माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav
iffi banner

“चित्रपट निर्मितीमध्‍ये कोणताही नियम नसतो. ही सर्जनशीलतेची निवड आणि वैयक्तिक निर्णय आहे. तुमची कथा किती मनोरंजक करता आणि विश्‍वासाने इतरांना पटवून देता, यावर सर्व काही अवलंबून आहे”: सिनेमॅटोग्राफर के.के.सेंथिल कुमार


“मला तंत्रज्ञानाच्या विरोधात लढायचे नाही, मला माझ्या काम आणि तंत्रज्ञान एकीकृत करताना विकसित व्‍हायचे आहे”: सेंथिल कुमार

“कृत्रिम प्रज्ञा संचालित व्‍हीएफएक्स हे भविष्य आहे”: सेंथिल कुमार

#IFFIWood, 25 नोव्‍हेंबर 2024

मगधीरा ते ईगा आणि बाहुबली ते आरआरआर अशा लोकप्रिय झालेल्या चित्रपटांच्या लेन्समागची व्यक्ती म्हणजे- सिनेमॅटोग्राफर के.के.सेंथिल कुमार आहेत. त्यांनी जगभरातील चित्रपट रसिकांसाठी अनेक महाकाव्य कथांना दृष्यात्मक स्‍वरूपामध्‍ये आश्चर्यकारक वाटाव्या अशा उत्कृष्ट कृतींमध्ये रूपांतरित केले आहे. या ब्लॉकबस्टर्समधील कॅमेऱ्याच्या मनमोहक हालचाली, सळसळणा-या रंगछटा, विरोधाभासी सावल्यांचा उत्कृष्ट वापर आणि अतिशय उत्तेजक, जागृत करणारी  प्रकाशयोजना, प्रसंगांना भावनिक खोली देण्‍याचे काम करणारी दृश्‍ये, पडद्यावर सतत काहीतरी घडत असणारी  कृती, नाट्य आणि कल्पनारम्य मिश्रणासह भव्य दृश्य कथाकथनात समतोल साधण्याची त्यांची क्षमता या भव्‍य चित्रपटांतून  प्रतिबिंबित होते. 

सेंथिल कुमार यांनी  गोव्यातील 55 व्या इफ्फी मध्ये “Integrating VFX with Cinematography” या विषयावरी  ‘इन-कन्व्हर्सेशन’ सत्रात आपले मनोगत आणि जीवन प्रवास सामायिक  केला. या सत्राचे सूत्रसंचालन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक शंकर रामकृष्णन यांनी केले. 

या संवाद सत्राला मार्गदर्शन करताना  सेंथिल कुमार यांनी  चित्रपट निर्मिती ही आव्हानात्मक प्रक्रिया असल्याचे सांगितले. “कोणत्याही चित्रपटाची  निर्मिती ही आव्हानांनी भरलेली आहे. तुम्हाला आव्हानांचा सामना करायचा नसेल, तर तुम्ही चित्रपटसृष्टीत न आलेलेच बरे”. यावेळी बोलताना त्यांनी आव्हाने स्वीकारण्याच्या महत्त्वावर भर दिला, विशेषत: व्‍हीएफएक्‍स  सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्‍ये  आज हे एक शक्तिशाली साधन म्हणून त्याकडे पाहिले जाते. या साधनाने  दृश्य कथाकथन वाढवून सिनेमॅटोग्राफरचे काम सोपे केले आहे. "व्हीएफएक्सने सिनेमॅटोग्राफरचे जीवन सोपे केले आहे आणि आता तर एआय म्हणजे कृत्रिम प्रज्ञा-संचलित व्‍हीएफक्स उदयास येत आहे.’’ असे ते म्हणाले. सर्जनशीलतेच्या  सीमा अधिक व्यापक बनत आहेत  असे सांगून संथिलकुमार यांनी तंत्रज्ञानाच्या संभाव्यतेवर प्रकाश टाकला.

