माहिती आणि प्रसारण मंत्रालय
काश्मीरच्या रौफ डान्सपासून तामिळनाडूच्या कराकट्टमपर्यंत: केंद्रीय संचार ब्यूरोने इफ्फी 55 मध्ये शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य कलाकारांचा साधला मेळ
55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देशभरातील 110 कलाकारांनी केले आपल्या कलेचे सादरीकरण
इफ्फी 2024 – भारतातील चित्रपट आणि कला प्रकारांचा उत्सव साजरा करण्याचे स्थान
#IFFIWood, 28 नोव्हेंबर 2024
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो(सीबीसी), आपल्या गीत आणि नाटक विभागातील कलाकारांच्या माध्यमातून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचे दर्शन, गोव्यात पणजी येथे सुरू असलेल्या 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या स्थानी घडवत आहे. इफ्फी 2024 दरम्यान सुरू असलेल्या इफ्फिएस्टा उपक्रमाचा भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
इफ्फी 55 मध्ये सीबीसीकडून सांस्कृतिक मेजवानी
देशाची चैतन्यमयी परंपरा आणि कलात्मक वारसा यांना इफ्फी 2024 मध्ये महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आले असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून देशाच्या विविध प्रांतातील शास्त्रीय आणि लोकनृत्य प्रकारांचे दर्शन घडवले जात आहे. प्रत्येक नृत्यप्रकाराचे आपापले वैशिष्ट्य असून स्थानिक चालीरीती, प्रथा आणि त्या त्या प्रांताची आध्यत्मिकता त्यासोबत गुंफली गेली आहे. इफ्फीसाठी आलेल्या चित्रपट रसिकांना नेत्रदीपक आणि कलात्मक अविष्कार पाहायला मिळत आहे.
देशभरातील 110 हून अधिक प्रतिभावान कलाकार या कार्यक्रमात समाविष्ट असून प्रादेशिक नृत्यशैलींच्या वैविध्यपूर्ण प्रकारांचे प्रतिनिधित्व ते करत आहेत.
गुवाहाटी, हैदराबाद, भुवनेश्वर, जम्मू, चेन्नई, हिमाचल प्रदेश, बेंगळुरू, पुणे आणि दिल्ली यांसह विविध सीबीसी प्रादेशिक कार्यालयांद्वारे त्यांच्या कलेचे सादरीकरण आयोजित केले जात आहेत.
कलाकार पुढील कलाप्रकार सादर करत आहेत:
- आसाममधील सातरिया, भोरताल, देवधानी आणि बिहू नृत्य – सीबीसी गुवाहाटीद्वारे प्रस्तुत
- तेलंगणातील गुस्साडी नृत्य – सीबीसी हैदराबाद प्रस्तुत
- ओडिशामधील ओडिसी – सीबीसी भुवनेश्वर प्रस्तुत
- काश्मीरमधील रौफ - सीबीसी जम्मू क्षेत्र प्रस्तुत
- तामिळनाडूमधील कराकट्टम – सीबीसी चेन्नई प्रस्तुत
- केरळचे मोहिनीअट्टम नृत्य – सीबीसी केरळ द्वारे प्रस्तुत
- हिमाचल प्रदेशातील शिरमौर नाती, दग्याली आणि दीप नृत्य – सीबीसी हिमाचल प्रदेश द्वारे प्रस्तुत
- कर्नाटकमधील जोगाठी आणि दिपम नृत्य – सीबीसी बेंगळूरू द्वारे प्रस्तुत
- महाराष्ट्रातील लावणी नृत्य तसेच मुजरा नृत्यप्रकार – सीबीसी पुणे द्वारे प्रस्तुत
- राजस्थानातील चेरी आणि कालबेलिया नृत्यप्रकार आणि बिहारचे झिजिया नृत्य – सीबीसी दिल्ली द्वारे प्रस्तुत
सीबीसी द्वारे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगीत छायाचित्रे आम्ही प्रस्तुत केली आहेत. सीबीसीच्या शास्त्रीय आणि लोककलांच्या कलाकारांनी सादर केलेल्या नृत्यांची छायाचित्रे पाहण्यासाठी खाली स्क्रोल करू शकता.
सीबीसीच्या क्षेत्रीय कार्यालयांनी आयोजित केलेले कार्यक्रम
काश्मीरचे रौफ नृत्य – सीबीसी जम्मू विभागातर्फे प्रस्तुत
ओदिशा राज्याचे ओडिसी नृत्य – सीबीसी भुवनेश्वरतर्फे प्रस्तुत
केरळातील मोहिनीअट्टम नृत्यप्रकार – सीबीसी केरळ द्वारे प्रस्तुत
हिमाचल प्रदेशातील शिरमोर नाती, दग्याली आणि दीप नृत्य – सीबीसी हिमाचल प्रदेश द्वारे प्रस्तुत
राजस्थानातील चेरी आणि कालबेलिया नृत्यप्रकार आणि बिहारचे झिजिया नृत्य तसेच हरियाणवी नृत्य – सीबीसी दिल्ली द्वारे प्रस्तुत
आसाम मधील सातरिया, भोरताल, देवधानी आणि बिहू नृत्यप्रकार – सीबीसी गुवाहाटी द्वारे प्रस्तुत
कर्नाटकमधील जोगाट आणि दिपम नृत्य – सीबीसी बेंगळूरू द्वारे प्रस्तुत
महाराष्ट्रातील लावणी नृत्य तसेच मुजरा नृत्यप्रकार – सीबीसी पुणे द्वारे प्रस्तुत
तेलंगणाचे गुस्साडी नृत्य – सीबीसी हैदराबाद द्वारे प्रस्तुत
तामिळनाडू येथील कराकट्टम– सीबीसी चेन्नई द्वारे प्रस्तुत
इफ्फीएस्टा बद्दल माहिती:
55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2024 मध्ये आयोजित विविध उपक्रमांच्या अंतर्गत गोव्यातील देखण्या कला अकादमीत 21 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत आयएफएफआयईएसटीए, (इफ्फीएस्टा) या नेत्रदीपक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. चित्रपट, संगीत, कला आणि खाद्यपदार्थ यांच्या जादूचा अविष्कार घडवण्यासाठी आयोजित या महोत्सवाने संस्कृती आणि मनोरंजन यांच्या आकर्षक मिलाफातून विविध समुदायांना एकत्र आणले.
कला अकादमीचा अंतर्बाह्य परिसर युवा वर्गावर लक्ष केंद्रित करणारा होता. इफ्फीएस्टा उपक्रमाचा भाग म्हणून 22 नोव्हेंबर रोजी ‘भारतीय चित्रपटांची वाटचाल’ या संकल्पनेभोवती फिरणारी कार्निव्हल परेड ही आनंदोत्सवी मिरवणूक देखील आयोजित करण्यात आली होती.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Sonali/Sanjana/Darshana | IFFI 55
(Release ID: 2078473)
Visitor Counter : 11