माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 9

55 व्या ‘ इफ्फी’मध्ये ‘‘ब्लरिंग बाउंडरीज: हाऊ पब्लिक रिलेशन (PR) शेप्स मॉडर्न फिल्म रिसेप्शन’’ (धूसर होणाऱ्या सीमारेषा: जनसंपर्क विद्येचा आधुनिक चित्रपटांवरील परिणाम) या विषयावर समूह चर्चा


“चित्रपटामध्‍ये जीवन दर्शन , अस्सलता यांचे प्रमाण वाढल्यामुळे ‘पीआर’ हे त्याचा विपर्यास न करता सत्य अधिक व्‍यापक मांडणारे साधन असावे ”: रवी कोट्टारक्करा

“पीआरचा शस्त्रासारखा केलेला वापर हे सखोल सामाजिक बदल प्रतिबिंबित करते, मात्र समज अनेकदा वास्तविकतेवर मात करते”: शंकर रामकृष्णन

“सिनेमाचे सत्य अधिक उजळताना अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्‍यात जनसंपर्क विद्येचे सारं, चित्रपटाविषयी अयोग्य माहिती प्रसृत करणे नव्हे”: हिमेश मांकड

“पीआरचलित प्रसिध्‍दीचा प्रेक्षकांकडून योग्य निर्णय होतो :” हिमेश मांकड

#IFFIWood, 27 नोव्‍हेंबर 2024

 

"सिनेमामधील सत्य आणि समज यांच्यातील धूसर रेषा"  या शीर्षकाअंतर्गत  एक अभ्यासपूर्ण चर्चासत्र इफ्फीमध्‍ये आज पार पडले.  भारताच्या 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्‍ये जनसंपर्क (पीआर), प्रेक्षक धारणा आणि सिनेमॅटिक अस्सलतेची  विकसित भूमिका,  यावर चर्चा करण्यासाठी  या क्षेत्रातील  तज्‍ज्ञांना एकत्र आणले. प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि निर्माते जयप्रद देसाई यांनी या समूह चर्चेचे सूत्रसंचालन केले. या समूहामध्ये प्रतिष्ठित चित्रपट निर्माता आणि भारतीय चित्रपट महासंघाचे अध्यक्ष रवी कोट्टारकारा,  प्रसिद्ध चित्रपट निर्माते शंकर रामकृष्णन; आणि ज्येष्ठ चित्रपट पत्रकार हिमेश मांकड सहभागी झाले होते.

ही चर्चा विशेषत: समाज माध्‍यमाचे वर्चस्व असलेल्या युगात आणि तत्काळ प्रेक्षकांच्या अभिप्रायाने चित्रपट उद्योगाच्या परीघाला  आकार देण्यासाठी  पीआर म्हणजेच जनसंपर्काच्या परिवर्तनीय भूमिकेविषयी   केंद्रित होती. असे दिसून आले की सत्य आणि समज यांच्यातील रेषा अधिकाधिक धूसर  होत चालल्या आहेत. कारण प्रचारात्मक रणनीती अनेकदा सिनेमाचे सार-सत्व झाकोळून टाकतात. सिनेमातील सामग्रीच्या ऐवजी तयार केलेल्या प्रतिमेवर अधिक लक्ष केंद्रित करतात.

एकेकाळी पीआर म्हणजे जनसंपर्क विस्‍तारणे याकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रीत केले जात होते, यावर  हिमेश मांकड यांनी  प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की, "चित्रपटामध्‍ये नेमके काय आहे, हे सांगताना  अनेकदा धोरणात्मक मोहिमेद्वारे त्याचे अनुकूल चित्र निर्माण  केले जाते,त्यामुळे  प्रेक्षकांची दिशाभूल होते आणि विश्वासार्हताही  कमी होते."  मात्र असे करण्‍याऐवजी पीआरने  सत्यतेच्या महत्त्वावर भर दिला पाहिजे, कारण पीआर-चालित कथांकडे दुर्लक्ष करून, प्रेक्षक हेच चित्रपटाच्या यशाचे अंतिम निर्णायक असतात,’’ असे मांकड यांनी मत व्यक्त केले.

