गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टम (एनएएफआयएस)

Posted On: 04 DEC 2024 6:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 डिसेंबर 2024

 

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) ने नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम (एनएएफआयएस) प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या प्रणालीमुळे सर्व जिल्ह्यांतील पोलीस आयुक्तालये, राज्य फिंगरप्रिंट ब्युरो, सेंट्रल फिंगरप्रिंट ब्युरो आणि केंद्रीय कायदा अंमलबजावणी एजन्सींना गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे उपलब्ध असलेले राष्ट्रीय भांडार स्थापन करण्यासाठी साधनसामग्री मिळाली आहे.

आता बोटांचे ठसे ओळखणाऱ्या सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रणाली एनएएफआयएससह एकत्रित करण्यात आल्या आहेत.

एनएएफआयएसच्या अंमलबजावणीमुळे 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत गुन्हेगारांच्या बोटांच्या ठशांच्या 1.06 कोटी नोंदी असलेले राष्ट्रीय भांडार तयार झाले आहे आणि हा संग्रह सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील अधिकृत वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. घटनास्थळी सापडलेल्या हातांच्या बोटांच्या ठशांना एनएएफआयएस संग्रहात असलेल्या बोटांच्या ठशांशी पडताळून पाहून गुन्यांच्या प्रभावी आणि झटपट तपासाला मदत करून देशभरातील गुंतागुंतीची प्रकरणे सोडवण्यात एनएएफआयएस महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

N.Chitale/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2080778) Visitor Counter : 45


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu