नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय बंदर वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि इटलीचे उद्योगमंत्री अडोल्फो उर्सो यांची भेट, मजबूत सागरी सहकार्याची घेतली शपथ


जहाजबांधणी मंत्री सोनोवाल यांनी मुंबई बंदरातील इंदिरा डॉक येथे इटालियन नौदल जहाज ‘AMERIGO VESPUCCI’ आणि इटलीच्या मॉडेल व्हिलेजला भेट दिली

सर्बानंद सोनोवाल यांनी इटलीला सहकार्य करण्याचे आवाहन केले

Posted On: 30 NOV 2024 8:25PM by PIB Mumbai

 

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुंबई येथे उभय देशांमधील सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टिकोनातून इटली सरकारचे उद्योगमंत्री अडोल्फो उर्सो यांची भेट घेतली. मुंबई बंदरातील इंदिरा डॉक येथे इटालियन नेव्ही स्कूल शिप, AMERIGO VESPUCCI  जहाजाच्या येथे ही बैठक पार पडली. त्यानंतर सोनोवाल आणि उर्सो यांनी  इटालियन संस्कृतीचे दर्शन घेण्यासाठी इटलीच्या मॉडेल व्हिलेज ‘व्हिलाजिओ इटालिया’ला भेट दिली.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री, सर्बानंद सोनोवाल म्हणाले, “भारत आणि इटली हे दोन्ही देश द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध आहेत. हा अत्यंत समाधानाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या गतिशील नेतृत्वाखाली, व्यापार, पायाभूत सुविधा, ऑटोमोबाईल आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा यासारख्या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रवेशासह, इटली भारताच्या सर्वोच्च व्यापार भागीदारांमध्ये राहिल्यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य वाढले आहे. आज, आम्ही धोरणात्मक भागीदारीचा आनंद घेत आहोत, कारण आम्ही सायबर सुरक्षा, नावीन्य, संरक्षण, बाह्य अवकाश, हरित अर्थव्यवस्था, ऊर्जा सुरक्षा आणि संक्रमण, तसेच ब्लू इकॉनॉमी यांसारख्या क्षेत्रात काम करत आहोत. वाढते व्यापारी संबंध लक्षात घेता, दोन्ही राष्ट्रांसाठी आर्थिक व्यवहार वाढवण्याच्या दृष्टिने आपण आपले सागरी सहकार्य अधिक वाढवणे आवश्यक आहे. आम्हाला माहित आहे की कोचीन शिपयार्ड लिमिटेड जहाज बांधणीच्या क्षेत्रात आधीच फिनकेन्टीएरीसोबत काम करत आहोत. तरी आमचे द्विपक्षीय सागरी संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टिकोनातून सागरी अर्थव्यवस्थेच्या समृद्ध संधी शोधण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”

उद्घाटन सत्रात बोलताना, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी गुजरातमधील लोथल येथे MoPSW द्वारे बांधले जात असलेल्या राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (NMHC) मध्ये समर्थन आणि सहकार्य करण्याची विनंती केली. इटलीचे सागरी कौशल्य तसेच सांस्कृतिक पराक्रम या सागरी संग्रहालयात कशी मोलाची भर घालू शकते, यावर मंत्री महोदयांनी प्रकाश टाकला.

याव्यतिरिक्त, इटालियन सर्जनशीलता आणि कारागिरीचे दर्शन घडवण्यासाठी याठिकाणी एक इटालियन व्हिलेज तयार करण्यात आले आहे. व्हिलाजिओ इटालिया सोबतच येथे ‘वुई आर सी’ प्रदर्शन, एक्स्पो लिओनार्डो, जिओटो एक्सपीरियन्स, द आर्ट ऑफ जागो, सॅनरेमो फेस्टिव्हल यासारखी अनेक प्रदर्शने दाखवण्यात येतील. तसेच, जगातील सर्वात सुंदर जहाज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि जगभरात प्रवास करत असलेल्या AMERIGO VESPUCCI या जहाजालाही नागरिक भेट देऊ शकतात.

AMERIGO VESPUCCI हे इटालियन नौदलाचे एक भव्य जहाज आहे. इटालियन प्रवासी Amerigo Vespucci यांच्या स्मरणार्थ त्याचे नाव देण्यात आलेले हे जहाज मे 1931 मध्ये कार्यान्वित झाले. हे जहाज 15 नॉटिकल माईल प्रतितास (28 किमी प्रतितास) वेगाने समुद्रात प्रवास करते. यामध्ये 15 अधिकारी, 64 नॉन-कमिशन्ड अधिकारी, 185 खलाशी आणि 130 नेव्हल अकादमी कॅडेट्स आणि सहाय्यक कर्मचारी आहेत. जहाजाच्या वर्ल्ड टूर 2023-2025चा एक भाग म्हणून, जहाजाने अमेरिकेतील लॉस एंजेलिस, जपानमधील टोकियो, ऑस्ट्रेलियातील डार्विन, सिंगापूर येथे भेट दिली. त्यानंतर ते आता मुंबईत दाखल झाले आहेत. पुढे ते दोहा, अबू धाबी आणि जेद्दाहला या शहरांना भेट देणार आहे.

अंतराळ आणि ब्लू इकॉनॉमी या विषयावरील उद्घाटन सत्राला मुंबई पोर्ट ऑथरिटीचे अध्यक्ष सुशील कुमार सिंग, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेश कुमार सिन्हा, मुंबई पोर्ट ऑथरिटीचे उपाध्यक्ष, आदेश तितरमारे इटालियन नौदलातील अॅडमिरल अँटोनियो नताले, इटलीचे भारतातील राजदूत अँटोनियो बार्टोली, उद्योगमंत्र्यांचे राजनैतिक सल्लागार राजदूत मारियो कॉस्पिटो, संरक्षण मंत्र्यांचे वरिष्ठ सल्लागार फ्रान्सिस्को मारिया टालो आणि लुका आंद्रेओल आणि एडी डिदेसा सेर्विझी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

***

H.Akude/P.Kor

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2079467) Visitor Counter : 68


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi