माहिती आणि प्रसारण मंत्रालय
फिल्म बाजार 2024: सिनेमॅटिक उत्कृष्टता आणि जागतिक व्यावसायिक सहकार्याच्या उत्सवाचा 55 व्या इफ्फीमध्य् झाला समारोप
‘वर्क इन प्रोग्रेस’(WIP), फिल्म बाजार रेकमेंड्स(FBR) आणि स्टुडंट प्रोड्युसर वर्कशॉप पिच पुरस्कारांची फिल्म बाजार 2024 मध्ये घोषणा
फिल्म बाजारमध्ये फ्रेंच प्रतिनिधींचा सहभाग वाढवण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांबद्दल फ्रेंच इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचा झाला सन्मान
नामवंत कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांची फिल्म बाजार सोबत दोन सह-निर्मिती मार्केट प्रकल्पांवर सहकार्याची घोषणा
#IFFIWood, 25 नोव्हेंबर 2024
सिनेमॅटिक नवोन्मेष आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा साजरा करत 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा एक भाग असलेल्या फिल्म बाजार 2024 चा आज गोव्यामध्ये समारोप झाला. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उद्योगांमधील दिग्गज, उदयोन्मुख चित्रपट निर्माते आणि जागतिक भागीदार कथाकथनाच्या कलेचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि नवीन सर्जनशील उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र आले होते. गेल्या काही वर्षांत, फिल्म बाजार दक्षिण आशियाई आशय आणि प्रतिभेचा शोध घेण्यासाठी, त्यांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि संबंधितांना पाठबळ देण्यासाठी एक महत्त्वाचा मंच बनला आहे. जागतिक चित्रपट उद्योगातील सहयोग आणि वाढीसाठी एक गतिशील मध्यवर्ती मंच म्हणून तो काम करत आहे.
या कार्यक्रमात मुकेश छाब्रा यांनी फिल्म बाजारसोबत दोन सहनिर्मिती मार्केट प्रकल्पांसाठी सहकार्याची महत्त्वाची घोषणा केली. यातील पहिला प्रकल्प म्हणजे बागी बेचारे (साशंक बंडखोर) ही एक सीपीएम फीचर फिल्म असून त्यामध्ये ते कलाकारांना संधी देणार आहेत. दुसऱ्या प्रकल्पात 'चौहान्स बी एन बी बेड ॲन्ड बसेरा' या सीपीएम वेब सीरिजचा समावेश आहे. यामध्ये देखील कोणत्याही छाब्रा यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली भूमिकेची संधी मिळेल. या सहकार्यातून फिल्म बाजारची सर्जनशील प्रतिभेची जोपासना करण्याची आणि उद्योगातील भागीदारी बळकट करण्याची वचनबद्धता अधोरेखित होत आहे. या कार्यक्रमात महत्त्वाच्या नव्या भागीदाऱ्यांची देखील घोषणा करण्यात आली.
पटकथालेखन विकासासाठी फायनल ड्राफ्टसह सहकार्य, एपिसोडिक कथाकथनाला चालना देण्यासाठी फिल्म इंडिपेंडंट एपिसोडिक रायटिंग वर्कशॉप आणि SAAVA आणि ATF IP एक्सेलरेटर सोबत भागीदारी यासारख्या नवीन महत्त्वाच्या भागीदारींचा त्यात समावेश होता, ज्याने सीपीएममध्ये कोथियान- फिशर्स ऑफ मेनची दखल घेतली.
या उपक्रमांव्यतिरिक्त खालील चित्रपटांसाठी वर्क इन प्रोग्रेस पुरस्कार देण्यात आलेः
- रिध्धम जानवे यांच्या काट्टी री राट्टीः हंटर्स मूनला 50 तासांसाठी मोफत 4K DI प्रसाद लॅब्ज पुरस्कार मिळाला.
- त्रिबेणी राय यांच्या शेप ऑफ मोमोला न्यूब स्टुडियोचे रु. 6 लाखांचे एक डीआय पॅकेज पुरस्कार म्हणून देण्यात आले.
