 मध्ये सुमारे 33% पर्यंत वाढले आहे.
- भारतीय रेल्वेने रिफंड प्रक्रियेतही बदल केला आहे त्यामुळे सुमारे 98% रिफंडसाठी पात्र प्रकरणांमध्ये 24 तासांच्या आत परतावा मिळू शकतो.
- डायनॅमिक QR कोड आधारित पेमेंट सुविधेची भारतीय रेल्वेच्या सर्व तिकिटखिडक्यांवर सोय करण्यात आली आहे. ही सुविधा पार्सल कार्यालयांमध्ये देखील उपलब्ध करण्यात आली आहे आणि चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस सर्व पार्सल कार्यालयांमध्ये ती सुरू होईल.
डिजिटल इंडिया उपक्रम -मनुष्यबळ व्यवस्थापन प्रणाली (HRMS)
- प्रमोशनल श्रेण्यांसाठी समुदाय आधारित आरक्षण रोस्टर्स: योग्य प्रमाणीकरणांसह ऑनलाइन रोस्टर निर्मितीसाठी तरतूद, रिक्त स्थान मूल्यांकन आणि DSC स्वाक्षरीसह 5-स्तरीय पडताळणी.
- सर्व कर्मचाऱ्यांच्या ई-सेवा रेकॉर्डची निर्मिती: कर्मचाऱ्यांच्या सर्व कामाचा संपूर्ण मागोवा घेणारी सर्वंकष प्रणाली तयार करण्यात आली आहे, ई-SR मधील नोंदी स्वयंचलितपणे अद्यतनित करण्यासाठी त्यांना कार्यालयीन आदेशांशी जोडण्यात आले आहे.
- मनुष्यबळाचे नियोजन: प्रत्येक 1.45 दशलक्ष पदांसाठी एक सर्वसमावेशक डेटाबेस आणि महसुली पदांची निर्मिती, प्राथमिक युनिटबाहेरील पदांचे पुनर्वितरण, पदांचे समर्पण इ.
- सुधारित हस्तांतरण मॉड्यूलद्वारे सर्व आंतर-रेल्वे आणि आंतर-विभागीय हस्तांतरण विनंती अर्ज, प्रशासकीय बदल्या इ. गोष्टी हाताळल्या जातात. अर्जापासून ते नवीन युनिट्समध्ये रुजू होण्यापर्यंतच्या सर्व रिपोर्ट्सचा त्यामध्ये समावेश आहे.
- ड्युटी पास: ड्युटी पास मॉड्यूल संपूर्ण भारतात नोव्हेंबर 2024 पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे.
- गुड वर्क पोर्टल: कर्मचाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाची एचआरएमएसमध्ये झालेली नोंद गुड वर्क पोर्टलवर सादर करण्याची तरतूद.
स्किल इंडिया उपक्रमात भारतीय रेल्वेचे योगदान
- 'मिशन कर्मयोगी' अंतर्गत, नागरी सेवा क्षमता वाढीसाठीच्या राष्ट्रीय कार्यक्रमात (NPCSCB), रेल्वे मंत्रालयाने (MoR) 2024 मध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. iGOT प्लॅटफॉर्मवरील की परफॉर्मन्स इंडिकेटर (KPIs) ने खालील उपलब्धी अधोरेखित :
Performance Indicator
|
As on 31.12.2024
|
As on 01.12.2024
|
No. of onboarded railway officials
|
8,43,087
|
11,92,495
|
No. of officials enrolled in min 01 course
|
48,824
|
5,15,532
|
Total course enrolments
|
2,13,642
|
42,42,409
|
Total course completion
|
1,54.053
|
29,30,811
|
- रेल्वे मंत्रालयाने 19.10.2024 ते 25.10.2024 या कालावधीत कर्मयोगी सप्ताह – राष्ट्रीय शिक्षण सप्ताह (NLW) आयोजित केला आहे. या अंतर्गत भारतीय रेल्वेने (IR Railways) उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यापैकी काही खालीलप्रमाणे-
o NLW दरम्यान IR मधील जवळपास 33% कर्मचाऱ्यांनी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊन ते पूर्ण केले.
o NLW दरम्यान ज्या वापरकर्त्यांनी किमान 4 तासांच्या वर प्रशिक्षणाचा टप्पा ओलांडला आहे त्यापैकी जवळपास 40% IR मधील आहेत.
