पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वर्षाखेर आढावा 2024 - पर्यटन मंत्रालय


भारतात 2023 मध्ये 18.89 दशलक्ष आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे झाले आगमन

पर्यटनाद्वारे 2023 मध्ये देशाने केली 2,31,927 कोटी रूपयांच्‍या परकीय चलनाची केली कमाई

2023 मध्ये 2509 दशलक्ष देशांतर्गत पर्यटकांनी दिली भेट

विकसित भारत @2047 साठी पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीकोनावर विचार आणि चर्चा करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या पर्यटन मंत्र्यांच्या चार प्रादेशिक परिषदांचे आयोजन

विविध आठ श्रेणीमध्‍ये घेतलेल्या सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे स्पर्धा- 2024 मध्‍ये 36 गावांना मिळाला विजेतेपणाचा मान

Posted On: 25 DEC 2024 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2024

 

पर्यटन मंत्रालयाने वर्ष 2024 मध्ये राबवलेले प्रमुख उपक्रम तसेच केलेली कामगिरी पुढीलप्रमाणे आहे :

पायाभूत सुविधांचा विकास

  • पर्यटन मंत्रालयाने स्वदेश दर्शन योजनेंतर्गत  5287.90 कोटी रुपयांच्या एकूण 76 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.  त्यापैकी 75 प्रकल्पांचे काम प्रत्‍यक्षात  पूर्ण झाले आहे.

  • पर्यटन मंत्रालयाने आपल्या स्वदेश दर्शन योजनेच्या नावामध्‍ये ‘स्वदेश दर्शन 2.0 (एसडी2.0)’ अशी सुधारणा केली आहे.   या योजनेचा  उद्देश पर्यटनस्‍थळ  हे गंतव्यस्‍थान आहे,  ही गोष्‍ट केंद्रीकृत ठेवून त्‍या दृष्टिकोनातून त्या स्थानाचा शाश्‍वत  विकास  करणे हा आहे.  स्वदेश दर्शन 2.0 अंतर्गत 793.20 कोटी रूपयांचे 34 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत.

Swadesh Darshan 2.0 | Ministry of Tourism | Government of India

  • पर्यटन मंत्रालयाने प्रसाद योजनेअंतर्गत एकूण 1646.99 कोटी रुपयांच्या एकूण 48 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, त्यापैकी 23 प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

​​​​​​​A picture containing outdoor, sky, building, waterDescription automatically generated

  • केंद्रीय एजन्सींना सहाय्य योजनेंतर्गत एकूण 937.56 कोटी रुपयांच्या एकूण 65 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे, त्यापैकी 38 प्रकल्प प्रत्यक्ष पूर्ण झाले आहेत.
  • पर्यटन मंत्रालयाने पर्यटक मूल्य साखळीतील सर्व बिंदूंवर पर्यटन अनुभव वाढविण्यासाठी स्वदेश दर्शन 2.0 योजनेची उप योजना म्हणून ‘चॅलेंज बेस्ड डेस्टिनेशन डेव्हलपमेंट’ म्‍हणजेच आव्‍हानांच्‍याआधारे स्‍थानांचा विकास करण्‍यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. या योजनेअंतर्गत चार संकल्पनांच्‍या  श्रेणी तयार केल्या. यामध्‍ये (1) अध्यात्मिक पर्यटन, (2) संस्कृती आणि वारसा, (3) व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम, (4) इकोटूरिझम आणि अमृत वारसास्‍थाने योजने अंतर्गत प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. पर्यटन मंत्रालयाने योजनेनुसार  विकासासाठी विविध संकल्पना पर्यटन अंतर्गत 42 स्थळांची निवड केली आहे.
  • 2024-25 च्या अर्थसंकल्पीय घोषणांचा पाठपुरावा म्हणून, 23 राज्यांमधील एकूण 40 प्रकल्पांना  3295.76 कोटी रूपये भांडवली गुंतवणूकीसाठी राज्यांना निधी दिला आहे. अशा प्रकारचे विशेष सहाय्य (एसएएससीआय) - देशातील प्रतिष्ठित पर्यटन केंद्रांच्या सर्वसमावेशक विकासासाठी आणि ब्रँडिंगसाठी दिले आहे. यामध्‍ये  राज्यांना 50 वर्षांच्या कालावधीसाठी दीर्घकालीन व्याजमुक्त कर्ज दिले आहे.  या निधीतून  जागतिक दर्जाप्रमाणे  प्रतिष्ठित पर्यटन केंद्रांचा विकास  करणे आणि जागतिक स्तरावर त्याचे ब्रँड मार्केटिंग म्हणजेच विपणन  केले जाणार आहे.

जाहिरात आणि विपणन

  • पर्यटन मंत्रालयाने 23 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून नवी दिल्ली येथे लाल किल्ला मैदानावर  "भारत पर्व" कार्यक्रमाचे आयोजन केले. देशातील विविध पर्यटन आकर्षणे दाखवण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे विशिष्‍ट संकल्पनेवर आधारित  मंडप  तयार करण्यात आले. विविध प्रादेशिक सांस्कृतिक संघटनांचे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाने देशभरातील स्थानिक कारागिरांच्या सहभागातून त्यांची उत्पादने प्रदर्शित करून आणि त्यांच्‍या मालाची  विक्री करून   स्थानिकांसाठी ‘व्होकल’ला प्रोत्साहन दिले.