- विशेष उल्लेख म्हणून द गुड, द बॅड अँड द हन्ग्री आणि द रेड हिबिस्कस यांचा समावेश होता, ज्यांना प्रसाद लॅब्जकडून 50 तासांचा डीआय 50 टक्के सवलतीने देण्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे चैतन्यदायी आणि समावेशक भाव प्रतिबिंबित करत फिल्म बाजार रेकमेंड्स श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी 3 लाख रुपयांचे प्रायोजकत्व आणि प्रोत्साहन लाभ प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेचे विजेते आहेत :
- विपिन राधाकृष्णन दिग्दर्शित अंगम्मल
- पिनाकी जनार्दन लिखित आणि दिग्दर्शित हाऊस ऑफ मणिकांत
- रविशंकर कौशिक लिखित आणि दिग्दर्शित फ्लेम्स
रोख पारितोषिकासोबतच, विजेत्यांना अनेक अतिरिक्त लाभ मिळणार आहेत. यामध्ये देशातील 300 क्यूयुबीई चित्रपट गृहांमध्ये 2 लाख रुपयांपर्यंतच्या मूल्याच्या ट्रेलर जाहिराती,तसेच त्यांचे चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत म्हणून जाहिरात विषयक इतर संधी यांचा समावेश आहे.
विद्यार्थी निर्माता कार्यशाळा पिच पारितोषिकाचा विजेता ठरला अनुश्री केलात हिचा ‘डेडली डोसाज’ तर पुंजल जैन हिचा ‘लकडहारा’ उपविजेता ठरला.
फिल्म बाजार या उपक्रमात प्रथमच चित्रपट निर्मात्यांनी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल कॉ-प्रोडक्शन फीचर कॅश ग्रांट्स श्रेणीतील पारितोषिकाची सुरुवात करण्यात आली.
- या विभागातील प्रथम बक्षीस पायल सेठी दिग्दर्शित आणि थानिकेचलम एस.ए. निर्मित कुरींजी (द डिसअॅपियरिंग फ्लॉवर) या चित्रपटाला देण्यात आले.
- दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसाचा विजेता ठरला संजू सुरेन्द्रन दिग्दर्शित आणि प्रमोद सानकर निर्मित कोठीयन- फिशर्स ऑफ मेन
- प्रांजल दुआ यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि बिच-क्वान ट्रान यांनी निर्मिलेल्या टेन हेड्सऑफ रावण या चित्रपटाला या विभागातील तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.
याशिवाय, सुमित पुरोहित दिग्दर्शित आणि चिप्पी बाबू तसेच अभिषेक शर्मा यांच्यातर्फे निर्मित बागी बेचारे या चित्रपटाला स्पेशल मेन्शन फॉर बेस्ट पिच मानांकन देण्यात आले.
एका विशेष उपक्रमाअंतर्गत, फिल्म बाजारमध्ये सहभागी होण्यासंदर्भात फ्रेंच प्रतिनिधींना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा गौरव करण्यासाठी फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेचा देखील सत्कार करण्यात आला.
फिल्म बाजारच्या उज्ज्वल भविष्याची झलक दाखवणाऱ्या वेव्हज 2025 च्या टीझर च्या सादरीकरणासह या सायंकालीन कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमात केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाचे संयुक्त सचिव तसेच एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रीथूल कुमार तसेच केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागातील चित्रपट विभागाच्या संयुक्त सचिव वृंदा मनोहर देसाई यांची भाषणे झाली. या प्रसंगी, फिल्म बाजार चे सल्लागार जेरोम पैलार्ड,सुप्रसिध्द अभिनेता अविनाश तिवरी आणि प्रख्यात कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा देखील उपस्थित होते.
फिल्म बाजार 2025 साठीचा मंच तयार करत या कार्यक्रमाने कथाकथन आणि नवोन्मेष यांच्या जागतिक केंद्राच्या रूपातील वारशाला दुजोरा दिला. पुढच्या वर्षीसाठीच्या कार्यक्रमाची उत्सुकता निर्माण होत असतानाच, पुढील वर्षीचा कार्यक्रम अभूतपूर्व यश आणि चैतन्यमाय चित्रपटीय सहयोगांचे आणखी एक वर्ष साजरे करण्याचे वचन देत आहे.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Shailesh/Sanjana/Darshana | IFFI 55
(Release ID: 2077075)
Visitor Counter : 10