उपराष्ट्रपती कार्यालय
विधायक संवाद, वैयक्तिक सचोटी, निःस्वार्थ समर्पण, करुणा आणि परस्पर आदर हे राज्यकारभाराचे ‘पंचामृत’ - उपराष्ट्रपती
Posted On:
08 DEC 2024 6:25PM by PIB Mumbai
विकसित भारत हे आता स्वप्न राहिलेले नाही तर एक निश्चित ध्येय बनले आहे. “गीतेतील ज्ञान आपण लक्षात ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केले. हरियाणातील कुरुक्षेत्र येथे आयोजित आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024 च्या मेळाव्यात, "'साथी' आणि 'सारथी'ची भूमिका महत्त्वपूर्ण आहे , अशी टिप्पणी उपराष्ट्रपतींनी केली.
आपल्या भाषणात उपराष्ट्रपती धनखड यांनी प्रत्येकाने गीतेचा सार अंगीकारून सकारात्मक विचारसरणीने देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन केले. गीतेच्या शिकवणीने प्रेरित शासनाचे "पंचामृत मॉडेल" आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला.
उपराष्ट्रपतींनी भारताच्या प्रगती आणि एकात्मतेसमोरील आव्हानांवरही प्रकाश टाकला, ते म्हणाले की, “देशातील आणि बाहेरील काही शक्ती भारताची अर्थव्यवस्था आणि संस्था कमकुवत करण्याचा पद्धतशीर प्रयत्न करत आहेत. आपल्या घटनात्मक संस्थांना कमजोर करण्याचा आणि प्रगतीच्या मार्गात अडथळा आणण्याचा त्यांचा हेतू आहे. अशा शक्तींकडे दुर्लक्ष करता येणार नाही.”
यावेळी हरियाणाचे राज्यपाल बंगारू दत्तात्रेय, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, स्वामी ज्ञानानंद महाराज आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते.
***
S.Bedekar/H.Kulkarni/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2082208)
Visitor Counter : 33