नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
सीएमडी, आयआरईडीए व्हिजन 2025: बाजार नवोन्मेष, रिटेल रिन्युएबल पुश आणि जागतिक विस्तार
Posted On:
01 JAN 2025 3:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2025
नवीन वर्ष 2025 च्या पहिल्या दिवशी, भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेचे (आयआरईडीए) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी संचालक (वित्त) डॉ.बिजयकुमार मोहंती, मुख्य दक्षता अधिकारी अजय कुमार सहानी आणि इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
दास यांनी हरित अमोनिया आणि पंप्ड स्टोरेज हायड्रोपॉवर प्रकल्प तसेच सोलर रूफटॉप आणि पीएम कुसुम योजना अंतर्गत वीकेंद्रीकृत निर्मिती प्रकल्पांसाठी एखादे उत्पादन किंवा सेवा प्रारुप बाजारात आणणारी पहिली कंपनी बनून समर्थन देत, बाजारातील नवोन्मेषाला चालना देण्यात, भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेच्या नेतृत्वावर प्रकाश टाकला.
दास यांनी GIFT सिटी येथे भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीच्या तात्पुरत्या नोंदणीचा उल्लेख केला, ज्याचा उद्देश परकीय चलन वित्तपुरवठ्याद्वारे हरित हायड्रोजन आणि नवीकरणीय ऊर्जा उपकरणांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे हा आहे. किरकोळ उपकंपनी स्थापन करण्यासाठी मिळालेल्या तत्वतः मान्यतेचे तपशीलही त्यांनी सामायिक केले. ही उपकंपनी पीएम - सूर्यघर (रूफटॉप सोलर) आणि पीएम - कुसुम योजनांतर्गत किरकोळ व्यवसाय हाताळण्यावर तसेच नवीकरणीय ऊर्जेतील उदयोन्मुख व्यवसाय ते ग्राहक (B2C) विभागांवर लक्ष केंद्रित करेल, ज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहने, ऊर्जा साठवण, हरित तंत्रज्ञान आणि ऊर्जा कार्यक्षमता यांचा समावेश आहे.
दास यांनी तात्पुरत्या तिसऱ्या तिमाहीतील (Q3) आकड्यांनुसार, भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेची उत्कृष्ट कामगिरी अधोरेखित केली. या आकडेवारीनुसार वार्षिक 129% वाढ होऊन 31,087 कोटी रुपये आणि वितरण 41% वाढून 17,236 कोटी रुपये झाले आहे. थकबाकीदार कर्ज 36% वाढून ते 69,000 कोटी रुपयांवर पोहोचले. भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेने (IREDA) एकत्रितपणे 2.39 लाख कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केला आहे तर 1.52 लाख कोटी रुपयांहून अधिक वितरित केले आहेत.
दास यांनी नवरत्न दर्जा प्राप्त करणे, एस ॲंड पी ग्लोबल कडून आंतरराष्ट्रीय सार्वभौम - समतुल्य BBB-(स्थिर) रेटिंग प्राप्त करणे आणि देशांतर्गत AAA रेटिंग राखणे यासह भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेचे (IREDA) मागील वर्षातील महत्त्वाच्या टप्प्यांचा पुनरुच्चार केला.
भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेचे (आयआरईडीए) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास यांनी केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा, ग्राहक व्यवहार तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी, ऊर्जा तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक; नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव प्रशांत कुमार सिंग; मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी आणि संचालक मंडळ यांचे त्यांच्या पाठिंब्यासाठी आणि अमूल्य मार्गदर्शनासाठी आभार मानले.
* * *
S.Patil/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2089257)
Visitor Counter : 45