गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत 'जम्मू काश्मीर अँड लडाख थ्रू द एजेस: अ व्हिज्युअल नरेटिव्ह ऑफ कंटिन्युटीज अँड लिंकेजेस' पुस्तकाचे प्रकाशन


या पुस्तकाने देशात प्रचलित असलेल्या काश्मीरबाबतच्या मिथकांना छेद देत सत्य आणि पुराव्यासह इतिहास मांडला आहे

मोदी सरकारने काश्मीरमधील दहशतवादाची परिसंस्था पूर्णपणे उद्ध्वस्त केल्यामुळे या प्रदेशात शांतता आणि स्थैर्याला बळकटी प्राप्त

Posted On: 02 JAN 2025 10:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2025 

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 'जम्मू काश्मीर अँड लडाख थ्रू द एजेस: अ व्हिज्युअल नरेटिव्ह ऑफ कंटिन्युटीज अँड लिंकेजेस' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भारतीय इतिहास संशोधन परिषदेचे अध्यक्ष आणि पुस्तकाचे संपादक प्रा. रघुवेंद्र तन्वर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नॅशनल बुक ट्रस्टने या पुस्तकाच्या प्रकाशनच्या माध्यमातून, तथ्ये आणि पुरावे सादर करून, भारताविषयीची दीर्घकालीन मिथके  प्रभावीपणे खोडून काढत  ऐतिहासिक सत्य प्रस्थापित करण्याचे काम केले आहे यावर  केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनीआपल्या भाषणात भर दिला.  ते म्हणाले की भारत कधीच एकसंध नव्हता आणि या देशाच्या स्वातंत्र्याची कल्पना निरर्थक आहे असा एक मिथक होता - हा गैरसमज अनेकांनी सत्य म्हणून स्वीकारला होता. मात्र  देशाच्या कानाकोपऱ्यात वसलेला  आपला समृद्ध वारसा काश्मीर मध्ये हजारो वर्षांपासून  नांदत होता हे या पुस्तकाने सिद्ध केल्याचे त्यांनी सांगितले. 

या पुस्तकात आणि प्रदर्शनात काश्मीर, लडाख, शैव आणि बौद्ध धर्म यांच्यातील संबंध अतिशय उत्तम पद्धतीने विशद केले  आहेत असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. भूतकाळातील राज्यकर्त्यांना खूश करण्यासाठी लिहिलेल्या इतिहासाच्या पलीकडे जाण्याची वेळ आली आहे यावर अमित शहा यांनी भर दिला. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी  अधोरेखित केले कि भारतातील भाषिक विविधता ही सर्वात मोठी ताकद आहे जी विशेषतः काश्मीरमध्ये दिसून येते. अमित शाह म्हणाले की कलम 370 आणि 35A हे काश्मीरला आपल्या देशामध्ये  पूर्णपणे एकरूप होण्यापासून रोखणारे अडथळे होते .  ते पुढे म्हणाले की, कलम 370 रद्द करून मोदीजींनी स्वातंत्र्योत्तर इतिहासाचा कलंकित अध्याय समाप्त केला आणि उर्वरित भारतासोबत काश्मीरच्या विकासाचा नवा अध्याय सुरू केला.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, कलम 370 ने काश्मीर खोऱ्यातील तरुणांच्या मनात फुटीरतावादाची बीजे पेरली. अमित शहा यांनी हे अधोरेखित केले की कलम 370 रद्द झाल्यानंतर, काश्मीरमधील दहशतवादी घटनांमध्ये 70 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे, जे हे सिद्ध करते की कलम 370 हे दहशतवादासाठी पोषक होते. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, आज काश्मीरमध्ये जगातील सर्वात मोठा रेल्वे आर्च ब्रिज, आशियातील सर्वात मोठा बोगदा आणि केबल-स्टेड रेल्वे पूल आहे. त्यांनी अधोरेखित केले की काश्मीरमध्ये आता एक आयआयटी, एक आयआयएम, दोन एम्स, नऊ सरकारी वैद्यकीय महाविद्यालये, दोन नर्सिंग संस्था, दोन राज्य कर्करोग संस्था, आठ महाविद्यालये आधीच कार्यरत आहेत, तर  24 बांधकामाधीन आहेत.

अमित शहा म्हणाले की मोदी सरकारने केवळ दहशतवादावर नियंत्रण आणले नाही तर काश्मीर खोऱ्यातून दहशतवादी परिसंस्था देखील पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2089716) Visitor Counter : 32