  • ‘देखो अपना देश पीपल्स चॉईस 2024’ लाँच केले – 5 श्रेणींमध्ये सर्वाधिक पसंतीची पर्यटन स्थळे ओळखण्यासाठी एक राष्ट्रव्यापी सर्वेक्षण केले. विकसित भारत @2047 च्या प्रवासाला हातभार लावण्‍यासाठी  मिशन मोडमध्ये विकासासाठी आकर्षणे आणि गंतव्यस्थाने ओळखण्याचा हा एक प्रयत्न केला आहे.

Events & Festivals in India | A Ministry of Tourism Initiative

  • पर्यटन मंत्रालय शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने केंद्रीय विद्यालय (केव्‍ही) आणि नवोदय विद्यालय (एनव्‍ही) शाळांसाठी देशव्यापी ‘देखो अपना देश’’ ही  शालेय  स्पर्धा आयोजित केली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पर्यटन आकर्षणे, स्थळे, अनुभव आणि इतर माहितीचे  ‘भौतिक माहितीपत्रक’  तयार करणे अपेक्षित आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात  असलेले  पर्यटन आश्चर्य आणि आकर्षणांबद्दल विद्यार्थ्यांना जागरूक करणे,  हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
  • परदेशातील भारतीय प्रतिनिधींना  अतुल्य भारताचे राजदूत बनण्यास सक्षम करण्यासाठी ‘चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा’  मोहीम सुरू करण्यात आली. परदेशातील भारतीयांनी त्यांच्या 5 गैर-भारतीय मित्रांना दरवर्षी भारतात येण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.  अतुल्य आणि विकसित भारतासाठी लोकभागिदारीच्या भावनेने ही मोहीम राबविण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित भागासाठी ‘चलो इंडिया’ मोहिमेअंतर्गत भारतात येणाऱ्या एक लाख परदेशी पर्यटकांसाठी मोफत ई-व्हिसा जाहीर करण्यात आला आहे.
  • जुलै 2024 मध्ये नवी दिल्ली येथे भारत मंडपममध्‍ये  झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राच्या निमित्ताने, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, प्राचीन संस्कृती, भौगोलिक विविधता यावर प्रकाश टाकण्यात आला. यासाठी  भारत मंडपम येथे 'अतुल्य भारत' प्रदर्शनाची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमासाठी आलेल्या  प्रतिनिधींना  आधुनिक घडामोडींसह भारतातील पर्यटन क्षेत्रामध्‍ये दडलेल्या  अमूल्य गोष्‍टी – रत्ने कोणती आहेत, याचे दर्शन घडविण्‍यात आले. या प्रदर्शनात  10 केंद्रीय मंत्रालये आणि विभागांसह सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपला सहभाग नोंदवला आणि त्यांनी देवू केलेल्या सुविधा, सवलतींचे  प्रदर्शन केले. याव्यतिरिक्त, मंत्रालयाने दिल्ली शहरातील प्रतिनिधींसाठी ‘हेरिटेज वॉक’ आणि टूरची व्यवस्था केली.

​​​​​​​A stage with a scene of buildings and mountainsDescription automatically generated

  • पर्यटन मंत्रालयाने नवी दिल्ली येथे  27 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित केलेल्या जागतिक पर्यटन दिनाच्या समारंभाला  भारताचे उपराष्ट्रपती उपस्थित होते. यावर्षी 'पर्यटन आणि शांतता'  या संकल्पनेवर आधारित  जागतिक पर्यटन दिन साजरा केला. या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री, केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री, पर्यटन, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री, भारतातील वेगवेगळ्या  परदेशी मिशनचे राजदूत, विविध मंत्रालये आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारचे अधिकारी, प्रवासी व्यापार आणि आदरातिथ्य उद्योगातील संबंधित उपस्थित होते.
  • जगभरातील प्रवास आणि पर्यटन उद्योगांमध्‍ये अतुल्य भारताचा प्रचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या प्रतिमा, व्हिडिओ आणि इतर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी ‘अतुल्य भारत सामग्री केंद्र‘ सुरू करण्यात आले.

​​​​​​​12th International Tourism Mart, Kaziranga, 2024

काझीरंगा, 2024 –‘आयटीएम’ची 12वी आवृत्ती

  • पर्यटन मंत्रालयाच्यावतीने भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्‍ये असलेल्या पर्यटन क्षमतेचे प्रदर्शन करण्यासाठी ईशान्य प्रदेशात आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट (आयटीएम) आयोजित करत आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट (आयटीएम) ची 12 वी आवृत्ती आसाममधील काझीरंगा येथे 26 ते 29 नोव्हेंबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.
  • पर्यटन मंत्रालयाच्यावतीने  भारतातील पर्यटन स्थळे आणि तिथे होणा-या उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी परदेशातील बाजारपेठांमध्ये आयोजित ‘पर्यटन जत्रा/प्रदर्शनांमध्ये भाग घेतला जातो. या वर्षभरात, पर्यटन मंत्रालयाने आयटीबी बर्लिन, एमआयटीटी  मॉस्को, एफआयटीयूआर  माद्रिद, एटीएम दुबई, आयएमईएक्स फ्रँकफर्ट, पीएटीए ट्रॅव्हल मार्ट, जपान टुरिझम एक्सपो, आयएफटीएम टॉप रेसा, डब्‍ल्यूटीएम लंडन, इत्यादींसह अनेक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये भाग घेतला आहे.