सेंथिल यांनी तांत्रिक प्रगतीकडे कसे जायचे याबद्दल आपली भूमिकाही यावेळी स्पष्ट केली. "मला तंत्रज्ञानाच्या विरोधात लढायचे नाही, मला माझे  काम आणि तंत्रज्ञान एकीकृत करताना विकसित व्‍हायचे आहे" असे ते म्हणाला. हे तत्त्वज्ञानच त्यांच्या यशाचा अविभाज्य घटक बनले आहे, कारण ते  सतत नव्‍या गोष्‍टींचा स्‍वीकार करण्‍यावर भर देत असतात. आणि सिने दृष्‍यातून  गतिमान अनुभव तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण व्‍हीएफक्ससह पारंपरिक सिनेमॅटिक तंत्र यांचे एकत्रिकरण  करण्याचा प्रयत्न करीत असतात.

आपल्या सर्जनशील प्रक्रियेविषयी  सेंथिल कुमार म्हणाले,  प्रत्येक कथेच्या अनन्य साधारण गरजा समजून घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले. “प्रत्येक कथा स्वतःच अद्वितीय असते. तुम्ही तुमची कथा प्रेक्षकांना कशी सांगता हे महत्त्वाचे आहे. मी प्री-प्रॉडक्शन टप्प्यात कथा आणि त्याची आवश्यकता समजून घेण्यासाठी आणि त्यानुसार चित्रीकरणाचे नियोजन करण्यासाठी अधिक वेळ घेतो”,  असे त्यांनी स्पष्‍टपणे सांगितले.  व्हिज्युअल इफेक्ट्सच्या तांत्रिक मागण्यांना पूरक असलेल्या कथनासाठी, काम करणाऱ्या प्रतिमा तयार करण्यासाठी, सिनेमॅटोग्राफरने व्‍हीएफएक्‍स दिग्दर्शकाशी जवळून सामंजस्याने काम केले पाहिजे, हे लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या कामामधील सहकार्यावर  प्रकाश टाकला.

सिनेमॅटिक कलाकृतीची निर्मिती करताना दृष्यात्मक प्रभाव निर्माण करताना सर्व दृष्‍ये एकत्रित करण्यात अग्रणी असलेले सेंथिल कुमार यांनी  चित्रपट निर्मितीमध्ये कठोर नियमांची गरज नसते, ही गोष्‍ट  अधोरेखित केली. “चित्रपट निर्मितीत कोणताही नियम नसतो. ही एक सर्जनशील निवड आहे आणि तो वैयक्तिक निर्णय आहे. तुम्ही तुमची कथा किती मनोरंजकपणे आणि खात्रीपूर्वक सांगता यावर हे सर्व अवलंबून आहे”, प्रत्येक यशस्वी चित्रपटाच्या केंद्रस्थानी आकर्षक कथाकथन असते यावर त्यांनी भर दिला.

संवाद कार्यक्रमाच्या समारोपामध्‍ये  टिप्पणी करताना  सेंथिल कुमार यांनी आपल्या कारकिर्दीच्‍या प्रारंभीच्या दिवसांतील  एक वैयक्तिक किस्सा सामायिक केला. त्यांनी सांगितले  की, सिनेमॅटोग्राफीचा त्यांचा  मार्ग काहीसा निर्मळ होता. सुरुवातीला योगायोगाने फिल्म स्कूलमध्ये सामील होण्याच्या इराद्याने आपण या क्षेत्रात आलो. परंतु  लवकरच अथक परिश्रम  आणि  समर्पणाने चित्रपट निर्मितीची आवड जोपासली. सिनेमातील जीवनापेक्षा मोठ्या कथा सांगण्यासाठी सर्जनशील मर्यादा वाढवण्याची गरज लक्षात घेऊन, ते पुढे म्हणाले , "कथेला मनमोहक रीतीने मांडण्यासाठी आपल्याला अनेकवेळा तर्क आणि नियम तोडावे लागतात". 

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Sushma/Darshana | IFFI 55

iffi reel

(Release ID: 2077336) Visitor Counter : 40