o कर्मयोगी सप्ताहाचे लक्ष्य पूर्ण करणाऱ्या प्रमुख 05 MDOs पैकी, 04 MDOs हे IR मधील असून त्यामध्ये NCR ला 1ला क्र., NWR ला. 3 रा क्र., ER ला 4 था आणि WR 5 वा क्रमांक मिळाला आहे.
o पूर्व रेल्वेच्या (ER) 55,251 कर्मचाऱ्यांनी किमान 1 अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तर 37.87हजार आणि 37.12हजार कर्मचाऱ्यांसह NCR आणि WR दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत
o NLW दरम्यान केल्या गेलेल्या पहिल्या 10 अभ्यासक्रमांमध्ये IR चे 02 अभ्यासक्रम होते.
O रेल्वेच्या CTIs/ZRTIs द्वारे 60+ थेट वेबिनार/सेमिनार आयोजित केले गेले.
भरती आणि कार्यबल व्यवस्थापन
- रेल्वे मंत्रालयाने 'क' गटातील विविध श्रेणीतील पदांच्या भरतीसाठी 2024 पासून वार्षिक कॅलेंडर प्रकाशित करण्याची व्यवस्था सुरू केली आहे.
- इच्छुकांसाठी पुढील प्रकारे लाभ
o प्रत्येक वर्षी पात्र बनणाऱ्यांना संधी;
o परीक्षांची निश्चिती;
o जलद भरती प्रक्रिया, प्रशिक्षण आणि नियुक्ती
o उमेदवारांना अधिक संधी;
- ·विविध पदे भरण्यासाठी जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत सुमारे 92,000 रिक्त पदांसाठी दहा केंद्रीय रोजगार अधिसूचना (CENs) अधिसूचित केल्या गेल्या आहेत/जात आहेत.
प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रे आणि ‘एक स्थानक -एक उत्पादन योजना
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 50 प्रधानमंत्री जनऔषधी केंद्रांचा अधिक प्रसार होत आहे.
• ‘एक स्थानक -एक उत्पादन’अंतर्गत
- कार्यरत स्थानकांची संख्या 1906 झाली आहे.
- तर कार्यरत असलेल्या दुकानांची(आउटलेटची) संख्या 2170 झाली आहे.
भांडवली खर्च
- 2024-25 साठी एकूण भांडवली खर्च 2,65,200 कोटी रूपये केला गेला आहे, ही आतापर्यंतच्या अंदाजपत्रकामध्ये तरतूद करण्यात आलेली सर्वाधिक रक्कम आहे.
आरोग्य आणि स्वच्छता
- ‘इट राइट’- योग्य आहार प्रमाणपत्र — भारतीय रेल्वेने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) द्वारे सुरू केलेल्या “इट राइट इंडिया” उपक्रमांतर्गत उल्लेखनीय प्रगती केली आहे. आत्तापर्यंत, 182 स्थानकांना एफएसएसएआय द्वारे “इट राइट” ची मान्यता देण्यात आली आहे.
- नमस्ते हेल्थ ॲप - पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय प्रवाशांना आरोग्यविषयक लाभ घेता यावेत या साठी 16.12.2024 रोजी "नमस्ते हेल्थ ॲप"चा प्रारंभ केला आहे.
विशेष मोहीम 4.0:
- संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये एकूण 56,168 स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या, या मोहिमांमध्ये कामाच्या ठिकाणी स्वच्छता आणि रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेवर भर देण्यात आला.
- अडगळ आणि विना वापराचे साहित्य (भंगार) असलेली 12.15 लाख चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली असून या भंगार विक्रीतून 452.40 कोटी रुपयांचा महसूल मिळवण्यात आला.
प्रलंबितता कमी करणे:
- खासदारांनी पाठवलेल्या सर्व 1065 प्रकरणांचे पूर्ण निराकरण केले.
- राज्य सरकारांनी पाठवलेल्या 138 प्रकरणांचे पूर्णपणे यशस्वी निराकरण केले.
- पंतप्रधान कार्यालयाकडून आलेल्या 69 पैकी 65 प्रकरणे निकाली काढण्यात आली.
- संसदेमध्ये दिलेली 139 पैकी 55 आश्वासने पूर्ण झाली.
- 2.5 लाख लोकांच्या तक्रारींचे निराकरण केले.
- 1427 सार्वजनिक तक्रारींचे निराकरण केले.