पर्यटन सांख्यिकी (आकडेवारी)

  • 2023 मध्ये भारतात 18.89 दशलक्ष आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे आगमन (आयटीएटीज्) झाले.
  • 2023 मध्ये भारतात 9.52 दशलक्ष विदेशी पर्यटकांचे आगमन (एफटीएज) झाले.
  • 2023 मध्ये पर्यटनाद्वारे भारताने 231927 कोटी रूपये परकीय चलनाची (एफईई) कमाई  केली.
  • 2023 मध्ये भारतातील 2509 दशलक्ष जणांनी  देशांतर्गत पर्यटकांनी  भेटी (डीटीव्‍हीज) दिल्या.

सभा आणि परिषदा

पर्यटन मंत्रालयाने 22 ऑगस्ट 2024 ते 9 सप्टेंबर 2024 या कालावधीत चंदीगड, गोवा, शिलाँग आणि बंगळुरू येथे विकसित भारत @2047 च्या पर्यटन क्षेत्राविषयी दृष्टीकोनाची कल्पना आणि चर्चा करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या पर्यटन मंत्र्यांच्या  चार प्रादेशिक परिषदांचे  आयोजन केले.

Southern States/ UTs Tourism Ministers Conference

शाश्वत विकास

पर्यटन मंत्रालयाने सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा 2024 ची दुसरी आवृत्ती सुरू केली आहे.  या स्पर्धेचा  उद्देश पर्यटन स्थळाचे उत्कृष्ट उदाहरण असलेल्या गावांना मान्यता देण्याचा आहे. ही स्पर्धा राज्ये, उद्योग आणि इतर पर्यटन भागधारकांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. सर्वोत्कृष्ट पर्यटन गावे स्पर्धा 2024 मध्‍ये  8 श्रेणीतील  36 गावांना विजेते म्हणून मान्यता देण्‍यात आली.

कौशल्य विकास

  • पर्यटन मंत्रालयाने 27 सप्टेंबर 2024 रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्त 'पर्यटन मित्र आणि पर्यटन दीदी' या नावाने राष्ट्रीय जबाबदार पर्यटन उपक्रम सुरू केला, यामुळे पर्यटनामध्‍ये सामाजिक स्‍तरावर लोकांचा समावेश केला जात आहे. आता  त्‍यांना  रोजगार मिळू शकेल आणि पर्यटन हे क्षेत्र आर्थिक प्रगतीसाठी एक साधन म्हणून सक्षम बनवता येईल. पर्यटकांसाठी गंतव्यस्थानाचा  एकंदर अनुभव मिळावा यासाठी  त्यांना 'पर्यटक-अनुकूल' लोक भेटले पाहिजेत. हे पर्यटन मित्र आणि पर्यटन दीदी त्या स्थळाचे  अभिमानी राजदूत आहेत आणि ते गंतव्यस्थानाविषयी  अधिकृत कथा, माहिती सांगू शकतात.
  • पर्यटन मंत्रालयाने आदरातिथ्‍य क्षेत्रातील 8 आघाडीच्या ‘हॉस्‍पॅलिटी चेन हॉटेल’च्या   व्यवस्‍थापनाबरोबर  पर्यटन विषयक शिक्षण देणा-या 21 संस्थांना सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यास सक्षम केले. या भागीदारीचे  उद्दिष्ट, या संस्थांमध्‍ये  शिकणा-या  विद्यार्थ्यांना पर्यटन उद्योगातील सर्वोत्कृष्ट कार्यपद्धती समजावी,  त्यांची रोजगारक्षमता वाढवणे आणि भारताला भेट देणाऱ्या पर्यटकांना उच्च-गुणवत्तेच्या सेवा मिळतील याची खात्री करून देण्यासाठी खाजगी हॉटेल चेनच्या कौशल्याचा लाभ घेणे हे आहे.

व्यवसाय सुलभता

  • पर्यटन मंत्रालयाने पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रासाठी 'उद्योग दर्जा' देण्याच्या आणि अंमलबजावणीसाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना समर्थन देण्यासाठी प्रत्येक टप्प्‍यावर  मार्गदर्शन  करणारी एक पुस्तिका काढली आहे.  राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी  या क्षेत्रासाठी  अधिक गुंतवणूक आकर्षित करावी आणि यामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात , असा उद्देश यामागे  आहे.

 

* * *

JPS/S.Bedekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2088148) Visitor Counter : 38