माहिती आणि प्रसारण मंत्रालय
इफ्फीमधील 'फॉर राणा' आणि 'द न्यू इयर दॅट नेव्हर केम' हे चित्रपट आत्म-शोध, त्याग तसेच अत्याचार आणि जुलुमाच्या दुःखदायक छटांचा शोध घेतात
भारतीय प्रेक्षक सिनेमाला खूप महत्त्व देतात आणि त्यात उत्साहाने जोडले जातात : दिग्दर्शक इमान यझदी
‘फॉर राणा’ चित्रपट मध्यमवर्गीय जीवनातील संघर्ष आणि असुरक्षेचा शोध घेतो : दिग्दर्शक इमान याझदी
'द न्यू इयर दॅट नेव्हर केम' ही सिम्फोनिक दृष्टीकोन असलेली डार्क कॉमेडी आहे: दिग्दर्शक बोगदान मुरेसानु
#IFFIWood, 27 नोव्हेंबर 2024
55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दोन सिनेमॅटिक अनमोल रत्नांचे अनावरण करण्यात आले: इराणी उत्कृष्ट कलाकृती 'फॉर राणा' जी प्रतिष्ठित 'आयसीएफटी युनेस्को गांधी पदक' साठी स्पर्धेत आहे आणि रोमानियन चित्रपट, 'द न्यू इयर दॅट नेव्हर केम' जो प्रतिष्ठित 'आंतरराष्ट्रीय स्पर्धा' श्रेणी मध्ये स्पर्धेत आहे. दूरदर्शी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी जिवंत केलेले हे चित्रपट सामान्य कथाकथनाच्या कक्षा ओलांडून पुढे जातात आणि एका गहन प्रवासाला निघतात जे आत्म-शोध, त्याग आणि अत्याचार आणि जुलूम यांच्या भयावह सावल्यांचा शोध घेतात.
माध्यमांशी संवाद साधताना, ‘फॉर राणा’ चे दिग्दर्शक इमान याझदी म्हणाले की हा चित्रपट संघर्ष, कमकुवतपणा आणि मध्यमवर्गावरील सामाजिक प्रभावाचे प्रतिनिधित्व करतो.इफ्फीमधील त्यांच्या अनुभवाबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की इथले प्रेक्षक चित्रपटाला खरोखरच महत्त्व देतात, भारतातील लोकांमध्ये चित्रपटांबद्दल खूप उत्साह असून ते त्याच्याशी जोडले जातात. थ्रिलर शैलीची निवड पिता-पुत्राच्या नातेसंबंधाच्या चित्रणाने प्रेरित होती ,ज्यात सामाजिक दबाव आणि परिस्थिती व्यक्तींना कठीण निर्णय घेण्यास कसे भाग पाडतात हे ठळकपणे मांडले आहे.
दरम्यान, ‘द न्यू इयर दॅट नेव्हर केम’ चे दिग्दर्शक बोगदान मुरेसानु यांनी त्यांच्या चित्रपटाचे वर्णन रोमानियन क्रांतीच्या पार्श्वभूमीवर घडलेली एक विनोदी शोकांतिका असे केले आहे, जी त्या काळातील दूरचित्रवाणी क्रांतींपैकी एक आहे. मुरेसानु यांनी भूतकाळातील नाट्य साकारताना येणाऱ्या आव्हानांचा उल्लेख केला ज्यात या विषयावर व्यापक संशोधन करण्याची गरज होती आणि ते इतिहासाच्या विडंबनामुळे हा चित्रपट बनवण्यासाठी प्रेरित झाले होते. आपल्या इफ्फी अनुभवाबाबत बोलताना ते म्हणाले की, सिनेमा एक सार्वत्रिक भाषा प्रदान करतो ज्यामुळे विविध देशांतील लोक एकमेकांशी जोडले जाऊ शकतात आणि त्यांना समजून घेऊ शकतात.
चित्रपटांबद्दल:
फॉर राणा: आरेफ त्याची पत्नी आणि मुलगी राणासोबत राहत असतो आणि मोटरसायकल रॅम्प जंपचा विश्वविक्रम मोडण्याचे त्याचे स्वप्न असते. मात्र या महत्त्वाकांक्षी ध्येयासाठी काम करत असताना, तो कौटुंबिक घटनांमध्ये अडकतो ज्या त्याला कठीण दुविधेचा सामना करण्यास भाग पाडतात.
‘द न्यू इयर दॅट नेव्हर केम’: चासेस्कूच्या हुकूमशाहीत अनेक दशकांच्या क्रूर दडपशाहीनंतर, रोमानिया क्रांतीच्या मार्गावर आहे. रस्त्यावरील निदर्शने आणि शासनाची खिल्ली उडवणारे विद्यार्थी या पार्श्वभूमीवर कुटुंबे गुप्तपणे वैयक्तिक संघर्ष आणि कायम पहारा देत असलेल्या गुप्त पोलिसांशी संघर्ष करतात. एकाच दिवसात, सहा असंबंधित जीव एकमेकांना भेटतात, बदलाची आशा धरून भीतीने जगण्याच्या मूर्खपणा व्यक्त करतात. तणाव वाढत असताना, एक महत्त्वाचा क्षण त्यांना एकत्र आणतो , ज्यामुळे चासेस्कू आणि कम्युनिस्ट राजवटीचे नाट्यमयरित्या पतन होते.
पत्रकार परिषद येथे पहा:
* * *
PIB IFFI CAST AND CREW | S.Patil/Sushma/Darshana | IFFI 55
(Release ID: 2078219)
Visitor Counter : 5