अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था (NIFTEM-K) ची उपलब्धी आणि उपक्रम : अन्न उद्योग नवोन्मेष आणि सहकार्यासाठी एक उल्लेखनीय वर्ष: वर्षअखेर पुनरावलोकन 2024
Posted On:
30 DEC 2024 4:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2024
राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था (NIFTEM-K) ने 2024 मध्ये महत्त्वपूर्ण प्रगती केली असून अन्न-प्रक्रिया क्षेत्राची प्रगती करण्यासाठी आपली वचनबद्धता दर्शविली आहे. तांत्रिक नवोन्मेषापासून ते जागतिक सहकार्यांना चालना देण्यापर्यंत, हे वर्ष संस्थेसाठी मोलाचे ठरले आहे.
जागतिक खाद्य भारत 2024 मध्ये तांत्रिक नवोन्मेषाचे प्रदर्शन
राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्थेचा (NIFTEM-K) जागतिक खाद्य भारत (WFI) 2024 मधील सहभाग हे या वर्षाचे खास आकर्षण होते. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे (MoFPI) समर्थित संस्थेने शाश्वत अन्न प्रक्रिया पद्धतींची तांत्रिक प्रगती आणि वचनबद्धता अधोरेखित करणाऱ्या अभूतपूर्व नवोन्मेषावर प्रकाश टाकला. यात पुढील मुख्य नवोन्मेषांचा समावेश आहे:
- सारथी तंत्रज्ञान: सेन्सर्ससह प्रगत डिजिटल तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण प्रदर्शित करणे.
- हायब्रीड ड्रायिंग आणि बायोडिग्रेडेबल फिल्म: हायब्रीड ड्रायिंग आणि प्लास्टिसायझर्सशिवाय 100% बायोडिग्रेडेबल फिल्म विकसित करण्याची संकल्पना.
- रॅपिड डिटेक्शन किट्स: नॅनोसेन्सर्स आणि एन्झाईम (विकर) इनहिबिशन तत्त्वांचा वापर करून चहामधील कीटकनाशके आणि ऍक्रिलामाइड्स आणि अफलाटॉक्सिन सारखी हानिकारक संयुगे शोधण्यासाठी किट्स.
संस्थेचे दालन नवोन्मेषाचा खजिना होता. या दालनात स्वयंपाक करण्यासाठी तयार आणि भरड धान्य-आधारित उत्पादने, जीवनसत्त्व ब 2 आणि ब 12 मूल्यवर्धित योगर्ट, फंक्शनल फूड, तूपाचे पावडर, जीवनसत्त्व ड-समृद्ध स्नॅक्स, कॉर्न कॉब्सपासून बायोचार आणि अत्याधुनिक उपकरणे जसे की बुंदी बनवण्याचे मशीन आणि 3D प्रिंटिंग मॉडेल. या नवोन्मेषांनी अन्न प्रक्रिया उद्योगातील भागधारकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही कृती राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था (NIFTEM-K) ची तांत्रिक प्रगती साधण्याच्या भूमिकेवर प्रकाश टाकते.
विक्रमी विद्यार्थी प्रवेश
2024 मध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्थेसाठी (NIFTEM-K) आणखी एक मैलाचा दगड म्हणजे B. Tech अभ्यासक्रमासाठी 22 राज्यांतील 184 विद्यार्थ्यांचा प्रवेश. ही अभूतपूर्व कामगिरी तरुण वर्गात आणि समाजामध्ये अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षमतेचा वाढता प्रसार दर्शवते.
अकादमी-स्टार्ट-अप दुवा मजबूत करणे
नवउद्योजकता आणि स्टार्ट-अप संस्कृतीला प्रोत्साहन देणे हे राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्थेचे मुख्य लक्ष आहे. SUFALAM 24 कार्यक्रम, एक स्टार्ट-अप फोरम फॉर अस्पायरिंग लीडर्स आणि मेंटर्स यांनी शैक्षणिक, स्टार्ट-अप आणि उद्योगातील प्रमुख यांच्यातील सहकार्यासाठी एक परिवर्तनीय व्यासपीठ तयार केले. या वार्षिक कार्यक्रमाने अन्न प्रक्रिया उद्योगाचे भविष्य घडविण्यासाठी विविध भागधारकांना एकत्र आणले आहे.
एचडीएफसी बँक लि.च्या भागीदारीत, राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्थेने NSIP 4 कार्यक्रमांतर्गत आठ स्टार्ट-अपना अनुदान दिले. या स्टार्ट-अप्सना इनक्युबेशन सपोर्ट, प्रायोगिक संयंत्रांसाठी मदत, अत्याधुनिक प्रयोगशाळा सुविधा आणि मार्गदर्शन यांचा फायदा होईल. संस्थेचे उद्दिष्ट पुढील पाच वर्षात 300 हून अधिक स्टार्ट-अप्सना समर्थन देण्याचे असून यामुळे अन्न प्रक्रिया क्षेत्रात नवोन्मेषी विकासाला चालना देते.
अन्न परिसंस्थेमध्ये शाश्वतता वाढवणे
2024 मध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्थेसाठी (NIFTEM-K) शाश्वतता ही प्रमुख प्राथमिकता राहिली आहे. भारताच्या अन्न प्रक्रिया दृष्टिकोनाच्या आधुनिकीकरणासाठी शाश्वत प्रगतीवर लक्ष केंद्रित करून संस्थेने संभव (SAMBHAV) वेबिनारचे आयोजन केले. या कार्यक्रमामुळे शैक्षणिक, उद्योग आणि संशोधक यांच्यात चर्चा होण्यास मदत झाली. या कार्यक्रमात अन्न क्षेत्रात शाश्वत प्रगती करण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर दिला.