फाइल पुनरावलोकन आणि व्यवस्थापन:
- नोंदीविषयक व्यवस्थापन सुव्यवस्थित करण्यासाठी 89,000 हून अधिक कालबाह्य फायलींचा निपटारा करण्यात आला.
समाज माध्यमाव्दारे सहभाग
- समाज माध्यमाव्दारे 3713 ट्विट आणि असंख्य ‘रीपोस्ट’ मजकूर केला गेला. यामुळे व्यापक जनहित निर्माण झाले आणि सर्वांनी स्वच्छता चळवळीमध्ये सहभाग घेतला.
भारतीय रेल्वेचा वारसा
- सध्या, भारतीय रेल्वेच्या प्रणालीमध्ये 80 वारसा स्थानके आणि 78 वास्तू आणि संरचना अस्तित्वात आहेत आणि त्यांची सर्व माहिती भारतीय रेल्वेच्या संकेतसथळावर अपलोड करण्यात आली आहे.
- पुणे इथल्या सी-डॅक यांच्या सहकार्याने पुस्तके, छायाचित्रे, नकाशे, दस्तऐवज इत्यादींसह राष्ट्रीय रेल संग्रहालय अभिलेखागारांचे डिजिटायझेशन केले जात आहे. सर्व डिजीटाइज्ड दस्तऐवज रेल्वे हेरिटेज प्रेमींना www.railheritage.in वर “इंडियन रेल्वे अर्काइव्ह – रेल्वे हेरिटेज पोर्टल” या संकेतस्थळावर येतो.
- राष्ट्रीय रेल संग्रहालयाच्या अमूल्य मालमत्तेपैकी जॉन मॉरिस फायर इंजिन (1914) ही एक मालमत्ता आहे. 11 फेब्रुवारी 2024 रोजी द स्टेट्समन आणि व्हीसीसीआय द्वारे आयोजित 57 व्या स्टेट्समन व्हिंटेज आणि क्लासिक कार रॅलीमध्ये सहभागी झाले आणि इंडियन ऑइलचा ‘वारसा संरक्षण (सर्वोत्कृष्ट) चषक’ भारतीय रेल्वेने ( वर्षातील पुनर्संचयित वाहन या श्रेणीमध्ये ) जिंकला. .
- जागतिक वारसा दिनानिमित्त 18 एप्रिल रोजी राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयामध्ये "माउंटन रेल्वे" नावाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यावेळी भारतातील दुसरे सर्वात जुने वाफेवर चालणारे लोकोमोटिव्ह रामगोट्टी (1862) चे प्रदर्शन अभ्यागतांसाठी उपलब्ध करण्यात आले होते.
- रेल्वे स्मृतीचिन्हांच्या पुरवठादारांचे पॅनेल तयार करण्यासाठी रेल्वे स्मृतीचिन्हांबाबत नवीन धोरण तयार करण्यात आले आहे; रेल्वे स्मरणिका डिझाईन्स, वैशिष्ट्य आणि किंमती केंद्रीकृत/प्रमाणित करणे ; आणि रेल्वे स्मरणिका भेट वस्तू दुकाने स्थापन करण्यासाठी 02.09.2014रोजी एक नवीन धोरण तयार करण्यात आले.
- विस्टाडोम कोच मुळे बाहेरचे दृश्य आणि लँडस्केपचे उत्तम दृश्य दिसते. भारताच्या माउंटन रेल्वेमध्ये विस्टाडोमचा समाविष्ट केले जात आहेत. याप्रमाणे दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, कालका शिमला रेल्वे, निलगिरी माउंटन रेल्वे, कांगडा व्हॅली रेल्वे, माथेरान लाइट रेल्वे आणि पाताळपाणी कालाकुंड मार्गांवर निसर्गाचा उत्तम दृश्य अनुभव प्रवाशांना देण्यासाठी आणि या प्रदेशांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी विस्टाडोम वापरण्यात येणार आहेत.
- दार्जिलिंग हिमालयन रेल्वे (डीएचआर) ने पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने घुम (भारतातील सर्वोच्च रेल्वे स्थानक) आणि दार्जिलिंग रेल्वे स्थानकांवर "घुम महोत्सव" आयोजित केला आहे. हा महोत्सव साधारण महिनाभर चालतो. यावर्षी हा महोत्सव 13 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाला आणि तो 5 डिसेंबर 2024 रोजी संपला.
