संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची मॉस्कोमध्ये घेतली भेट


द्विपक्षीय संरक्षण सहकार्याबाबतच्या विविध मुद्द्यांवर केली चर्चा

Posted On: 10 DEC 2024 10:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 डिसेंबर 2024

10 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या लष्कर व लष्करी सहकार्याबाबतच्या भारत रशिया आंतर सरकार आयोगाच्या 21 व्या बैठकीदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. संरक्षण मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे अध्यक्ष पुतीन यांना शुभेच्छा दिल्या.

राजनाथ सिंह यांनी यावेळी द्विपक्षीय लष्करी सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली. दोन्ही देशांमधील या भागीदारीमध्ये भरपूर क्षमता असून दोघांच्या एकत्रित प्रयत्नांमधून उल्लेखनीय यशाचा मार्ग प्रशस्त होईल अशी भावना दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली.  

या बैठकीदरम्यान राजनाथ सिंह म्हणाले, ‘आमच्या देशांमधील मैत्री सर्वात उंच पर्वत शिखरापेक्षाही उंच व सर्वात जास्त खोली असलेल्या समुद्रापेक्षाही जास्त खोल आहे.’ ते पुढे म्हणाले की, भारत नेहमीच रशियाच्या सोबत होता आणि भविष्यातही असेल.

S.Kane/S.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2083000) Visitor Counter : 59


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu