अल्पसंख्यांक मंत्रालय
अल्पसंख्यांकांसाठीच्या कल्याणकारी योजनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध माध्यमांमधून मोहिमा राबवल्या जात आहेत
प्रविष्टि तिथि:
04 DEC 2024 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 डिसेंबर 2024
केंद्राने अधिसूचित केलेल्या सहा अल्पसंख्यांक समुदायांसाठी सुरु केलेल्या विकास योजनांचे संशोधन /अभ्यास, निरीक्षण व मूल्यमापन करण्यासाठी तसेच मंत्रालयाबद्दलची माहिती या समुदायांपर्यंत पोचवण्यासाठी विविध माध्यमांच्या मार्फत जागरूकता मोहीम चालवली जात आहे. अल्पसंख्यांकांसाठी सरकार राबवत असलेल्या विविध योजनांबद्दल अल्पसंख्यांकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी सरकार विविध छापील व इलेकट्रोनिक माध्यमांद्वारे, तसेच एफ एम रेडियो वाहिन्यांद्वारे प्रसिद्धी मोहीम राबवत आहे. मंत्रालयाने विविध योजना व उपक्रमांबद्दल छापलेल्या पुस्तिका व पत्रके हिंदी, इंग्रजी, उर्दू, व इतर प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहेत. सामान्य जनता व विशेषतः अल्पसंख्यांक समुदायांपर्यंत पोचण्यासाठी विविध ठिकाणी ‘हुनर हाट’ चे आयोजन केले जात आहे. या योजनांबद्दल अधिक जागृती करण्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी संस्थांमार्फत कार्यशाळा व चर्चासत्रे आयोजित करण्यासाठी देखील मंत्रालय साहाय्य करत आहे.
केंद्रीय अल्पसंख्यांक व संसदीय व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत एका लिखित उत्तरात ही माहिती दिली.
* * *
N.Chitale/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2080809)
आगंतुक पटल : 63