- ‘बेबी सिवोक’, 1881 मध्ये बांधलेले सर्वात लहान वाफेचे इंजिन आता घूम स्टेशनवर अभिमानाने प्रदर्शित केले गेले आहे, जे पर्यटकांना रेल्वेच्या समृद्ध वारशाचा एक मूर्त उदाहरण अनुभवण्यास मिळते.
• उत्तर रेल्वे अंतर्गत, 1882 मध्ये बांधले गेलेले काशी रेल्वे स्थानक हे हेरिटेज रेल्वे स्थानकांच्या यादीत समाविष्ट केले गेले आहे.
वर्ष 2024 (नोव्हेंबर पर्यंत) आरपीएफ म्हणजे रेल्वे पोलिस दलाने केलेली कामगिरी
ट्विटर आणि हेल्पलाइन क्रमांकावर उपस्थित तक्रारींचा तपशील-
वर्ष
|
ट्विटरवर आलेल्या तक्रारींचा आकडा
|
हेल्पलाइन क्रमांकावर आलेल्या तक्रारींचा आकडा
|
एकूण
|
2024 (नोव्हेंबर पर्यंत)
|
19, 590
|
3,35720
|
3,55,310
|
रेल्वे सुरक्षा मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न
1)अभियान “नन्हे फरिस्ते ” (मुलांची सुटका):- रेल्वे मंत्रालयाने महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सहकार्याने ऑक्टोबर 2024 मध्ये सुधारित मानक कार्यप्रणाली (एसओपी) जारी केली.
अभियान “नन्हे फरिस्ते” (मुलांची सुटका) अंतर्गत आरपीएफने सुटका केलेल्या मुलांचा तपशील
वर्ष
|
आरपीएफने सोडवलेल्या मुलांचा आकडा
|
2024 (नोव्हेंबर पर्यंत)
|
13,717
|
2) ऑपरेशन ‘यात्री सुरक्षा’ – प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित तक्रारींचे निवारण.
वर्ष
|
आयपीएस प्रकरणांचा आकडा
|
अटक केलेल्या लोकांचा आकडा
|
|
2024 (नोव्हेंबर पर्यंत)
|
3,702
|
4,158
|
|
3) ऑपरेशन "अमानत" - प्रवाशांचे विसरलेले सामान योग्य व्यक्तींकडे सुपूर्द केल्याची प्रकरणे.
वर्ष
|
प्रवाशांचे राहिलेले सामान, त्यांना परत केल्याची प्रकरणे
|
प्रवाशांना परत केलेल्या मालमत्तेचे मूल्य (रूपयामध्ये)
|
2024 (नोव्हेंबर पर्यंत)
|
36,026
|
64,22,55,731
|
4) ऑपरेशन "जीवन रक्षा": - यामध्ये प्रवासी घाईगडबडीने चालत्या गाडीतून उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करतात आणि रेल्वेच्या चाकाखाली येण्याचा धोका पत्करल्यामुळे घसरून पडतात. त्याचबरोबर धावत्या गाडी समोर मुद्दाम येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात .
वर्ष
|
ट्रॅकवरील मृत्यूचे प्रमाण कमी करून आयुष्य वाचवणे
|
|
|
2024 (नोव्हेंबर पर्यंत)
|
पुरूष - 2,328
|
महिला - 970
|
एकूण – 3,298
|
5) ऑपरेशन ‘’सेवा’’
वर्ष
|
रेल्वे पोलिस दलाने ज्येष्ठ/महिला/ दिव्यांग/ आजारी/जखमी/बालके यांना केलेली मदत
|
2024 (नोव्हेंबर पर्यंत)
|
16,594
|
6) ऑपरेशन "मातृशक्ती" - महिला आरपीएफनी गर्भवतींना प्रवासादरम्यान प्रसूतीच्या वेळी, बाळंतपणासाठी ऑपरेशन मातृशक्ती अंतर्गत मदत केली.
वर्ष
|
बाळाच्या जन्माच्यावेळी महिलांना केलेली मदत – प्रकरणे
|
|
|
2024 (नोव्हेंबर पर्यंत)
|
गाडीमध्ये – 102
|
रेल्वेस्थानक परिसरात – 61
|
एकूण – 163
|
7) ऑपरेशन “एएएचटी ” (मानवी तस्करी विरुद्ध कारवाई ):-19.03.2024 रोजी,रेल्वे पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी क्षमता निर्माण प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून मानवी तस्करी रोखण्यासाठी आणि त्याविरोधात कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग (एनसीडब्ल्यू) बरोबर सामंजस्य करार केला आहे.
