कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल सक्षमीकरणाद्वारे जीवन सुलभता : डीएलसी मोहीम 3.0 ने गाठला मैलाचा दगड – 1.30 कोटी डीएलसी तयार करण्यात आले

Posted On: 01 DEC 2024 4:18PM by PIB Mumbai

 

निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभागाने डिजिटल जीवन प्रमाणपत्र (डीएलसी) मोहीम 3.0 यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करणे सोपे करण्यासाठी, विशेषतः वयोवृद्ध   निवृत्तिवेतनधारकांसाठी सुरू केलेल्या या उपक्रमाने अभिनव तंत्रज्ञानाचा आणि सर्व हितधारकांच्या व्यापक सहकार्याचा उपयोग करून महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

निष्कर्ष आणि प्रमुख उपलब्धी :

  • डीएलसी मोहीम 3.0 ही भारतातील निवृत्तिवेतनधारकांच्या कल्याणासाठी हाती घेतलेली सर्वात मोठी मोहीम होती. या मोहिमेद्वारे 1.30 कोटी डीएलसी तयार करण्यात आले आहेत. 
  • फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून 39 लाखांहून अधिक, म्हणजेच 30% पेक्षा जास्त डीएलसी तयार झाले आहेत. डीएलसी 2.0 मोहिमेच्या तुलनेत हा आकडा 200 पटीने वाढला आहे.  
  • हे अत्याधुनिक तंत्रज्ञान विशेषतः अशा नागरिकांसाठी फायदेशीर ठरलेज्या ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे धूसर झाले आहेत, हालचालीत अडचण असलेल्या दिव्यांग व्यक्ती, ग्रामीण आणि दुर्गम भागातील पेन्शनधारक. 
  • 80 वर्षांवरील निवृत्तिवेतनधारकांद्वारे मोठ्या प्रमाणात डीएलसी सादरीकरणासाठी विशेष प्रयत्न केले गेले. 8 लाखांहून अधिक डीएलसी सादर झाले. 
  • आयपीपीबीने ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच सेवा देण्यात पुढाकार घेतला. 
  • डीडी न्यूज, आकाशवाणी, तसेच संसद टीव्ही आणि मुद्रित माध्यमांनी (पीटीआय, पीआयबी) डीएलसी मोहीम 3.0 चा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. या महत्त्वपूर्ण माध्यम प्रसारामुळे देशभरातील 12.2 कोटींहून अधिक लोकांपर्यंत ही मोहीम पोहोचली.

राज्यांतील डीएलसीचे वितरण : 

  • महाराष्ट्र: प्रभावी समन्वय आणि सार्वजनिक जागरूकता मोहिमांद्वारे 20 लाख डीएलसी केले साध्य
  • तामिळनाडू: नाविन्यपूर्ण जनजागृती तंत्रांचा वापर करून 13 लाख डीएलसी केले तयार 
  • उत्तर प्रदेश: दुर्गम भागातही प्रवेश सुनिश्चित करून 11 लाख डीएलसी पूर्ण. 
  • पश्चिम बंगाल: 10 लाख डीएलसी सादर

***

S.Kane/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2079550) Visitor Counter : 54