सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती उद्या नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिन 2024 निमित्त 33 आदर्श व्यक्ती आणि संस्थांना राष्ट्रीय दिव्यांगजन सक्षमीकरण पुरस्कार प्रदान करणार


या प्रसंगी सरकार दिव्यांगजनांचे जीवन समृद्ध करण्याच्या उद्देशाने 16 परिवर्तनकारी उपक्रमांचे करणार अनावरण

Posted On: 02 DEC 2024 8:48PM by PIB Mumbai

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाने उद्या नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिन 2024 निमित्त प्रतिष्ठित राष्ट्रीय दिव्यांगजन सक्षमीकरण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.   राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील आणि 33 आदर्श व्यक्तीसंस्था आणि संघटनांना  दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणात त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करतील.

या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्यासह सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि बी.एल. वर्मा उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी डिसेंबर रोजीदिव्यांगजन सक्षमीकरण विभाग दिव्यांग क्षेत्रात अपवादात्मक वचनबद्धता आणि उपलब्धीचे दर्शन घडवणाऱ्या मान्यताप्राप्त व्यक्तीसंघटना स्वयंसेवी संस्था आणि राज्य/ जिल्हा/ केंद्रशासित प्रशासन यांना सन्मानित करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करते.  हा कार्यक्रम केवळ दिव्यांगजनांचा  संघर्ष आणि यशोगाथा साजरी करत नाही तर खऱ्या प्रगतीचे आधारस्तंभ म्हणून सक्षमीकरणसमावेशकता  आणि समानतेचा संदेशही अधोरेखित करतो.

राष्ट्रीय पुरस्कार 2024 विविध उपश्रेणींसह दोन प्रमुख श्रेणींमध्ये प्रदान  केले जातील:

 
1. 
वैयक्तिक उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार

  • सर्वोत्कृष्ट दिव्यांगजन
  • दिव्यांग क्षेत्रात कार्यरत  सर्वोत्तम पुनर्वसन व्यावसायिक किंवा कामगार
  • दिव्यांगजन  सशक्तीकरणातील सर्वोत्तम संशोधन/नवोन्मेष /उत्पादन विकास
  • उल्लेखनीय दिव्यांगजन
  • सर्वोत्कृष्ट दिव्यांग बालक (मुलगा/मुलगी )
  • दिव्यांगजन सक्षमीकरणासाठी कार्यरत सर्वोत्कृष्ट व्यक्ती


2. संस्थात्मक उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार
 

  • दिव्यांगजन सक्षमीकरणासाठी कार्यरत सर्वोत्तम संस्था (खाजगी संस्थास्वयंसेवी संस्था)
  • दिव्यांगजनांसाठी  सर्वोत्तम  नियोक्ता (सरकारी/सार्वजनिक उपक्रम /खाजगी)
  • दिव्यांगजनांसाठी सर्वोत्तम प्लेसमेंट संस्था
  • सुगम्य  भारत मोहिमेची अंमलबजावणी करणारे सर्वोत्तम राज्य/केंद्रशासित प्रदेश/जिल्हा
  • सर्वोत्कृष्ट सुगम्य  वाहतूक/आयसीटी सोल्यूशन्स (खाजगी/सरकारी)
  • केंद्रशासित प्रदेश/जिल्हाआणि दिव्यांगजनांसाठी योजनांची अंमलबजावणी करणारे  सर्वोत्तम राज्य2016 दिव्यांगजन अधिकार  कायदा 
  • अंतर्गत सर्वोत्तम राज्याचे दिव्यांगजन   आयुक्त2016 दिव्यांगजन अधिकार  कायदा 
  • पुनर्वसन व्यावसायिक विकासाशी संलग्न सर्वोत्तम संस्था

 

राष्ट्रीय पुरस्कार 2024 साठी 15 जून ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर (www.awards.gov.inअर्ज मागवण्यात आले होते. या कालावधीत तब्बल 1,886 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 1,704 वैयक्तिक श्रेणीसाठी तर 182 अर्ज संस्था श्रेणीत आले.

2024 च्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार 16 परिवर्तनशील उपक्रमांचे उद्घाटन करणार आहेत. दिव्यांगांचे जीवन समृद्ध करणारे हे उपक्रम सर्वसमावेशकता आणि नावीन्यपूर्णतेला चालना देणारे आहेत. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापरही त्यात केला जाईल. त्यामुळे दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी असलेली विभागाची वचनबद्धता अधिक दृढ बनेल.

 

प्रमुख उपक्रम: 

  • भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मद्रास आणि स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (एसबीएमटी) बेंगळुरू यांच्या सहकार्याने ‘कदम नी जॉइंट’ चे उद्घाटन.
  • केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संघटना (सीएसआयओ)
  • वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद
  • (सीएसआयआर)चंदीगडने विकसित केलेल्या उच्च-शक्तीच्या चष्म्यांचा परिचय.
  • आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एएलआयएमसीओ)कानपूर द्वारे ‘दिव्यशा’ ई-कॉफी टेबल बुकचे प्रकाशन.
  • अक्सिसेबल बिल्ट एन्वॉयर्नमेंट ऑडिटर्स पॅनेलसाठी अर्ज.
  • ‘सुगम्य भारत यात्रे’साठी असोसिएशन फॉर पर्सन विथ डिसॅबिलिटीज (एपीडी) आणि पर्सन विथ डिसअबिलिटीज (पीडब्ल्यूडीज) यांच्यात सामंजस्य करार.
  • ‘पाथवेज टू ऍक्सेस: भाग 3’ चे उद्घाटन.
  •  जागरूकता निर्माण आणि प्रचार पोर्टलचा परिचय.
  • नॅशनल बूक ट्रस्ट (एनबीटी) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन विथ व्हिज्युअल डिसॅबिलिटीज (एनआयइपीव्हीडी )डेहराडून यांच्या सहकार्याने दृष्टिहीन मुलांसाठी 21 कथापुस्तकांचे प्रकाशन.
  • भारतीय ब्रेल कोड मानकांचे अंतिम रूप.
  • ‘ब्रेल बुक पोर्टल’चे उद्घाटन .
  • इन्फोसिस बीपीएम लिमिटेडशी रोजगार सामंजस्य करार.
  • दिव्यांगांसाठी 11 भारतीय भाषांमध्ये रोजगारक्षमता वाढवणारी कौशल्य पुस्तके
  • इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड कौशल्य कार्यक्रम
  • श्रवणदोष असलेल्या व्यक्तींसाठी साइन अप गूगल एक्सटेन्शन
  • टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि बौद्धिक अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय संस्था (एनआयइपीआयडी) यांच्या वतीने ई-सानिध्य पोर्टल
  • एनआयइपीआयडीद्वारे संगणक-आधारित भारतीय बुद्धिमत्ता चाचणी

 

हे उपक्रम दिव्यांगांसाठी सर्वसमावेशक शिक्षणतंत्रज्ञान आणि रोजगाराच्या क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे भविष्यात अधिक सक्षम आणि स्वावलंबी होण्यासाठीचा दिव्यांगांचा मार्ग मोकळा होईल. या उपक्रमांच्या अंमलबजावणी प्रक्रियेत सरकारी आणि बिगर-सरकारी संस्थांचे प्रतिनिधीतज्ञ आणि विविध भागधारकांना एकत्र आणले जाईल. सामाजिक बदलाला चालना देणे आणि समाजाचा सर्वसमावेशक दृष्टीकोन विकसित करणे हे या उपक्रमांचे उद्दिष्ट आहे.

 ***

SonalT/SushamaK/ PRAJNA/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2080037) Visitor Counter : 28