पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पर्यटन मंत्रालयाने 23 राज्यांमधील कमी प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 3295.76 कोटी रुपये खर्चाच्या 40 प्रकल्पांना दिली मंजुरी

Posted On: 04 DEC 2024 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 डिसेंबर 2024

 

केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देण्यासाठी, देशभरातील 23 राज्यांमधील कमी प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 3295.76 कोटी रुपये खर्चाच्या 40 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा उद्देश अधिक वर्दळीच्या  ठिकाणांवरील ताण  कमी करणे आणि देशभरात पर्यटकांचा समतोल  राखण्यासाठी  प्रोत्साहन देणे हा आहे. कमी प्रसिद्ध  स्थळांवर लक्ष केंद्रित करून, पर्यटनाचा सर्वांगीण अनुभव देण्याची, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याची आणि नवीन प्रकल्प निवडीसाठी धोरणात्मक दृष्टिकोनातून पर्यटन क्षेत्रातील शाश्वत वाढ सुनिश्चित करण्याची मंत्रालयाला आशा आहे.

प्रकल्पातील सरकारी गुंतवणूक उत्प्रेरक म्हणून काम करेल, आर्थिक विकासाला चालना देईल आणि रोजगार निर्मिती करेल. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी खाजगी क्षेत्राचे कौशल्य आणि भांडवल याचा उपयोग करून, राज्ये सार्वजनिक पायाभूत सुविधा विस्तारू  शकतात, स्थानिक सुविधा सुधारू शकतात आणि अधिक पर्यटकांना आकर्षित करू शकतात, परिणामी  प्रादेशिक अर्थव्यवस्थेला आणि दीर्घकालीन विकासाला चालना देऊ शकतात. मंत्रालय समुदाय-आधारित पर्यटनावर देखील भर देत आहे जे स्थानिक लोकसंख्येला सक्षम करेल  आणि सांस्कृतिक वारसा देखील जपला जाईल.  राज्य सरकारे पर्यटन नियोजनामध्ये शाश्वत पद्धतींचा समावेश करून आणि  सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करून  नैसर्गिक आणि सांस्कृतिक संसाधनांचे संरक्षण करतानाच दीर्घकालीन विकास देखील  सुनिश्चित करू शकतील. पर्यटन मंत्रालय राज्य सरकारांना त्यांच्या पर्यटन प्रकल्पांमध्ये प्रगत तंत्रज्ञान समाविष्ट  करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. तंत्रज्ञानाचा अवलंब करून, राज्ये संपूर्ण प्रक्रिया  सुव्यवस्थित करू शकतात, पर्यटकांचा ओघ वाढवू  शकतात आणि या क्षेत्राच्या वाढीसाठी शाश्वत, अभिनव उपाय उपलब्ध करू शकतात.

मंजूर प्रकल्पांची यादी

23 राज्यांमधील 40 प्रकल्प

एकूण खर्च  =  3,295.76 कोटी रुपये

Sn

State

Project Name

Cost (in ₹ Cr)

 

Andhra Pradesh

1. Gandikota - Enriching the Fort and Gorge Experience

77.91

2. Akhanda Godavari: (Havelock Bridge & Pushkar Ghat), Rajamahendravaram

94.44

 

Arunachal Pradesh

3. Siang Adventure & Eco-Retreat, Pasighat

46.48

 

Assam

4. Assam State Zoo Cum Botanical Garden, Guwahati

97.12

5. Beautification of Rang Ghar at Sivasagar

94.76

 

Bihar

6. Development of Matsyagandha Lake, Saharsa

97.61

7. Karamchat Eco-Tourism and Adventure Hub

49.51

 

Chhattisgarh

8. Development of Chitrotpala Film City

95.79

9. Development of Tribal & Cultural Convention Centre

51.87

 

Goa

10. Chhatrapati Shivaji Maharaj Museum, Ponda

97.46

11. Proposed Townsquare, Povorim

90.74

  • 7.

Gujarat

12. Ecotourism Destination at Kerly (Mokarsagar), Porbandar

99.50

13. Tented City and Convention Centre, Dhordo

51.56

 

Jharkhand

14. Eco-Tourism Development of Tilaiyya, Koderma

34.87

 

Karnataka

15. Ecotourism & Cultural Hub at Roerich and Devika Rani Estate Tataguni, Bengaluru

99.17

16. Development of Savadatti Yallammagudda, Belgavi

100.0

 

Kerala

17. Ashtamudi Biodiversity and Eco-recreational Hub, Kollam

59.71

18. Sargaalaya: Global Gateway to Malabar's Cultural Crucible

95.34

 

Madhya Pradesh

19. Orchha A Medieval Splendour

99.92

20. International Convention Centre for MICE in Bhopal

99.38

 

Maharashtra

21. Ex-INS Guldar Underwater Museum, Artificial Reef, and Submarine Tourism, Sindhudurg

46.91

22. Development of "RAM-KAL PATH" at Nashik

99.14

 

Manipur

23. Loktak Lake Experience

89.48

 

Meghalaya

24. MICE Infrastructure at Mawkhanu, Shillong

99.27

25. Re-development of Umiam Lake, Shillong

99.27

  • 15.

Odisha

26. Development of Hirakud

99.90

27. Development of Satkosia

99.99

 

Punjab

28. Development of Heritage Street, SBS Nagar

53.45

 

Rajasthan

29. Development at Amber-Nahargarh and surrounding Area, Jaipur

49.31

30. Development at Jal Mahal, Jaipur

96.61

 

Sikkim

31. Skywalk, Bhaleydhunga, Yangang, Namchi

97.37

32. Border Experience, Nathula

68.19

  • 19.

Tamil Nadu

33. Nandavanam Heritage Park at Mamallapuram

99.67

34. Garden of flowers at Devala, Ooty

70.23

 

Telangana

35. Ramappa Region Sustainable Tourism Circuit

73.74

36. Somasilla Wellness & Spiritual Retreat Nallamala

68.10

  • 21.

Tripura

37. 51 Shakti Peethas Park at Banduar, Gomati

97.70

 

Uttar Pradesh

38. Development of Bateshwar, District- Agra

74.05

39. Integrated Buddhist Tourism Development, Shrawasti

80.24

 

Uttarakhand

40. Iconic City Rishikesh: Rafting Base Station

100.00

TOTAL

₹ 3,295.76 Cr

 

यामध्ये महाराष्ट्रातील  सिंधुदुर्ग येथे  Ex-INS गुलदार अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम  रीफ आणि पाणबुडी पर्यटनासाठी 46.91 कोटी रुपये आणि

नाशिक येथे "राम-काल पथ" च्या विकासासाठी 99.14 कोटी रुपये यांचा समावेश आहे.

तसेच गोव्यातील फोंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय - 97.46 कोटी रुपये आणि पर्वरी येथील प्रस्तावित टाउनस्क्वेअर- 90.74 कोटी रुपये यांचा समावेश आहे.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2080851) Visitor Counter : 68