जागतिक सहकार्याचा विस्तार करणे
निफ्टेम-केने (NIFTEM-K)2024 मधे आपला लक्षणीय विस्तार करत संपूर्ण जगात आपला ठसा उमटवला आहे. QS या जागतिक विद्यापिठांना श्रेणी देणाऱ्या संस्थेच्या श्रेय नामावलीत 13 व्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापीठासोबत सामंजस्य करार करणे ही या वर्षातील एक उल्लेखनीय कामगिरी आहे.या सहकार्यामुळे भविष्यात सहकार्य संशोधन कार्यक्रम, विद्यार्थी देवाणघेवाण उपक्रम आणि संभाव्य संयुक्त पदवी कार्यक्रमांना चालना मिळेल.
इतर आंतरराष्ट्रीय उपक्रमांत पुढील बाबींचा समावेश आहे:
- चिली, जपान आणि ऑस्ट्रेलियातील राजदूत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी.
- यूएसए, कॅनडा, इटली, थायलंड आणि इतर ठिकाणच्या उच्च-श्रेणीच्या शैक्षणिक संस्थांकडून नवीन प्रस्तावांमधे स्वारस्य.
- भविष्यातील सहकार्याच्या दृष्टीने आश्वासक संभावनांसह खाद्यान्न आणि कृषी संघटना (FAO) संघाकडून दोन वेळा भेटी,
कृषी-अन्न प्रणालींमध्ये हवामान बदलाचा सामना करणे
कृषी-अन्न क्षेत्रात हवामान बदलांना सामोरे जात असताना,निफ्टेम-केने(NIFTEM-K) पर्यावरण आणि हवामान-बदलसापेक्ष (EFFECT) कार्यक्षम अन्न प्रक्रिया या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती.यावेळी हवामान-बदलसापेक्ष स्मार्ट फूड प्रोसेसिंग, नूतनीकरणक्षम ऊर्जेचा वापर आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी कचऱ्याचे मूल्यमापन आणि प्रक्रियेत बदल हे महत्त्वाचे विषय विविध चर्चासत्रांत समाविष्ट केले होते.
ग्राम दत्तक योजना या कार्यक्रमाद्वारे ग्रामीण समुदायांचे सक्षमीकरण
निफ्टेम-केचा प्रमुख उपक्रम दत्तक गाव योजना: आपल्या दत्तक गाव योजना या वैशिष्ट्यपूर्ण (VAP) उपक्रमाने 2024 मध्ये 19 वे वर्ष साजरे केले, ज्यात नऊ राज्यांमधील 21 गावांना सहभागी करण्यात आले.यात 360 हून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागासह आणि 50 प्राध्यापक सदस्यांनी मार्गदर्शन केले.या उपक्रमाद्वारे अन्न प्रक्रियेतून उत्पन्नाचे स्रोत निर्माण करत उद्योजकतेला प्रोत्साहन देत, सामाजिक समस्यांचे निराकरण करत आणि अन्न क्षेत्रातील सरकारी धोरणांबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी आणि ग्रामीण समुदायांमध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण सुलभ करत शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केले गेले.हा उपक्रम NIFTEM-K ची शैक्षणिक आणि तळागाळातील समुदायांमधील दरी भरून काढण्याची वचनबद्धता अधोरेखित करतो.
उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील भागीदारी मजबूत करणे
NIFTEM-K ने हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले आर अँड डी सेंटर, टेट्रापॅक आणि मॅरिको यासह 11 नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले.आयआयटी मुंबई आणि एआयआयए यासह पाच शैक्षणिक संस्थांसोबत सहकार्य केल्यामुळे त्यांची संशोधन क्षमता आणखी वाढली आहे. या भागीदारीतून सहयोगात्मक संशोधन आणि नवीन उत्पादन विकास, तंत्रज्ञान हस्तांतरण, विद्यार्थी देवाणघेवाण कार्यक्रम आणि उत्कृष्टता केंद्रे तसेच नव्या संयुक्त पदवी कार्यक्रमांची यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
आपल्या संशोधन उपक्रमांचा व्यावहारिक परिणाम दर्शवित NIFTEM-K ने आपली पाच नाविन्यपूर्ण तंत्रे खाद्यान्न कंपन्या आणि स्टार्ट-अप्सना, वर्ल्ड फूड इंडिया (WFI)-2024 दरम्यान यशस्वीरित्या सुपूर्द केली.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आकलन आणि परीसर समृद्धी वाढवणे
विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांच्या आयोजनाने संस्थेचा परिसर फुलून गेला.
निष्कर्ष
नावीन्यपूर्णता, सहयोग आणि सामुदायिक सहभागाने 2024 हे वर्ष निफ्टेम-के (NIFTEM-K) साठी परिवर्तनकारक वर्ष ठरले. वर्ल्ड फूड इंडिया WFI-2024 मध्ये दाखवण्यात आलेल्या तांत्रिक प्रगतीपासून ते हवामान बदल आणि ग्रामीण सशक्तीकरणाला संबोधित करणाऱ्या उपक्रमांपर्यंत, संस्थेने अन्न-प्रक्रिया क्षेत्रात अग्रणी म्हणून आपले स्थान या वर्षात अधिक मजबूत केले आहे.
* * *
JPS/Tupe/Shraddha/Sampada/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2088879)
Visitor Counter : 29