वर्ष
|
मानवी तस्करीतून वाचवलेल्या लोकांचा आकडा
|
|
|
अटक केलेल्यांचा आकडा
|
2024 (नोव्हेंबर पर्यंत)
|
कुमारवयोगट
मुलगे – 761
मुली – 61
|
प्रौढ
पुरूष -50
महिला – 10
|
एकूण
882
|
278
|
8) ऑपरेशन "उपलब्ध" :- ऑपरेशन उपलब्ध अंतर्गत भारतीय रेल्वेवरील दलालांच्या विरोधात आरपीएफकडून नियमित मोहीम राबवली जाते आणि त्यात गुंतलेल्या व्यक्तींवर सध्याच्या कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई केली जाते.
क) टॉवेल, रूमाल टाकणारे /अनधिकृत प्रवेश/अधिकृत प्रवाशांच्या प्रवेशास विरोध करणाऱ्यांविरुद्ध कारवाई
वर्ष
|
रेल्वे अधिनियम कलम 155 अंतर्गत प्रकरणे
|
अटक केलेले लोक
|
सुटका करण्यासाठी भरलेला दंड
|
|
2024 (नोव्हेंबर पर्यंत)
|
33,373
|
33,440
|
65,82,565
|
|
ख). बेकायदेशीर तिकिटांची खरेदी करणारांवर केलेली कारवाई.
वर्ष
|
गुन्हा नोंद प्रकरणे
|
अटक केलेल्यांची संख्या
|
जप्त केलेली तिकीटे
|
जप्त केलेल्या तिकिटांचे मूल्य
|
ब्लॉक केलेले आयआरसीटीसी वापरकर्त्याचा आकडा
|
|
2024 (नोव्हेंबर पर्यंत)
|
4353
|
5796
|
भविष्यातील प्रवासाची –
29,00,035
मागील प्रवासाची-
99,155
|
भविष्यातील प्रवास –
12.2 कोटी
मागील प्रवास-
39.5 कोटी
|
24,663
|
|
घ. दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यातील प्रवासी जागा अनधिकृतपणे व्यापलेल्या व्यक्तींवर कारवाई-
वर्ष
|
नोंद झालेल्या गुन्ह्यांचा आकडा
|
अटक केलेल्या व्यक्तींची संख्या
|
|
2024 (नोव्हेंबर पर्यंत)
|
86,895
|
87,866
|
|
(i) ऑपरेशन "रेल सुरक्षा" - आरपीएफकडे रेल्वे मालमत्तेच्या संरक्षणाचे आणि सुरक्षिततेचे काम सोपविण्यात आले आहे. चोरी, रेल्वे मालमत्तेचा गैरवापर यात गुंतलेल्या गुन्हेगारांवर आरपीएफकडून कारवाई केली जाते.
‘बुक’ केलेले माल + रेल्वे साहित्य
वर्ष
|
नोंद झालेली प्रकरणे
|
जप्त केलेल्या मालमत्तेचे मूल्य
|
अटक केलेल्या लोकांची संख्या
|
|
2024 (नोव्हेंबर पर्यंत)
|
5353
|
7.9 कोटी
|
9,785
|
|
ज) ऑपरेशन सतर्क :- या ऑपरेशनचे उद्दिष्ट इतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी आहे. ज्या अंतर्गत आरपीएफ त्यांना तंबाखू उत्पादन, मद्य उत्पादन, एफआयसीएन /बेहिशेबी सोने/बेहिशेबी रोख/बेहिशेबी इतर मौल्यवान धातूंचा तस्करी केलेला माल/ शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा/ स्फोटके आणि प्रतिबंधित औषधे जप्त करण्यासंबंधीच्या मोहिमांमध्ये मदत करते.
वर्ष
|
तंबाखू उत्पादन
|
मद्य उत्पादन
|
एफआयसीएन/सोने/ रोकड/मौल्यवान धातूंची पुनर्प्राप्ती
|
2024 (नोव्हेंबर पर्यंत)
|
माहिती मिळालेली प्रकरणे – 94
मूल्य – 3.4 कोटी
अटक केलेले लोक – 46
|
माहिती मिळालेली प्रकरणे – 2020
मूल्य – 2.4 कोटी
अटक केलेले लोक – 1,332
|
माहिती मिळालेली प्रकरणे – 62
मूल्य – 24.96 कोटी
अटक केलेले लोक – 48
|
11) ऑपरेशन ‘दुसरा’ :- हे ऑपरेशन रेल्वेच्या आवारात आणि गाड्यांमध्ये अनधिकृत फेरीवाले आणि विक्रीच्या धोक्याविरुद्ध कारवाई म्हणून सुरू करण्यात आले आहे.
