सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
3.5 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या विक्रमी विक्रीसह, 22 वा दिव्य कला मेळा, इंडिया गेट, नवी दिल्ली येथे संपन्न
‘दिव्य कला शक्ती’ने कर्तव्यपथावरील अभ्यागतांना केले मंत्रमुग्ध
प्रविष्टि तिथि:
22 DEC 2024 7:11PM by PIB Mumbai
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाने (DEPwD) आज नवी दिल्लीतील ऐतिहासिक कर्तव्यपथावर ‘दिव्य कला शक्ती’ या नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिव्यांगजनांची (अपंग व्यक्ती) असामान्य प्रतिभा आणि सांस्कृतिक योगदान राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा व्यासपीठ ठरला.

12 - 22 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित 'दिव्य कला मेळा'चा समारोप या कार्यक्रमाने झाला. यावेळी 3.5 कोटी रुपयांची विक्रमी विक्री नोंदविण्यात आली. यावेळी उत्कृष्ट स्टॉल्स आणि दिव्यांग उद्योजकांना त्यांच्या अनुकरणीय कारागिरी आणि उद्योजकतेसाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला DEPwD चे सचिव राजेश अग्रवाल आणि उपमहासंचालक आणि विभागातील वरिष्ठ अधिकारी ऋचा शंकर यावेळी उपस्थित होते.


यावेळी बोलताना राजेश अग्रवाल यांनी कलाकारांचे कौतुक केले आणि सांगितले की, “दिव्यांगजन उद्योजकतेसह प्रत्येक क्षेत्रात मैलाचे दगड रचत आहेत. दिव्यांगजनांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी सरकार आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहे’’, असे अग्रवाल पुढे म्हणाले.
कार्यक्रमादरम्यान, नॅशनल दिव्यांगजन फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NDFDC) ने आपले नवीन मोबाइल ॲप लाँच करण्यात आले आहेत जे दिव्यांग उद्योजक आणि व्यक्तींसाठी कर्जाची अखंड उपलब्धता प्रदान करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
प्रतिभेचे मंत्रमुग्ध करणारे प्रदर्शन : 11 दिवसांच्या जल्लोषात, देशभरातील दिव्यांग कलाकारांनी नृत्य, संगीत, चित्रकला आणि नाट्य सादरीकरणासह विविध कलात्मक सादरीकरणासह अभ्यागतांना मंत्रमुग्ध केले. उपस्थित प्रेक्षक आणि मान्यवरांनी या कलाकारांच्या अतुलनीय प्रयत्नांचे आणि प्रतिभेचे कौतुक केले.
***
S.Patil/H.Kulkarni/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2087127)
आगंतुक पटल : 90