रवी कोट्टारकारा यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वाढत्या प्रभावावर प्रकाश टाकला, अशा मंचावर चित्रपटांचे विश्‍लेषण  करून आणि प्रभावीपणे  मते नोंदवली जातात. त्‍यामुळे चित्रपटाला उचलून धरणे किंवा तो पाडण्‍याचे काम,  असेही केले जाते.  "कोणीतरी फार सखोल अभ्‍यास न करता, चुकीच्या वेळी दिलेल्या रिव्‍ह्यूजमुळे एखादा सशक्त चित्रपट देखील यथातथा कामगिरी करू शकतो." ओटीटी प्लॅटफॉर्म कशा प्रकारे आपल्‍याला हवे तसे रिव्‍ह्यूज प्रसिध्‍द करून घेतात,  याकडेही त्यांनी लक्ष वेधले, "क्युरेटेड 'टॉप 10' याद्या बऱ्याचदा अंतर्गत प्राधान्यांद्वारे  तयार केल्या  जातात, वास्तविक प्रेक्षकांनी दिलेला तो कल, नसतोच" असे रवि कोट्टारकारा यांनी स्‍पष्‍ट केले

शंकर रामकृष्णन यांनी केरळ चित्रपट उद्योगातील अंतर्दृष्टी सामायिक केली. चित्रपटाच्‍या प्रसिध्‍दी मोहिमेत सांस्कृतिक संवेदनशीलता आणि समाज माध्‍यमाच्या भूमिकेवर जोर दिला. त्यांनी नमूद केले की  पीआरमार्फत  चित्रपटांचे रेटिंग फारसे वाढवता येत नाही. परंतु प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध शस्त्र म्हणून पीआरचा वापर केला जावू शकतो, असे सांगून शंकर रामकृष्‍णन यांनी  "काही प्रकरणांमध्ये, पीआर  हे चित्रपटाच्‍या प्रसिध्‍दीसाठी कमी, मात्र  तीव्र स्पर्धात्मक वातावरणामध्ये टिकून राहण्याबद्दल अधिक महत्वाचे ठरते."

पीआर म्हणजेच जनसंपर्क  हे एक आवश्यक साधन असले तरी त्याचा गैरवापर चित्रपट उद्योगाची विश्वासार्हता नष्ट करू शकतो, यावर  पॅनेलच्या सदस्यांमध्‍ये  एकमत झाले. सिनेमाच्या कलात्मकतेला कमकुवत करण्याऐवजी  पीआर समर्थन करते याची खात्री करण्यासाठी सत्रात नैतिक पद्धतींचा अवलंब करण्‍याचा  सल्ला देण्यात आला. जयप्रद देसाई यांनी सांगितले की , पीआर ही दुधारी तलवार आहे. हे चित्रपटाचा आवाका वाढवू शकतो  तरी, त्याच्या अतिप्रमाणामुळे  विश्वासार्हतेचे संकट निर्माण होते, यामुळे चित्रपट निर्माते आणि प्रेक्षकांमधील विश्वास कमी होतो.

या चर्चासत्राने प्रभावी  जनसंपर्क  आणि अस्सल कथाकथन यांच्यातील संतुलनाच्या गरजेवर विविध दृष्टीकोन प्रदान केले. पॅनेलच्या सदस्यांनी अशा भविष्याची कल्पना केली,  जिथे नैतिक पीआर वास्तविकतेसह समज संरेखित करण्यात मदत करते,  प्रेक्षकांबरोबर  पारदर्शक आणि विश्वासार्ह नातेसंबंध वाढवते.

PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Suvarna/Priti | IFFI 55

 

 

 

 

 

 

 

iffi reel

(Release ID: 2078212) Visitor Counter : 9


Read this release in: Hindi , Konkani , English