लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्षांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रेरणा स्थळ येथे बाबासाहेब डॉ. बी.आर. आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण केली


बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने प्रेरणास्थळाला दिली भेट

Posted On: 06 DEC 2024 6:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2024

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड; पंतप्रधान नरेंद्र मोदी; माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संसद भवन संकुलातील प्रेरणा स्थळ येथील बाबासाहेब डॉ. बी.आर.आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली.

अनेक केंद्रीय मंत्री; राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे;खासदार, माजी खासदार व इतर मान्यवरांनीही यावेळी  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

लोकसभेचे सरचिटणीस उत्पल कुमार सिंह आणि राज्यसभेचे महासचिव पी.सी.मोदी यांनी प्रेरणा स्थळ येथे बाबासाहेब डॉ. बी.आर.आंबेडकर यांना पुष्पांजली वाहिली.

प्रेरणा स्थळ येथे 750 चौरस मीटर  परिसरात विशाल तंबूसह कार्यक्रमासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. इथली  आसनक्षमता 900 लोकांची होती. प्रेरणा स्थळ हे उन्नत  तांत्रिक सुविधांसह एक सु -विकसित ठिकाण आहे जिथे सर्व भारतीयांसाठी प्रेरणास्रोत म्हणून काम करणाऱ्या आपल्या महान नेत्यांचे पुतळे उभारलेले आहेत. प्रेरणा स्थळ इथेही पुतळ्यांची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. बाबासाहेबांना अभिवादन  करण्यासाठी प्रेरणा स्थळाला मोठ्या संख्येने भेट देणाऱ्या अभ्यागतांच्या सुरळीत प्रवेशाची व्यवस्था संसदेच्या ग्रंथालयाच्या गेटच्या बाजूने करण्यात आली होती.

या प्रसंगी बिर्ला यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले  की,"राष्ट्रनिर्माता, सामाजिक न्यायाचे रक्षक आणि भारतरत्न बाबासाहेब डॉ. बी.आर. आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करतो. त्यांचे समतावादी समाजाचे स्वप्न, त्यांची अमूल्य शिकवण आणि संविधान निर्मितीतील त्यांचे अतुलनीय योगदान आपल्याला सदैव  प्रेरणा देत राहील."

S.Kakade/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2081642) Visitor Counter : 31