वर्ष
|
नोंद झालेल्या गुन्हे
|
अटक केलेल्या व्यक्तींची संख्या
|
2024 (नोव्हेंबर पर्यंत)
|
2,41,923
|
2,42,266
|
12) ऑपरेशन "नारकोस " :- "ऑपरेशन नारकोस" अंतर्गत आरपीएफ ने गुन्हेगारांना अटक केली आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी अधिकारप्राप्त एजन्सीकडे सुपूर्द केले.
एनडीपीएसकडून केलेली वसुली
वर्ष
|
सापडलेले गुन्हे
|
जप्त केलेल्या
एनडीपीएसच्या मालाचे मूल्य
|
अटक केलेल्या व्यक्तींची संख्या
|
2024 (नोव्हेंबर पर्यंत)
|
1295
|
63.7 कोटी
|
1097
|
13) ऑपरेशन 'वायलेप' :- या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफ ने रेल्वेमार्गे वन्यप्राण्यांचा अवैध व्यापार करणाऱ्या तस्करावर कडक कारवाई केली आहे.
वर्ष
|
सापडलेल्या प्रकरणांची संख्या
|
अटक केलेल्या व्यक्तींची संख्या
|
2024 (नोव्हेंबर पर्यंत)
|
जीव-प्राणी- जंतु – 35
वनस्पती -18
|
21
|
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक- 2024 दरम्यान, आरपीएफने बेहिशेबी रोकड, ड्रग्ज/एनडीपीएस(गांजा/चरस, तंबाखू, अवैध मद्य, सोने, चांदी इत्यादि तसेच बेकायदेशीर शस्त्रे/दारूगोळा, इतर (सिगारेट, पान मसाला इ.जप्त केले. त्याचे मूल्य 39 कोटी रूपये होते.
14) ऑपरेशन ‘भूमी’- “ऑपरेशन भूमी” अंतर्गत रेल्वेची जमीन बेकायदा अतिक्रमणापासून मुक्त करण्यासाठी आरपीएफ रेल्वेच्या इतर विभागांना मदत करते.
वर्ष
|
अभियानाचा आकडा
|
अतिक्रमणातून मुक्त केलेले विभाग
|
2024 (नोव्हेंबर पर्यंत)
|
1119
|
13605
|
15) मेरी सहेली उपक्रम:
• एकट्या प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना वाढीव सुरक्षितता प्रदान करण्यासाठी हा उपक्रम आहे. त्यांना लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये.मूळ स्थानकापासून ते गंतव्य स्थानकापर्यंत सुरक्षा प्रदान करण्यासाठी आरपीएफ ने हा उपक्रम सुरू केला आहे.
• या उपक्रमात आणखी सुधारणा करण्याच्या उद्देशाने या उपक्रमातील कामगिरी आणि कमतरतांचे विश्लेषण करण्यासाठी महिला प्रवाशांकडून अभिप्राय देखील घेतले जातात.
• महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये पुरुष प्रवाशांच्या प्रवेशाविरुद्ध वारंवार अभियान चालवले जाते.
रेल्वे कायद्याच्या 162 अन्वये कारवाई (अनधिकृतपणे गाडीत प्रवेश करणे किंवा महिलांसाठी राखीव असलेल्या इतर ठिकाणी प्रवेश करणे) केली जाते
वर्ष
|
नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या
|
अटक केलेल्या व्यक्तींची संख्या
|
|
2024 (नोव्हेंबर पर्यंत)
|
92405
|
95146
|
|
क्रीडा -
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय रेल्वेने चमकदार कामगिरी केली.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रेल्वेच्या तीन खेळाडूंनी पदके जिंकली:
• अमन सेहरावत – कांस्य (कुस्ती)
• स्वप्नील कुसळे – कांस्य (नेमबाजी )
• अमित रोहिदास – कांस्य (हॉकी)
***
JPS/S.Tupe/N.Chitale/R.Agashe/M.Ganoo/S.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2090001)
Visitor Counter : 14